Jan 26, 2022
नारीवादी

पुरुष आणि शरीर सुख.....भाग एक

Read Later
पुरुष आणि शरीर सुख.....भाग एक

Affair लग्न झालेल्या पुरुषाचं.....

     सागर सोनल आणि माधुरी यांची लव्हस्टोरी....

सागर आणि सोनाली हे लग्नाचे नवरा बायको मूळात त्यांचं लग्न स्व इच्छेने झालेले सगळ छान सुरू होत.... सागर हा सिव्हिल इंजिनिअर सरकारी बंगल्याच काम सुरू होत तिथं सागर ची duty लागली आणि तिथून सोनलच्या आयुष्याचं वटोड व्हायला सुरवात झाली...?

सांगत रोज त्याच्या कामासाठी बंगल्यावर यायचा त्याला काम नसायचं फार तो फलत खुर्ची टाकून बसायचा आणि मजूर नीट काम करतात की नाई ते बघायचं इतकंच त्याच काम.....!!!

ज्या बंगल्यात तो कामाला होता तिथून समोरच सरकारी क्वार्टर होते बंगल्यात काय सुरू आहे ते सर्व बाल्कनी मधून दिसत होत... असच सागर आणि माधुरी च सुरू झालेलं अफेयर त्याला जबाबदार बाल्कनी,,, 

सागर पूर्ण वेळ फक्त वर बघत असायचा पण कोनाला काहीच कळाल नाही वाटत होत हा का बघतो पण मॅटर काहीतरी खूपच वेगळ होत.... सागर दिसायला इतका विशेष नाही पण माधुरी छान होती दिसायला पण तिच्या छान दिसण्याचा तिला खूप गर्व होता....

हळू हळू ते नात खूप पुढे जात होत.. एक दिवस माधुरीच्या मोबाईल मद्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून ती मैत्रिणीच्या मोबाईल मधे Facebook उघडुन त्याच्याशी बोलली आणि ते account logout न करता तसच सोडलं....? मग दुसऱ्या दिवशी तिने मोबाईल दुरुस्त करून आणला आणि त्यांच नेहमी सारखं बोलण सुरू झालं ते बोलत असताना नेहा ल notification येत होते n रहावता तिने ते उघडलं आणि माधुरी खरी काय आहे ते तिच्या facebook मुळे कळलं आणि त्या दिवसी नेहा सकाळी ४ वाजता झोपली कारण त्यांची सर्वात पासून ते त्या दिवशी पर्यंत ची पूर्ण chat वाचून काढली तिला धक्का बसला अशी कोणी असू शकत.....?

मग तिने ते बंद न करता तिचं रोजच सगळ बोलण काय होत आहे ते बघत होती.. माधुरीला आधीच दोन बॉय फ्रेन्ड होते आणि सागर हा तिसरा होता सागर कडून तिला फक्त पैसा हवा होता आणि सागर ला शरीर सुख कारण त्याची बायको सोनल ही गरोदर होती .....

याचं भेटणं बाहेर गावी जाणं सगळ सुरू होत तिला त्या बद्दल काहीही माहिती नव्हती... पण सागर नी माधुरी ला सांगितलं होत की त्याचं लग्न झालं आहे सगळं रोज तो तिला सांगत होता त्याच आणि सोनल च काय बोलन

होत ते सगळ तो माधुरीला शब्द आणि शब्द सांगायचं नेहा ला ते खूप विचित्र वाटत होत... अस हे तीन महिने नेहा वाचत होती आणि तिला माधुरी ला पाहिलं की चीड यायची त्यात माधुरी सागर ला रात्री फोटो पाठवायची व्हिडिओ पाठवायची अंघोळ करताना..

नेहाचा कुठलाही वाईट उद्देश नव्हता पण तिला बघायचं होत ही कोणत्या थराला जाऊ शकते.....??? यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या सागरची बायको सोनल hospital मधे बाळाला जन्म देत आहे.. त्याच्या बाळाला आणि हा तिच्याशी खोटं बोलून माधुरी कडे कोणी नव्हत म्हणून night stay करनार होता... आता नेहाच टाळक फिरल होत.... तिला सुचत नव्हत की करावं .. मग तिने निर्णय घेतला की माधुरीच्या आईला सगळ सांगावं तिने खूप हिम्मत केली आणि सांगितलं सुद्धा..... पण काय काहीच फरक नाई पडला कारण माधुरी सागर कडून पैसा घेत होती आणि सोन्याची चैन अंगठ्या लॉकेट सगळ घरी आणत होती .....त्यांना ते गोड लागायचं त्यामुळे नेहाने सांगितल त्याचा कुठलाच परिणाम माधुरी आणि तिच्या घरच्यांवर झाला नाही...... हे सगळ असच सुरू होत... शेवटी नेहाला वाईट वाटलं ते सोनल बद्दल तिने तिला भेटायचा निर्णय घेतला... ती जवळच्या हॉस्पिटल मद्ये असल्यामुळे आणि त्यांच्या बोलण्यामुळे कळलं होत की ती कुठ आहे.... सोनल ल रात्री १२ वाजता मुलगी झाली आणि दुसऱ्या दिवशी यांचं सत्य तिला कळल भावाकडून कारण तो लक्ष ठेऊन होता सागर वर त्याला संशय आला म्हणून ती खूप हळवी झाली तिला काहीच सुचेनास झाल....

पण ती खूप धीराची होती नेहा तिच्या कडे गेली तेव्हा तिची हिम्मत नाही झाली सोनल ल भेटायची हॉस्पिटल पर्यंत जाऊन नेहा परत आली तिला काय वाटेल हे सगळ ऐकून याचा विचार केला आणि माधुरीच्या त्या नात्याचा तिने पिच्छा सोडून दिला.... पण दुसऱ्या दिवशी दुपारी सोनल आणि तिचा भाऊ माधुरीच्या घरी इतकी ओली बाळंतीण ते छोट बाळ घेऊन तिच्या नात्याचा गुंता सोडवायला आली........ पुढे काय झालं ते नक्की सांगते पुढच्या भागात तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया लिहायला खूप हुरूप देतात.......

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Darshana Sushir

student

Satisfied innocent and very clear about my career I tried best to write