मखाना चे लाडू

ही रेसिपी घरी एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगा

नमस्कार मैत्रिणींनो,

आज आपण पाहणार आहोत मखानाचे लाडू.मखाना हा कमळाच्या बियांपासून बनवलेला लाही प्रकार आहे. मखान्यांमध्ये प्रोटिन्स, फायबर्स, मिनरल्स खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पूर्वीच्या काळापा‌सूनच बाळंतनीला मखान्याचे लाडू, खीर, हलवा दिला जातो. आजही काही ठिकाणी बाळंतिणीला मखण्याचे पदार्थ खायला दिले जातात.परंतु, खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे चला तर मग बघूया मग मखाण्याच्या लाह्यांचे लाडू 

साहित्य:-

दोन वाट्या बारीक केलेला मखाना, पाव वाटी काजू, पाव वाटी बदाम,पाव वाटी किसमिस, पाव वाटी खोबऱ्याचा कीस, पाव वाटी तूप, अर्धी वाटी खजूर,(बिया काढून टाकाव्यात,)वेलची पावडर आणि पाव वाटी गूळ 

कृती:-

प्रथम खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा त्यानंतर काजू बदाम तुपामध्ये भाजून घ्यावे नंतर त्याच तुपामध्ये मखाना भाजावा.मखान्याचा चुरा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड घालावी. काजू बदाम मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून घ्यावे व सर्व साहित्य एकत्र करावे. त्यानंतर किसलेला पाव वाटी गूळ घालावा. सर्व मिश्रण एकत्र करून व्यवस्थित मिसळावे व हव्या त्या आकाराचे लाडू बांधावे.

मखान्याचे हे लाडू खूपच पौष्टिक असतात. यामध्ये प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्व असतात. तसेच हे लाडू महिनाभर चांगले टिकतात.

वाचकांना विनंती आहे पोस्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नये तसेच कॉपी-पेस्ट करू नये नावासकट शेअर करावे