Jan 19, 2022
नारीवादी

मला " ए आई " म्हण...

Read Later
मला

आज, वासंतीताईंच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त,  अगदी जवळचे आणि मोजकेच नातेवाईक, मित्र मंडळी जमले होते. घरातील सगळयांनी वाढदिवसाची जय्यत तयारी केली. उत्सवमूर्ती,वासंतीताई ह्यांनी रेखिव नक्षीदार मोरांची हिरव्या रंगाची पैठणी नेसली ,लाल ठसठशीत  कुंकू, गळ्यात सुंदर मोत्यांचा हार, मंगळसूत्र आणि नथ! त्यांच्या दोन्हीं सुना ना त्यांची आवड पक्की माहित असल्याने हे सुहासिनी चे शृंगार दोघींनी सासूबाईंना वाढदिवसाची भेट म्हणून दिले.

कार्यक्रम खूप छान रंगला होता. जेवणाची पंगत झाली आणि वासंतीताई म्हणल्या " मला काही बोलायचे आहे.आज मला माझ्या दोन्ही लेकिंनचे आभार मानायचे आहेत, हो नेहा आणि मीरा ह्या दोघी माझ्या मुली समान आहेत. मुली समान कशाला? माझ्या दोन मुली आहेत त्या. या घरात जेव्हा नेहा लग्न करून आली तेव्हा सर्वप्रथम मी तिला एक अट घातली! नेहा, तू मला "अहो आई" अशी नको, तर " ए आई " अशीच हाक मार. तिच्यापाठोपाठ एक-दोन वर्षातच मीरा देखील लग्नं करून ह्या घरात आली. तिला देखील हीच अट होती. मला नेहमीच असं वाटतं "अहो आई " किंवा "ओ आई " मध्ये एक दूरावा आणि परकेपणा आहे. मला काही त्यांच्या सख्या आईची जागा घ्यायची नव्हती, अर्थात ती जागा कोणालाच घेता येत नाही. पण किमान हक्काने ए आई हाक मारली तर सासू-सून ह्या आमच्या नात्यात थोडा मोकळेपणा आणि जवळीकता यावी म्हणून ही माझी अट." अहो आई " मध्ये मान आहेच,पण तो जर जुलमाचा रामराम असेल तर काय उपयोग त्या मानाचा??

आम्हा तिघीन मध्ये एक खूप छान नातं आहे. एखाद्या आई आणि मुलींमध्ये असावं तसचं.सख्या माय- लेकित देखील काही वेळा मतभेद असतातच की, छोटे-मोठे वादविवाद होतात, तसेच आमच्यात देखील होतात. "सून" म्हणून घरी आल्यानंतर या दोघींनाही मी ह्या घराचा ताबा स्व इच्छेने दिला. त्यांना दोघींना मी वचन दिलं मी कायम तुम्हां दोघींच्या पाठीशी, किंबहुना तुमच्या बरोबर आहे!  हे घर जितकं माझं आहे तितकच तुमचं देखील आहे आणि ह्या "आपल्या" घराची जबाबदारी पेलण्याची ताकद आणि क्षमता तुम्हां दोघीन मध्ये आहे ह्याची मला खात्री वाटते.

नेहा, माझी मोठी सून, ही ११ वर्षांपूर्वी आमच्या आयुष्य आली. ती लग्ना आधीपासूनच नोकरी करत होती. लग्नानंतरही नोकरी करण्याची इच्छा तिने बोलून दाखवली. एक शिकलेली हुश्शार मुलगी, आयटी कंपनी मध्ये जॉब करणारी. करियर आणि घर दोन्ही सांभळायची तयारी नेहा ने दर्शवली. मी तिला म्हणाले, मी स्वतः एक मुख्याध्यापिका आहे. घर आणि नोकरी  ह्या दोन्हीं जबाबदाऱ्या गेली २५ वर्ष मी योग्य रित्या आनंदाने सांभाळत आहे. " तुमभी आगे बढो " माझ्या अपेक्षेप्रमाणे, खरं तर अपेक्षे पेक्षा खूप जास्तच चांगल्या पद्धतीने नेहाने हे "घर आणि नोकरी" ही तारेवरची कसरत उत्तम रित्या सांभाळली.

मीरा, माझी धाकटी सून जेव्हा या घरी आली तेव्हा तिने घराला प्राधान्य देत पूर्ण वेळ गृहिणी व्हायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली.मला थोड आश्चर्य वाटलं, एमबीए फायनान्स शिकलेली, आजच्या विसाव्या शतकातली ही मुलगी घरा साठी करिअर करायचं नाही असं स्वतः आनंदाने सांगत आहे ?? मी तिच्या इच्छेचा मान ठेवला. आमच्या ह्यांना मात्र जरा खटकल!  त्यांनी मीराला आमच्या घरच्या उद्योगाचे हिशोब तपासण्याचे काम करशील का असे विचारले. मीराने देखील घर आणि पार्ट टाईम लेखा विभाचे काम उत्कृष्ट रित्या केलं, करत आहे!

माझ्या बहिणी, कधी माझ्या मैत्रिणी मला विचारतात, "वसू, कसं ग तू दोन-दोन सुनांना सांभाळते?" अरे,मी कुठली सांभाळायला, ह्या माझ्या लेकीच मला छान सांभाळून घेतात. मी ते सा.सू.( सारख्या सूचना) हा जो नावडता प्रकार आहे ना,तोच आमच्या तिघिंच्या नात्यातून पुसून टाकायचा प्रयत्न केला आणि करते. त्यांना हवी ती मोकळीक दिली,पण माऱ्यादा सांभाळून! त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावेत, घरात जेवायला काय करावं ते पैशांचे व्यवहार कसे सांभाळावे इथं वर सगळ त्याच करतात.माझी मदत किंवा मत विचारलं की मी आनंदाने   त्यांना मदत करते. काही वेळा मी त्यांना कान मंत्र देत असते. त्यांना सांगितलं, मुलींनो प्रत्येक व्यक्ती हि भिन्न असते, तुम्ही देखील वेगळ्या आहात. उद्या तुमची कोणी तुलना केली, काही बोलले तर ते मनाला लावून घेऊ नका.लोक हे दोन्ही बाजूने बोलणारे असतात. तुम्हा दोघिंमध्ये मैत्रीचं नात कसे टिकवून ठेवायचं हे तुमच्या हातात आहे. आपल्या घरात सुख आणि समाधान तुम्हां दोघींच्या रूपाने नांदणार आहे!

माझ्या ह्या दोन्ही लेकिंनी आमच्या ह्या घराचे गोकुळ केले. आमच्या " देशमुख सदन " ह्या गोकुळात नेहा- सागरला मम्मी पप्पा म्हणणारी,गोड रेवा आणि मीरा सलिल ह्यांना आई बाबा म्हणणारे गोंडस जुई आणि नटखट नील हे बाळगोपाळ आम्हा आजी आजोबांना आमच्या उतार वयात भरपूर प्रेम ,माया आणि जगण्याची प्रेरणा देत आहेत."

आपल्या आजीने हाक दिली ऐकून तिन्ही पिल्लं धावत आजीला बिलगली. पाठोपाठ नेहा आणि मीरा ह्या दोघींनी देखील त्यांच्या सासूला म्हणजे वासंतीताईंना आलिंगन देत म्हणल्या "ए आई.....बास ग आमचं कौतुक"!!वाढदिवसाला जमलेल्या सगळयांनी ह्या सासू सून त्रिकुटाचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

©तेजल मनिष ताम्हणे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Tejal Manish Tamhane

Home maker and Private Tutor.

Fun loving , Happy go Lucky person. Likes to write short stories and poems. Best friend of my daughters and a caring person at heart.