Nov 30, 2021
प्रेम

मखमली कवडसा ५ # शेवटचा मेसेज

Read Later
मखमली कवडसा ५ # शेवटचा मेसेज

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

मखमली कवडसा ही मालिका एक अशी कथामालिका आहे ज्यातली प्रत्येक कथा किंवा ललित हे वेगळं आहे त्याचा एकमेकांशी संबंध नाही पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे.
मनातल्या रेशमी कप्प्यातली ती सुखद भावना जिला मी मखमली कवडसा असं नाव दिलंय.
वाचून नक्की प्रतिक्रिया  कळवावी.????
मखमली  कवडसा- या मालिकेत प्रेमाचे असे मखमली कवडसे ललित लेखाच्या स्वरूपात आपणासमोर आणण्याचा मानस आहे, जे प्रत्येकाच्या मनात कुठेतरी मनातल्या गर्भ रेशमी कप्प्यात दडवलेले असतील!

शेवटचा मेसेज 

 

"तू सुखी रहा, अानंदी रहा आणि मजेत जीवन जग! लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात . . असं ऐकलं होतं. . म्हणजे ते किती खरं व किती खोटं . . देव जाणे! जुळलं तर या वाक्यावर विश्वास ठेवायचा व नाही जुळलं तरीही विश्वास ठेवायचाच! तू माझ्या नशीबात नाहीस त्यामुळे खंत करण्यापेक्षा समाधान मान की आपण काही काळ का होईना  सोबत घालवला!
शेवटी काय तर समाजात . . पैसा व प्रतिष्ठा महत्वाची आहे. . माणुसकी किंवा गुण नाही. . हे नाकारत  नसलेल्या सत्याला  मी आज स्वीकारत आहे.  तू ही स्वीकार कर आणि पुढे जा! पैसा, प्रतिष्ठा मी कमावीनच गं पण  त्यावेळी तू पुन्हा मिळणार नाहीस मला.
गुड बाय!"

मोबाईलच्या काळातही त्याने सुंदरशा लेटरहेडवर, सुवाच्च्य अक्षरात या ओळी लिहून तिला पत्र पाठवलं.

पाठवलं कसलं. . दिलंच!

तिथेच डोंगराच्या पायथ्याशी . . जिथे त्यांचं लहानपण गेलं. . . त्या टेकडीच्या उतारावर जिथं त्याची बालपणातून तरूण पणातली मैत्री झाली. . तासन तास गप्पा मारणे. . हसणे हसवणे. . कितीतरी आठवणी.

तिला मैत्री आणि प्रेम यातला फरक कळण्या आधी तो सावरला होता.
आर्थिक परिस्थितीचे चटके त्याला जाणवत होते.
आलिशान पाया उभारला असेल तर कितीही मोठी इमारत सहज बांधता येते. . कितीही मजले. . . पण काळ्या मातीतल्या खड्ड्यात इमारत उभी करायची तर मात्र भक्कम  पाया बनवेपर्यंतच अर्धे आयुष्य  निघून जातं. . हे सत्य त्याला कळंलं  होतं. . !

जाती भेदाशी तो लढलाही असता पण आर्थिक विषमता ?. . त्याच्याशी तो कसं लढणार किंवा कसं पटवणार ?
आणि घरातली अशी दरिद्र अवस्था पाहता त्याला शिक्षण सोडून नोकरी करणे भाग होते.

आज १०-१२ वर्षे लोटली. . ती तिच्या घरी सुखी होती आणि तो त्याच्या यांत्रिक  संसारात रममाण होता!

पण शेवटचा निरोप असा उल्लेख  कुठेही आला की  ती संदूकातल्या तळाही ठेवलेलं ते त्याचं पत्र आजही काढून पाहते . . सजल नेत्रांनी वाचते व एक दीर्घ श्वास घेवून  अश्रूंना वाट मोकळी करते.

तो प्रसंग आठवतो. . सिनेमाच्या फ्लैशबैक सारखा. .
मुळात त्याने शेवटचा निरोप आहे एकदा भेट हे सांगितल्यावर तिने त्याला हसण्यावारी नेलं होतं.
त्याने फक्त हात मिळवून पत्र दिलं. . डाव्या गालाचा गालगुच्चा घेतला व  बाय म्हटलं होतं. ती अजूनही हसत होती . . तो  मात्र. . अश्रू पुसुन निघून गेला होता.
तिला सगळी गंमतच वाटली. लहरीच आहे. . कशाला बोलावलं मग असं वाटलं.
मैत्रिणींसोबत  खेळण्याच्या  नादात. . पत्र खिशातच राहिलं. .  घरी गेल्यावरन वाचताच दप्तरात टाकलं.
आठ दिवस तो तिला दिसला नाही, भेटला नाही. . त्यावेळी तिने ते पत्र काढून वाचलं होतं . . .
त्यानंतर  तिचं त्याच्या या त्यागावर. . , या मोठेपणावर अन दूरदृष्टी वर प्रेम जडलं. . !

पण उशीर झाला होता. . ती मैत्री प्रेमच होती हे त्या शेवटच्या मेसेजने तिला शिकवलं होतं!

तो गज़ल छान गायचा. .   तिला त्याचा आवाज आवडायचा. ती गाण्याची स्टाईलही आवडायची.
कॉलनीच्या गणपतीत. . त्याने पेटीवर म्हटलेलं ते  जगजीत सिंग यांचं गाणं पत्र वाचल्यावर आठवायचं. . किती भोळी होते मी. . तो शब्द सांगायचा  आणि  मी धुन ऐकायची ना !

"प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी ।
मेरी हालात की आंधी में बिखर जाओगी॥"

त्याच्या मनातही ती एक दैवी प्रतिमा किंवा स्वर्गीय परी बनून राहिली. . जी आवडते पण मिळत नाही.  आज त्याच्याकडे खरच चांगली नोकरी , पैसा व प्रतिष्ठा आहे पण काय उपयोग..? तेव्हा नव्हता ना. खंत नाही.
आज त्याच्यासोबत संसारात  सालस पत्नी व गोंडस मूल आहे.
त्याने तिला शोधण्याचा किंवा भेटण्याचाही प्रयत्न  केला नाही.
शेवटचा निरोप लिहितानाच त्याने मनात सारं दुखं एकत्र एकवटलं होतं व निर्णय घेतला होता.
आता तिला शोधून किंवा भेटून त्याला त्याचं किंवा तिचं  आयुष्य  कॉम्प्लीकेटेड  करून घ्यायचं नव्हतं !

पण तो शेवटचा मेसेज किंवा शेवटचा निरोप दोघांच्याही मनातला मखमली  कवडसा बनून राहीला होता!

समाप्त
© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक - १२. ०५ .२१

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 24 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.