मलाही वाटायचं...

This poem written by me.

मलाही वाटायचं...
तुझ माझ्यावर खुप प्रेम असाव,
तुझ्या डोळ्यात मला ते दिसावं,
मी काही न सांगताच तू माझ सुख दुःख समजावस ,
आणि नेहमी माझ्या सोबत असावस.

मलाही वाटायचं...
आयुष्यातला एक दिवस तुझ्यासोबत जगावा,
मनमोकळे पणाने तुझ्याजवळ हसावं,
आणि तेवढ्याच हक्कान तुझ्याजवळ रडाव,
खरचं आयुष्यातला एक दिवस तुझ्यासोबतचा असावा.

मलाही वाटायचं...
तुझा हात पकडुन तुझ्या सोबत चालावं,
मग तोच हात पकडुन तू मला माझ्या घरी सोडावं,
सोबत चालताना आपल्याला रस्त्याचं ही भान नसावं,
आपल्याकडं बघून लोकांना वेडेपण समजावं....

मलाही वाटायचं...
आपल एक सुंदर जग असाव,
दोघांनी आयुष्यभरासाठी एकत्र यावं,
मी सोबत असताना तुला कुणाचीही कमी न भासावी,
तुझ्यासोबत मी माझ आयुष्य जगावं.

मलाही वाटायचं...
तुझ्याशी सगळ आयुष्य शेअर करावं,
आणि तू माझी पर्सनल डायरी होऊन ते जपून ठेवावं,
माझ्या डोळ्यात तू माझं सुख दुःख वाचावं,
तुला न सांगताच माझ्या मनातलं कळाव.

मलाही वाटायचं...
तू माझ्या डायरीच  एक पान असावं,
त्या पानात सगळीकडे मला तूच दिसावं,
डायरी लिहिता लिहिता मी तुला आठवाव,
आणि तुझ्याच आठवणीत गालातल्या गालात हसावं.

मलाही वाटायचं...
तुझ्या आठवणीत रमून जाव,
तुलाही माझ्या असण्याच भान असावं,
तुझ्या आठवणीत डोळ्यात पाणी यावं,
अश्रुंच्या या सागरात मी बुडून जाव.

मलाही वाटायचं...
तुझ आणि माझं खूप छान नात असावं,
आपल्या नात्याच जगावेगळं सेलिब्रेशन करावं,
सगळ्यांनी आपल्याला one of the best couple म्हणावं,
one of the best couple म्हणावं.

मलाही वाटायचं.....
                 
                                                                  Ashu.