मला गृहीत का धरताय...भाग 1

Tinech Sagal Ka karaych
मला गृहीत का धरताय...भाग 1

रमा किचन मध्ये आवरत होती, सुलोचना ताई आल्या.

"नाश्ता काय बनवला?"

"आज मी नाश्ता बनवलेला नाही आहे, स्वयंपाक तयार आहे. मला बाहेर जायचंय, पिहूचे प्रोजेक्ट तयार करायचे आहेत त्याच्यासाठी सामान आणायचं आहे, नंतर ऊन खूप होतं म्हणून मी आता जाणार आहे. मी स्वयंपाक तयार केलेला आहे."


सासुबाई काही न बोलता निघून गेल्या.

त्यानंतर नवरोबाची फर्माईश आली ब्रेड आमलेट बनवून दे. रमाची चिडचिड सुरू झाली.


"अहो मला बाहेर जायचंय." तिने त्यांना सगळं सांगितलं.


"ठीक आहे मी बनवतो." असं म्हणून नवरोबाने हातात काम घेतलं.


तोवर रमाने आंघोळ आवरली आणि ती जायला निघणार तोच किचनमध्ये येऊन बघते तर काय कुणीही काहीही केलेले नव्हतं.


तिची चिडचिड सुरू झाली.

"मी बेसिक तयारी करून ठेवलेली होती, तरी कुणी बनवायला घेतलं नाही, सगळं मीचं म्हणून का करायचं? तुम्ही सगळे मला गृहीत का धरता? घरात सासू आहे, जाऊ आहे तरी सगळं मीच केलं पाहिजे असं आहे का? आज संडे आहे प्रोजेक्ट करायला वेळ मिळेल म्हणून मी माझी सगळी कामे लवकर आवरली. रोज तर काहीच वेळ मिळत नाही, मी माझी कामे कधी करायची?"

रमाला खूप राग येत होता.
पण तरी ती शांत राहिली.

क्रमशः

🎭 Series Post

View all