आदित्य अनुच्या जीवनात आला आणि अनुच आयुष्य उजळून निघाल.. आदित्य आणि अनु एकाच कंपनीला कामाला होते अनुच्या आयुष्यातला वाईट काळ उलटुन निघाला.... आता दोघांच्या आयुष्यात सुखाच्या सरी बरसत होत्या.... एकमेकांवर जीव ओवाळून टाकायचे... दोघाच एकमेकांवर खुप प्रेम होत... एकमेकांसाठी अगदी मन बावरे...... अनु आणि आदित्य च लग्न झालं.. हे अनुच दुसरं लग्न होतं... अनुचा पहिला नवरा अनु ला खुप छळायचा.... तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दयायाच... लग्ना नंतरची दोन वर्ष अनुसाठी नरका पेक्षा कमी नव्हती... अनु चा नवरा रोज दारू पिऊन तिला मारहाण करायचा..ती मुकाटपणे सगळं सहन करत राहिली... कारण त्यावेळी अनु च स्वता च अस कांहीच नव्हत...आर्थिक दृष्ट्या हतबल होती.... रोज मारहाण करायचा इतवर ठीक होतं पण एक दिवस तर कहर च झाला त्याने चक्क अनुला जाळ्णयाचा प्रयत्न केला, नशीब चांगलं म्हणून अनु वाचली .... शेजारच्या मदती मुळे अनु चा जीव वाचला.... त्यानी अनु ला जवळच्या हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केल.... तिथे प्राथमिक उपचार करण्यात आले... नंतर मोठ्य हॉस्पिटल मध्ये शिफटीग करण्यात आल.... काही महिने हॉस्पटल मध्ये राहुन अनु आपल्या माहेरी आली.....तिनी घरच्यांना सगळी आप बिती सांगितली...माहेरचयानी तिची साथ दिली आणि अनुचा घटस्फ़ोट झाला.... नॉर्मल होता होता अनुची दोन वर्ष गेली.. शरिर आणि मन दोन्ही पोरडुन निघाले होते.... काही महिने तिला मानसोपचार तज्ञाकडे नेण्यात आल... ती मनानी खुप खचली होती...सर्जरी झाल्या मुळे तिच्या शरीराची आग अजुनही कमी झालेली नव्हती.... आता अनु थोडी सावरायला लागली.... तिला एका कंपनी मध्ये जॉब मिळाला... आणि तिथेच तिची भेट आदित्य शी झाली... आधी दोघांची छान मैत्री झाली आणि मग हळूहळू प्रेम.... अनुने आदित्यला तिच्या भुतकाळा बद्दल सगळं सांगितलं ... आदित्य नी अनु ला समजून घेतलं... आणि मग लग्न...... आता दोघेही अगदी हॅपी हॅपी आहेत.... अनुच्या जीवनातला वाईट काळ उलटून गेला..
आपल्याही आयुष्यात कधी काळी असा वाईट प्रसंग किंवा घटना घडली तर घाबरून जाऊ नका... हिमतीने लढा..कारण स्त्री एवढी बलवान व्यक्ति या जगात नाही..... शरिराने आणि मनानेही ती पुरूषापेक्षा नक्कीच बलवान आहे.....
????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा