मला गृहीत का धरताय... भाग 3 अंतिम
रमा फाडफाड बोलली,
सगळे तिच्याकडे बघतच राहिले.
ती तिथून निघून गेली.
ती तिथून निघून गेली.
रात्री खोलीत नवरोबाने विचारले.
"काय ग रमा आज काय झालं होतं तुला? किती फाडफाड बोललीस?"
"तुम्हाला राग आला असेल तर खरंच सॉरी. मला कुणाला दुखवायचं नव्हतं. पण मला याचा त्रास व्ह्यायला लागला होता. कामाचा कंटाळा येतो किंवा मला करायचं नाही आहे म्हणून मी बोलले नाही. पण तुम्ही सगळ्यांनी मला गृहीत धरलेलं होतं.
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला जे जे हवं असत ते ते त्यांच्या हातात देते मी. तुमची औषध, रुमाल सगळं तुमच्याही हातात देते. इतक्या धावपळीत एखादी गोष्ट जर सुटून गेली तर बोलणी मलाच खावी लागतात. माझ्या डोक्यात कामांची यादी फिरत असते, पण एखाद्या वेळी चूक झाली तर समजून घ्यायला नको.
मलाही मन आहे, मलाही तुमच्या बोलण्याचं वाईट वाटू शकतं. पण कुणी याचा विचार करतच नाही, सगळे मला गृहीत धरतात.
मला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला माझी मत आहेत, मलाही माझी स्वतःची कामे असतात, तुम्ही सगळे मला गृहित धरू नका."
रमा बोलून मोकळी झाली, तिचं बोलणं नवरोबाला पटलं.
बोलून तिला प्रसन्न वाटत होतं, मनातलं बोलले याचं समाधान चेहऱ्यावर दिसत होतं.
दुसऱ्या दिवशी रमा उठली,
"आज ऑफिसमध्ये मिटिंग आहे लवकर आवरावं लागेल." स्वतःशीच पुटपुटली.
किचनमध्ये गेली, सगळं रेडी होतं.
"रमा, चहा घे. तुझा डबा तयार आहे. आज मिटिंग आहे ना तुझी, तू आवर आणि निघ."
सासूबाईंनी हातात चहाचा कप दिला.
"आई थँक यू."
दोघींनी एकमेकींना मिठी मारली.
समाप्त:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा