मला सासू हवी आहे

Nat sasu sunech
मला सासू हवी आहे.…

समीर आणि अनघा आज पहिल्यांदा डेट वर जाणार होते. तशी त्यांची जुनी ओळख म्हणजे दोन वर्षे झाली होती समीर आणि अनघा एकत्र काम करत होते.

आजवर  त्यांचं  नातं फक्त सहकारी एवढंच होत. हळूहळू त्यांच्यामध्ये संवाद वाढायला लागला, मैत्री झाली आणि मैत्री मैत्रीचं नातं कधी प्रेमात रूपांतर झालं त्यांना त्यांचचं कळलं नाही.

समीर मोठ्या घरात वाढलेला, अगदी श्रीमंत बापाचा मुलगा होता.

अनघा मिडल फॅमिलीमध्ये वाढलेली होती.
घरी आई वडील, दोन बहिणी एवढीच काय ती फॅमिली होती.

समीर एम कॉम झालेला तर अनघा बी कॉम झाली होती.
दोघेही एकाच ऑफिस मध्ये काम करत होते.

समीर हॉटेल मध्ये पोहोचला. बराच वेळ झाला अनघा आलेली नव्हती.

समीर निघून जाणार तेवढ्यात अनघा आली.

“सॉरी मला थोडा उशीर झाला.”

“मी आता निघून जाणार होतो. काय ग किती उशीर?”

“सॉरी बाबांची औषध आणायची होती, त्यामुळे थोडा उशीर झाला.”

“ओके ओके अग ठीक आहे एवढं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, बस तू शांत हो.”

“वेटर, प्लिज सम वॉटर”

वेटरने पाणी आणलं, अनघा पाणी प्यायली.

“यु आर रिलॅक्स नाऊ?”

“हम्म..”

“अनघा मी आज खूप हॅपी आहे, इतक्या दिवसापासून मी ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस उजाडला.” समीर वाट बघत होता अनघा काहीतरी बोलेल पण ती गप्प

“तुला माहीत आहे, आज घरी गेल्या गेल्या मी सगळ्यांना ही आनंदाची बातमी देणार आहे. तुही तुझ्या घरी सांगणार असशील ना?”

अनघा गप्प..

“अनघा तुला माझ्या फॅमिली बद्दल काय काय माहीत आहे? तू ओळखतेस का कुणाला?"

अनघा गप्प..

समीर खूप बळबळा आणि खट्याळ तर अनघा अगदी मितभाषी होती.

“अनघा आता तरी बोल ग. आपण इथे भेटायला, बोलायला आलोय ना?”

“सॉरी, कोण कोण असतं तुमच्याकडे.?“

"बाबा, काका-काकी, मोठे बाबा- मोठी, आई, चुलत बहिणी, चुलत भाऊ खूप मोठं कुटुंब आहे माझं.”

“आणि सासूबाई?”

“ती तर आहेच ग.”

“माझ्या फॅमिलीत मी आई बाबा आणि एक बहीण.”

दोघांचं बोलणं झालं.
शेवटी समीरने अनघाला विचारलं.

“तुला एकत्र राहायला आवडेल की वेगळं.?”

“मला सासुबाईसोबत राहायला आवडेल.”अनघाच्या या वाक्यावर समीरला आश्चर्य वाटलं त्याचं भावाने तो तिच्याकडे बघत राहिला.

“असं काय बघत आहात?”

“सासूबाई सोबत म्हटलं म्हणून आश्चर्य वाटलं. आजकाल मुलींना जॉईंट फॅमिली नको असते. सासूबाई तर नाहीच नाही.”

“खर सांगू का त्या नसतील तर मी अपूर्ण असेल. त्यांची सोबत मला खूप महत्वाची आहे. आपल्या देशात, प्रत्येक प्रांतातील सण, उत्सव,परंपरा वेगळ्या वेगळ्या असतात. प्रत्येक जाती धर्मात ते साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. मी ज्या घरात लग्न करून जाईल तिथे जर सासूचं नसेल तर मला या परंपरा,रीत कोण शिकवणार? कोण मला सगळं समजावून सांगणार? घरातल्या सुनेला जर काहीच येत नसेल तर काय उपयोग? म्हणून मी म्हटलं सासुशिवाय मी अपूर्ण आहे.”

एवढं बोलून अनघा तिथून निघून गेली.


काही वेळाने समीरने,त्याचा मित्र पंकजला फोन केला. त्याला सगळं सांगितलं, अनघाचं शेवटी बोललेलं वाक्यही सांगितलं. त्यावर तो जोरजोरात हसायला लागला.

“काय रे असा का हसतोय?”

“नशीबवान आहेस भावा. बायको आणि आईमधले वाद सोडवता सोडवता मुलाच्या नाकी नऊ येते. इथे तर तुझ्या बायकोला सासू हवी आहे. यु आर लकी यार.”

तीन महिन्यानंतर रीतसर लग्न झालं. गृहप्रवेश करताना अनघाला उखाणा घ्यायला सांगितला.

“कामाची सुरुवात होते
श्रीगणेशापासून
समीरचं नाव घ्यायला
सुरुवात केली आजपासून...
मला सासू हवी होती,
ती मिळाली
समीरच्या कृपेने
मी या घरात आली”

दोघांचा संसार सुरू झाला...
समाप्त:


आजकाल मुलींना एकत्र कुटुंब नको असतं. सगळ्यांना विभक्त कुटुंब हवं असतं. अनघा सारख्या मुली खूप कमी असतात ज्यांना सासू हवी असते.सासू सुनेच नातं खूप सुंदर आहे, दोन्हीकडून जर हे नातं जपलं तर कधीच कोणत्या घरात वाद होणार नाहीत.