मखाना खीर

मखाना खीर

मखाना म्हणजे कमळाच्या बियांपासून बनविलेल्या लाह्या. म्हणूनच मखाना थोडा महाग असतो. यात प्रोटीन्स, फायबर्स, मिनरल्स खूप जास्त प्रमाणात असतात.

मखाना खीर

साहित्य

दोन वाट्या मखाना,  अर्धा लिटर दूध, एक वाटी साखर, थोडे तूप, दोन चमचे दूध पावडर, अर्धा चमचा विलायची पूड, काजू बदाम पिस्त्याचे काप, थोडी चारोळी.

कृती

कढईत थोडे तूप टाकून मखाना भाजून घ्या. थोडा थंड झाल्यावर लगेच मिक्सरमधून काढून घ्या. नंतर पुन्हा कढाई मध्ये तूप टाकून ती पूड किंचीत भाजून घ्या. त्यात गरम दूध टाकून चमच्याने फिरवत राहा. चांगली उकळी आल्यावर दूध पावडर टाका.   साखर टाका. आणखी एक दोन उकळी आल्यावर गॅस बंद करा व वेलची पावडर, काजू बदामाचे काप व चारोळी  घाला. ही खीर खूप टेस्टी व पौष्टिक असते.


मखान्याचे लाडू

साहित्य

दोन वाट्या मखाना पूड, काजू बदामाचे काप प्रत्येकी अर्धी वाटी, खोबरा कीस अर्धी वाटी, बिनबियाचे खजूर एक वाटी, थोडी वेलची पूड.

कृती

प्रथम थोड्या तुपात काजू, बदामाचे काप व खोबऱ्याचा कीस भाजून घ्या. त्याच तुपात मखाना पूड भाजून घ्या. आता वरील सर्व साहित्य एकत्र करा.  व  लाडू वळा. हे लाडू फारच पौष्टिक असतात.(जास्त गोड पाहिजे असल्यास थोडी पिठीसाखर ही घालू शकता.)