मला आदर्श सासू हवी!(भाग ३)

जशी सून आदर्श हवी तशी सासू पण हवी ना! तिचं आयुष्य,तिचा निर्णय चुकीचा नाही ना?


भाग ३

***************************
बाबा कामावर निघून गेले. दिवसभर त्यांच्या डोक्यात तोच विचार घोळत होता की, आपण आपल्या मुलीला प्रत्येक गोष्टीसाठी स्वातंत्र्य दिलं ही चूक केली का? दोन दिवसांनी मेळावा आहे तिथे आपले नातेवाईक आणि आपल्या जातीचे लोक येतील तेव्हा काय होईल? मैथिली लहान आहे, तुला कळत नाही कारण मी तर मोठा आहे.\"

तेवढ्यात आवाज आला,

" साहेब....साहेब..."

" आ!!!!!"

"कुठे हरवलात सर? मोठ्या सरांनी तुम्हाला बोलावलं आहे."


" हो आलोच मी..."

" मे आय कम इन सर?"


" येस... येस...यां ना. बरं वाटते आता."


" हो बरं वाटते... पण सर, आधीच दोन दिवस सुट्या झाल्या तरीही मला परवा सुटी हवी होती?"

" का? काय काम आहे?"

" मुलीला घेऊन वधुवर मेळाव्यात घेऊन जायचं आहे."


" अरे वा!!!...जा जा...ती सुंदर आहे तिला लगेच पसंत करेल कुणीही."

" पण साहेब ....ती फार स्वच्छंदी आहे, मनाला जे वाटेल तेच करते."


" करू द्या... आजची तरुण पिढी अशीच आहे, फक्त काही चुकीचं नाही करत ना बस."


बाबा उठले, उरलेले काम केलं आणि संध्याकाळी घरी आले.

घरी आई सुद्धा हाच विचार करत होती. बाबांना चहा देऊन आई स्वयंपाकाला लागली.

काही वेळाने मैथिली आली आणि हातपाय धुवून जेवयाला बसली. कुणी काहीच बोलेना ....

"अहो तुम्ही दोघं एवढे का शांत आहात?काय झालं??"


" तू हे आम्हाला विचार काय झालं?"


"आई चिडू नको ना... मला नाही वाटत मी काही चुकीचं करत आहे."

"तू फक्त स्वतःचा विचार करत आहेस हे लक्षात ठेव."

मैथिली उठली आणि हात धुतला.


"जेवण पूर्ण कर....त्यावर राग नको काढू."
ती काहीही बोलली नाही, बेडरुममधे निघून गेली.


"अगं तू शांत हो, उगाच बोलू नको तिला."


" तुम्ही नेहमी तिची बाजू घेत आलात...बरोबर आहे तुझं, हेच म्हणत आलात त्याचेच परिणाम आहेत हे."


" एक सांगू का कधी कधी वाटतं... ती काय चुकीचं बोलली का?...नाही ना!!!"

आईने कपाळावर हात मारला. दोघांनी जेवण केली आणि बाबांनी तिचं ताट तिच्या रूममधे नेलं."

" बाळा ...जेवण करून घे.सासरी कुणी येणार नाही असं जेवण घेऊन तुझ्या रूममधे...राग राग करू नको."


" एझ्याटली!!! म्हणुन मला आदर्श सासू हवी. समजा माझं काही चुकलं आणि कधी भांडण झालं तर  तिने मला सांभाळून घेतलं तर कशाला राग येईल मला आणि त्यांनाही."


बाबा हसले..."चल जेव...आता नको तो विषय. परवा मी सुटी घेतली आहे तू पण घे."


"ह्ममम……. घेते घेते."


दुसरा दिवस अगदी नॉर्मल गेला.

आता उजळला तो दिवस. सकाळी लवकर उठून सगळे रेडी झाले

" मैथिली हे काय घातलं? ...सलवार सूट नको साडी घाल. चांगली दिसली की लगेच पसंद करेल तुला कुणी आणि सुंदर पण दिसशील."

" आई ज्याला आवडायची ना त्याला मी फाटक्या कपड्यात सुद्धा आवडेल आणि संसार काय कपड्यांनी करायचा आहे का? निलू मावशीची सून नेहमी साडीत असते पण निलू मावशीला घराच्या बाहेर काढलं तिने लग्नानंतर सहा महिन्यात."


बाबांनी आईकडे बघितलं मात्र काहीच बोलले नाहीत.काही वेळात मावशी आणि काका आले आणि सगळे मग कार्यक्रमाला गेले.

तिथे बरीच गर्दी होती. ती गर्दी बघून आई म्हणाली,


"जरा विचार करून बोल मैथिली बरं का!"

" काळजी करू नको आई."

मैथिली काय बोलेल? बाकी लोक काय विचार करतील????बघू या पुढच्या भागात.
©®कल्पना  सावळे

🎭 Series Post

View all