मला गृहीत का धरताय...भाग 2

Tinech Sagal Ka karaych
मला गृहीत का धरताय...भाग 2

रमाला खूप राग येत होता.
पण तरी ती शांत राहिली.

नवरोबाच्या मदतीने नाश्ता रेडी करून सगळ्यांना दिला.
(हौस म्हणून कधीतरी किचन मध्ये यायचा, पण त्याला कुकिंग करायला खूप आवडत असे.)

त्यानंतर ती तिच्या कामाला लागली.


तर हा एक प्रसंग होता पण अशी अनेक प्रसंग तिच्या आयुष्यात येऊन गेले. घरात सासू आणि जाऊ असून देखील प्रत्येक जण तिला गृहीत धरायचे. प्रत्येक गोष्टीत सगळ्यांना रमा लागायची. रमा कुठे कुठे पुरणार ना? कधी कधी तिची चिडचिड व्हायची.

लग्नाला दहा वर्ष होऊनही कधी तिला तिच्या मनाप्रमाणे वागता आलं नव्हतं, तिच्या मनाप्रमाणे कामे करता आली नव्हती. प्रत्येक गोष्ट सासूला विचारून करायचं हे घरात ठरलेलं असायचं. स्वयंपाकघरात काही करायचं असलं की सगळे रमाला गृहीत धरायचे.


रमा सकाळचं सगळ आवरून ऑफिसला जायची, ऑफिस मधून संध्याकाळी आल्यानंतरही उरलेली कामे ती करायची. कधी कधी दमायला व्हायचं, इच्छा नसायची तरीही तो करायची.

रमा आहे ना ती करेल सगळे तिला गृहीत धरायचे. घरात वाद नको म्हणून ती गप्प बसायची. खरं तर प्रतिउत्तर देणे तिच्या संस्कारातच नव्हतं.

प्रतिउत्तर देणे, उलटून बोलणे, भांडण करणे हे तिला कधी जमलंच नव्हतं.

रोज सकाळी चहा, दूध, नाश्ता, स्वयंपाक सगळं आवरून ती तिच्या कामाला जायची.

"एक दिवस कुणी दुसऱ्यांनी बनवला तर काय बिघडलं. मीच म्हणून सगळं का करायचं. स्वतःची छोटी छोटी कामे तरी करायला हवी ना?" सतत स्वतःला प्रश्न विचारायची.

ती करते म्हणून तिलाच सगळ्यांनी गृहीत धरणे योग्य नव्हे.
आता मात्र रमा बोलायला लागली.

एक दिवस तिने सांगितलं,

"मला गृहीत धरू नका. प्रत्येक गोष्ट मीच केली पाहिजे असं नाहीये. सगळ्यांनी सगळं शिकायला हवं, यानंतर कुठल्याही गोष्टीत मला गृहीत धरायचं नाही. घर सगळ्यांच आहे ना मग सगळ्यांनी मदतीचा हात द्यायला हवा. मीच एकटीने म्हणून का करायचं. माझी कर्तव्य मला कळतात, आणि मी त्यात कधीही कमी पडले नाही. पण तरीही मला गृहीत धरू नका."

सगळे तिच्याकडे बघतच राहिले, ती तिथून निघून गेली.

क्रमशः

🎭 Series Post

View all