म - मैत्रीचा

Mamaitricha


म - मैत्रीचा


मैत्री म्हणजे आपल्या मनाने जोडलेले नाते. ज्याच्याशी आपली मते, विचार जुळतात. मग मैत्री होते. या नात्याला रक्त, जात, धर्म, वय, शिक्षण, गरीब - श्रीमंत काहीही पाहिले जात नाही.


आजपर्यंत मैत्री वर किती गाणी आली असतील ना..


यारा तेरी यारी को, मैने तो खुदा माना.... याद करेगी दुनिया तेरा मेरा अपसाना....


हि दोस्ती तुटायची नाय....


दिल दोस्ती यारी वारी....


ती का गाजली असतील कारण महिती या मैत्री या नात्यात ती जादू आहे. या मैत्री या नात्यात काही बंधनं नसतात. असली तर मनाची मनाशी बांधीलकी असते. या मैत्रीच्या नात्यात आभार नसतात. यात माफी नसते.


मैत्री मध्ये काही असले तर बस्स समोरच्या व्यक्तीला खांद्यावर हात टाका. गळे भेट घेऊन, हातात हात घालून.. बस्स.. आपले मनातले सगळे अगदी मनसोक्त बोलण्याची हक्काची जागा असते. जिथे विश्वासाने आपण काहीही आणि कितीही सांगू शकतो.


मैत्री मध्ये मदतीचा हात असतो. धीराचे दोन शब्द असतात. सोबत असती. कधी कधी रक्ताची नाती साथ देत नाही पण मैत्री साथ देते. असा अनुभव आल्यावर मैत्री चा खरा अर्थ कळतो.


मदतीला धावून येणारी मैत्री खरी जाणवल्या शिवाय रहात नाही. त्यासाठी जिवा भावाचा एक मित्र, एक मैत्रीण जोडणे आवश्यक असते.


मैत्री एकाबाजूने नसते. दोन्ही कडून मैत्रीचा हात पुढे केला. मग बस्स विचारू नका. धमाल. मस्ती, साथ, सोबत....


मैत्री खरी असली तिथे दुःख व्यक्त करताना शब्दांची गरज पडत नाही. मनाचे मनाला मनापासून माहिती असते.


शाळेतली डब्बे शेअर करणारी मैत्री, कॉलेज कट्टयावरची मैत्री, खेचाखेची, गप्पा, गोष्टी, धमाल, मज्जा, मस्ती, सहल, चित्रपट, खेळणे, नाचणे, अभ्यास, परीक्षा, खेळण्यात मित्र मैत्रीणी मध्ये काय गोड आठवणी असायच्या खेळ गंमतशीर लिंगोरचा, विटी - दांडू, गल्ली क्रिकेट, लपंडाव, कोपरा पाणी, शिवनशाई काय मित्र आणि मैत्रीणी सोबत खेळ रंगायचा. काय दिवस कुठे जायचे कळायचे नाही. मैदानी खेळ खेळायला मिळाले. तब्येत चांगली आहे. आताची मुले घरबसल्या मोबाईल वर गेम खेळतात मित्र आणि मैत्रीणी नाही. मैदानी खेळ नाही. मोबाईल वर गेम खेळून लहान वयात चष्मा लागतो मुलांना. मैदानी खेळ खेळण्यात सगळ्यात काय गोडी असते अशा मैत्रीत.... कारण त्यात स्वार्थ नसतो. दुनियादारी नसते. तुम्ही अनुभवली अशी मैत्री? आणि टिकून आहे तूमचे जिवलग मित्र - मैत्रीणी जीवाला जीव देणाऱ्या मग तुम्ही जगातले मनानी श्रीमंत व्यक्ती आहात. कारण अशी मैत्री मानसिक सुख, समाधान नक्कीच देतेच. 100%. खरंच.


कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचे उदाहरण आज हि देतात. अशी मैत्री असावी.


इंग्रजी मध्ये एक म्हण आहे. डॉंकी फ्रेंड मस्ट बी अनदर डॉंकी.... गाढवाचा मित्र हा गाढवच असतो.
कारण दोस्ती, मैत्री, साथ, सोबत सारख्या विचारांची होते.



मैत्री, संगत हि खुपच महत्वाची असते. तुमची संगत तुम्हाला सुधरवते किंवा बिघडवते सुध्दा.. मराठीत एक म्हण आहे. ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला. मैत्री चांगली असली की तुमचे चांगले होणारच. उदाहरण द्यायचे झाले तर कर्णाचे घ्या. कर्णाची मैत्री दुर्योधनाशी होती. त्याचा अंत कसा झाला. दुसरे उदाहरण अर्जुन आणि श्रीकृष्णाची मैत्री यात अर्जुनाला कसे गितेचे ज्ञान मिळाले. परमेश्वराला मित्र केले. तिथे उणे काय?


आजकालच्या जगात वेगवान जगात, घोर कलियुगात जिथे सख्खे सख्याला विचारत नाही. तिथे फक्त मैत्रीच अशी आहे. जी सख्या पेक्षा जवळची होते. जी वेळेला धावून येते. मग अनुभवाने मैत्रीची किंमत कळते.


आजकालच्या जगात माणसांच्या गर्दीत एकटेपणा जाणवतो. मग डिप्रेशन, आत्महत्या करणारे अनेक श्रीमंत आहेत. अशावेळी जिवाभावाचे मित्र कमवलेले खरे श्रीमंत नाही का?



आजकाल लोक तोंडावर एक बोललात. पाठ फिरवली की लगेच दुसरेच बोलतात. कारणे अनेक आहेत. अहंकार, आपण श्रेष्ठ दाखवणे अशा जगात जगताना. यावर उपाय एकच एक जिवाभावाची मित्र मैत्रीण आयुष्यभर सोबत हवी. ज्याच्या जवळ सगळेच मन मोकळं बोलू शकतो विश्वासाने , मन मोकळं हसू शकतो, रडू शकतो असे मित्र हवे... ज्याच्यापाशीय मनमोकळ करायचे आणि त्यांची / मित्रांची साथ, धीराचे दोन शब्द आपल्याला संकटाना तोंड द्यायचे, सकारात्मक जगण्याचे बळ मिळेल.



मैत्री म्हणजे ज्यात दोन व्यक्तींना एकमेकांचे विचार जुळतात. एकमेकांच्या सहवासात त्यांची कळी खुलवतो. मैत्री दोघांची छान असावी . जशी पुरणपोळी आणि साजूक तूप, गोडवा हवा, सात्त्विकता हवी. मैत्री छानच असावी जशी चिंच आणि मीठ.... वा.. आबंट आणि खारट पण त्यातही गोडवा हवा.



मित्र मोजके असावेत पण बेस्टच हवे. जिवाभावाच्या मित्रा शिवाय जगण्याची वेळ शत्रूवरही येऊ नये.


दिल चाहता है.. हम ना रहे कभी यारो के बिन..



सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®


विषय - नाते मैत्रीचे
गोष्ट छोटी डोंगराएवढी.