मला तुझ्यापासून दूर जायचं नाही...भाग 2

Mala tuzya pasun dur jaych nahi aahe

मला तुझ्यापासून दूर जायचं नाही... भाग 2


सांग कधी कळणार तुला


जलद लेखन कथामालिका


भाग 1 क्रमशः

लग्नाला वर्ष होतं नाही तर 


“आता लवकरात लवकर नातवाचं तोंड बघू दे, आता आमचे दिवसच किती राहिलेत? शेवटचे दिवस तरी नातवंडासोबत सुखाचे जावो हीच इच्छा आहे. बघा दोघेही विचार करा.” हे वाक्य दर दोन दिवसांनी  प्रेरणाच्या कानात गुंजत असायचे. सासु अगदी टेपरीकॉर्डर सारखी जी सुरू व्हायची ती बंद होण्याचं नावच घेत नसे. एखाद्या वाक्यावरून एखाद्या शब्दावरून तिचं बोलणं सुरू व्हायचं ते गोष्ट उरून फक्त बाळापर्यंत येऊन थांबायची.


एकदा निखिल दोन दिवसांसाठी बाहेर गेलेला होता, त्याला बाहेर गेलेले बघून प्रेरणाच्या सासूने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

“तुलाच बाळ नको असेल तूच विचार करत नसशील. अग बोल एकदा त्याच्याशी, सांग की तुला आई होण्याची इच्छा आहे. तो ऐकेल ग. त्यालाही बाबा व्हावंसं वाटत असेल ना. आता तूच मनावर घेत नसशील, तुलाच नको असेल तर तो तरी काय करणार.”

“आई असं काही नाहीये. निखिलला त्याचं प्रोजेक्ट पूर्ण करायचंय, त्याचा फोकस फक्त त्यावरच आहे. आणि मलाही करिअर आहेच की.”

“तुझं करिअर बाजूला ठेव गं, तुला नोकरी करून काय करायचं? आई झाल्यानंतर घरीच तर राहणार आहेस तू. त्याच्या नोकरीचं त्याला बघू दे. करतोय ना तो नोकरी? कमावतोय ना? मग तुझ्या कमाईची काय गरज.” असं म्हणून तिच्या सासूने तिला गप्प बसवलं.


निखिल दोन दिवस घरात नव्हता तर त्यांनी बोलून बोलून तिला खूप त्रास दिला. निखील परतला त्यानंतर प्रेरणाने निखिलला सगळं सांगितलं.


“ठीक आहे मी आई-बाबांशी बोलतोय, तू टेन्शन घेऊ नकोस.”

“हो खरच बोल कारण त्यांच्याशी बोलण्याची खूप जास्त गरज आहे. आई बोलल्या तर बोलल्या बाबाही मला बोलले, अरे किती ऐकून घ्यायचं.”

दोन दिवस निखिल शांत बसला पण त्यानंतर तोही आई-बाबांशी जाऊन बोलला. घरात वाद नको म्हणून आई गप्प बसली पण पुन्हा तिने तसंच केलं.


असेच दिवस आणि वर्ष सरत गेले. निखिल आणि प्रेरणाच्या लग्नाला पाच वर्षे झाले. आता दोघांनी आई-बाबा होण्याचा विचार केला. पण त्यावेळी त्यांच्या हातात निराशा आली. म्हणतात ना सगळ्या गोष्टीवर वेळ हा एकच उपाय असतो. वेळेवर गोष्टी केल्या नाहीत तर त्याचा काही ना काही परिणाम नक्कीच होतो. दोघांनी चेकअप केले, डॉक्टरच्या वाऱ्या केल्या पण हाती काहीच लागलं नव्हतं. शेवटी टेस्टट्यूब बेबी द्वारे त्यांच्या आयुष्यात मिथिला आली. त्यातही सासू-सासर्‍यांना आनंद झाला नाही कारण त्यांना नातू हवा होता. नात झाली म्हणून डोक्यावर हात धरून बसलेले दोघेही, कधी मिथिलाला जवळ घेतलं नव्हतं की कधी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवलेला नव्हता पण तरीही प्रेरणा सगळ सहन करायची. 

मिथिला झाली आणि अवघ्या काही महिन्यातच प्रेरणाने जॉब जॉईन केला. तिला वाटलं सासू घरात आहे तर काहीतरी मदत होईल पण तिच्या सासूबाई मदत तर करत नव्हत्या उलट प्रेरणाचे काम कसे वाढतील हाच प्रयत्न करत राहत होत्या.


क्रमशः

🎭 Series Post

View all