९. गुपित

मनात दडवलेलं प्रेम सर्वांना कळतं तेव्हांची भावना !


(मखमली कवडसा ही मालिका एक अशी कथामालिका आहे ज्यातली प्रत्येक कथा किंवा ललित हे वेगळं आहे, त्याचा एकमेकांशी संबंध नाही पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे.. . प्रेम!
मनातल्या रेशमी कप्प्यातली ती सुखद भावना जिला मी मखमली कवडसा असं नाव दिलंय.
वाचून नक्की प्रतिक्रिया कळवावी.?)

मखमली कवडसा -९ # गुपित

"एकदा ये ना , तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय !"
माझ्या फोनवरच्या एका वाक्याने तू घरी यायचं कबूल केलंस . . तब्बल दोन वर्षांनंतर!
ती दोन वर्षे कशी काढली ते विचारू नकोस. अनुकूल. प्रतिकूल परिस्थितींतही,संकटातही केवळ तुझ्या आशेवर स्वतःला राखून ठेवलं. . तुझी अनामत असल्यागत!. . . अगदी कमळ चिखलात अलिप्त राहतं ना रे . . निर्मळ. . तसेच!
शक्यतातशा दोन्हीही होत्या तुझ्याकडून . . . . . सकारात्मक (होकार) आणि नकारात्मक (नकार). . पण मी आशावादी आहे रे?
तू आल्यावर, भेटल्यावर काय- काय करायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं हे कित्येक महिन्यांपासून मनातच ठरवत होते . . आखत होते, फक्त तू यायचा बाकी राहिला होतास!
;सकाळी कळालं तू आलास. . . मला भेटल्याशिवाय जाणारच नाहीस ही खात्री असूनही नकारात्मक विचार डोकावलाच !
समजा तू तसाच गेलास तर . . . . मन हे असं वेडं असतं, कुठल्याही परिस्थितीत मला आता विरह किंवा दुरावा नको होता; म्हणून मीच फोन केला.
;साडेसातला तू; जाणार होतास.  परत कधी माहीत नाही . . . किती महिन्यांसाठी . . की वर्षांसाठी?
तू साडेपाचची वेळ दिलीस. .  काहीही करून या वेळी मात्र तुला; निसटू द्यायचं नव्हतं. .; गमवायचं नव्हतं !
आजच बाहेरची खूप कामही होती. .; तरीही ती लवकर संपणार होती. .; वेळेचं भान मी; नेहमी ठेवायचे नाही. आज का कुणास ठाऊक मन घडय़ाळाच्या काटय़ाला बांधलं गेलं होतं.
मी जशी घड्याळाचा सेकंद काटा झाले होते. अस्थिर. . .; सैरभैर . .!
बाहेरून येताना रोज थकवा असायचा . . . . . . . . आज उत्साह नसा नसात भिनला होता
थोडीफार खरेदीही करायची होती.
आज मी इतकी हलकी का झाले . . मलाही कळत नव्हतं पण जाणवत मात्र होतं.
दुसर्या परिचितांशी औपचारिक बोलण्यातही मी वेळ घालवला नाही.
नुसती धावपळ! कारण नजरेसमोर तू दिसत होतास ना!
फक्त तो शरीराने दूर असूनही एखाद्या व्यक्तीविषयी असलेलं प्रेम दोन वर्षांनंतरही चाहुलीने देखील इतकं मोहरून जाऊ शकतं . . हे मी अनुभवत होते. . . ! कारण तू माझं साध्य होतास . . माझ्या आयुष्याचं ध्येय होतास. . . माझ्या दृष्टीने तरी !
घरी परतले पण पुन्हा मनात एक कळ उठली.
घरातली सगळी ठेवण. . मी बदलली.
तुला आवडेल असंच घर सजवलं!
माझ्याशी बोलण्यातच तुझा वेळ जाईल . . . घराकडे. . .सजावटीकडे . . पाहण्यात तू वेळ घालवणार नाहीस  हे माहीत असूनही मी इतकी काटेकोर व्यवस्थाबका करीत होते. . ? एक मनमोहक सखोल. . . विचार . .; तुझ्या येण्याचा !
घरावरील भिंतीवरही त्याचा परिणाम; झाला जणु! मी पडदेही बदलले
कुणालाही आवडेल अशी दिसत होती माझी बैठक!
;माझं मलाच क्षणभर कौतुक वाटलं.
तुझ्यासाठी विणलेल्या सहा रुमालांचा सेट मी टेबलावर कोपर्‍यांमधे ठेवला. ; तुझ्या लक्षात येईल असा!;
तू पहावेत म्हणून दोन- तीन मासिकं पाक्षिकही छान मांडून ठेवली . . सगळं कसं मनाजोगं झालं होतं
तू यायला अर्धाच; तास शिल्लक होता.
माझी धावपळ पाहून आई गोंधळात पडली होती, "कुणी येणार आहे का गं? विशेष! "आईने दोनदा विचारलं.
"नाही गं सहज घर आवरलं . .नेहमी म्हणतेस न आवराआवर करायला; वेळ नसतो म्हणून !
स्वतःलाही आवरायचं होतं. ; काय परिधान करावं. .; साडी की ड्रेस?
नको काही सण सोहळा नाहीय. . पण आई विचारेल . . कारण? तुलाही आवडायचं नाही,
मी जास्त सजलेली !
तुला कसं सगळं सोबर आवडतं.  साधं सुधं देखणं. . हलकं फुलकं साधंच पण व्यवस्थित. . !
मी फिका अबोली रंगाचा ड्रेस घातला.  तुला आवडतात म्हणून हात भरून बांगड्या, मोठी टिकली, सगळंच साधे पण आकर्षक !काहीही व्यक्त केलेले नसतानाही आपण एखाद्या माणसाच्या आवडीनिवडीचा विचार का करतो . कळत नाही?
सकाळपासूनच्या धावपळीने, दगदगीने थकले होते !
तू येणारच होतास पाच- दहा मिनिटांत !
बसल्या बसल्या तुझी वाट पाहत सहज मी स्वतःला पलंगावर झोकून दिलं। . . . .
थोड्यावेळाने तू आलास . . उडत यावास तसा. . अगदी मूर्तीवत. .किती छान बोललास माझ्याशी !
माझ्या इतकाच तू ही आतुर होतास माझ्यासाठी !
तुझं स्टँडर्ड राहणीमान. .; मला आवडणाऱ्या; रंगाच्या कॉम्बिनेशन्सचं ड्रेसिंग!. . माझ्या आवडत्या परफ्युमचा घमघमाट . .!
तुझ्या येण्याने सगळ्या घरात सुगंध!
इतक्या दिवसांची प्रतीक्षा सफल झाली .तू मला सहज जिंकलस शब्दांत !. . किती अलगद व्यक्त केल्यास तुझ्या भावना !
माझ्या इतकंच घराच्या सजावटीकडेही तू लक्ष दिलंस !
शब्दांनी गौरवलस मला. . मी सुखावले धन्य झाले!
हळूच निशिगंधाची वेणी टेबलवर ठेवलीस!
तू निघालास तेव्हा मी आर्द्र स्वरात म्हणाले - जाऊ नकोस ना रे! अन आश्चर्य !
तू जाण्याचा निर्णय रद्द केलास. आता मात्र मी मुक्त हसले . . गळ्यातल्या मोत्याच्या माळे इतकीच मोहक!
तुझा हात त्या सहा रुमालांच्या सेटवर ठेवलेला पाहून माझ्या चेहर्‍यांवर हसू तरळलं. . . आणि मी अलगद उठले!
मी उठले. . शरीर हलकं झालं होतं . . पण पुन्हा जड झालं!
डोळे किलकिले करून मी घड्याळाकडं पाहिलं!
सव्वा सहा झाले होते. . म्हणजे ?
म्हणजे तू आला होतास की आलाच नाहीस?;नेमकं कुठलं सत्य होतं?
तू येऊन गेल्याचे काहीच पुरावे दिसत नव्हते.. . . .काहीच नाही !
रुमालाचा सेट ही जिथल्या तिथेच पडून होता. . उदास!
;इतकंच काय तू आणलेली निशिगंधची वेणीही तेथे नव्हती! .  मला उमजेचना !
म्हणजे मी स्वप्न पाहिलं होतं का . . डोळे मिटून स्वप्न पाहिलं?
म्हणजे मी झोपले. .अर्थात तो आला नव्हता तर मी कावरीबावरी झाले अन् इतक्यात आई आली.
" वारे वा झोप तुझी? अर्ध्या पाऊण तासापूर्वी  बाइकवर कुणी मुलगा आला होता. . !
"आणि मी कुठे होते? "मी अचंबित. . मधेच बोलले.
आई जरा घुश्शातच बोलली. .  झोपली होतीस ना. ; बसल्या बसल्याच; पडलीस! मी सांगितलं ती झोपलीय . . तो म्हणाला झोपली असेल तर उठवू नका! मी येऊन गेलो म्हणून सांगा!;
मी जोरात ओरडता-ओरडता राहिले. . ; अगं आई पण. . ??
; काही खास काम होतं का त्याच्याकडे ;आईचा खोचक स्वर.
;नाही खास काही नाही. .
;मी पुतळ्याप्रमाणे स्तब्ध झाले.
;मनात. . बुद्धी। . ; हृदयात काहूर माजलं !
सगळं कसं जमून आणावं आणि पापणी मिटेपर्यंत; आणि मी; एका वार्‍याच्या झुळकेनं मुठीतून  वाळुप्रमाणे निसटावं!
;सगळं सगळं गमावल्यागत झालं. . मनातले सगळे मनोरे एकदमच ढासळले जणू आयुष्यात भूकंप झाला!
आता तो गेला . . मला पुन्हा कधी भेटेल ?
त्याच्या बाबतीत मी बिलकुल गंभीर नाही हे त्याला कळलं
यादरम्यान सगळ्यांचा दबाव आला तरीही स्वत ला मी दोन वर्ष राखलं होतं . . आता मी त्याचीअमानत राहू शकत नाही.
सगळ्या जुन्या आठवणी मनामध्ये पिंगा घालू लागल्या !
तू खूप वेळेचा प्रॉम्प्ट.  बरोबर वेळेवर तो आला होता . . मी त्याला गमावला. .  या अपराधाची किंमत साधीसुधी नव्हती । आयुष्याचा खेळ हरले होते!
तुझ्यासाठीची जी भावना माझ्या मनात आहे ती डोळ्यातून आपसूकच बाहेर पडू लागली. . अश्रूंच्या रूपाने!
१० मिनीट मी त्याच अवस्थेत पडून राहीले. . आई आत निघून गेली काहीही न बोलता.
आयुष्याचा . . आणि मनाचा इतका मोठा खेळ मी जुगाराप्रमाणे हरले होते.
फोन खणाणला. . बोलण्याचीही इच्छा नव्हती कुणाशी. . तरीही फोन उचलला.
; हॅलो. . बोला . . कोण?
;ही चांगली पद्धत आहे तुमची. . आमंत्रण; देऊन झोपा काढायच्या. . काय विचार आहे मग. ; आम्ही गरीबाने जावे का परत. . की यावे भेटायला. . ?";
"तसं नाही. . ते चुकुन. . सॉरी अहो. . मी तुमचीच वाट पहात होते. . प्लीजऽ. . भेटल्याशिवाय जाऊ नका ना!
किती आर्जव होता आवाजात . . मला पुन्हा जणु जीवदान मिळालं होतं.
" अगं हे सांगायला फोन केला होता की. . सॉरी. . मला यायला उशीर झाला. . . मावशीकडेच आहे अजून. . सात वाजेपर्यंत; येईन तुझ्याकडे. . !
आई दारात मिश्कीलपणे हसत उभी होती.
; मग तुमची गाडी होती ना आठ वाजता. . इतक्या घाईत???;
; अगं इतकं काय टेंशन घेतेस. . गाडी कॅन्सल. . जाणं कॅन्सल. . . इथली नोकरी पक्की झालीय, आताच कळाले. . तू जा म्हणेपर्यंत; आणि तुझं महत्वाचं बोलणं होईपर्यंत; मी जाणार नाही. . !; तो खळखळून हसला.
; अरे. . पण. . ते???; मी गोंधळले.
येऊ ना. . . की नको. ; काकूंना सांग गरम कांदा भजी करायला. . येतोच आहे. . आणि आवर ना लवकर. . की अशी झोपेतच बोलणार आहेस माझ्याशी ?;
मी कावरी बावरी! आईला हसताना पाहून कळालं की हे वेगळंच प्रकरण आहे.
माझ्या आईला व त्याच्या मावशींना; आमच्याबद्दल कल्पना आहे तर सगळी. . !
मी उगीचच; दोन वर्ष ज्याला गुपित म्हणून जपलं ते . .तर तो ही ओळखून होता!
मी लाजून आवरायला आत गेले!

समाप्त


© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

🎭 Series Post

View all