माझ्याशी लग्न करशील भाग 2 अंतिम

Majhyashi
तितक्या तो वेटर त्या वाईंच्या bottles घेऊन येतो ,आणि करन त्या bottles हातात घेतो, तर हलकी हलकी, सुमेधा सारखी दिसणारी कोणी तरी दिसते...त्याच्या कडे चालत येतांना... तोच छान हवेत लहरणारा तिचा तो ड्रेस...तेच ते लांब मोकळे सोडलेले केस...तिची चालण्याची लकब पाहून तो guess करतो, ही तर सुमेधा आहे.. आणि ती आपल्या कडे तर येत आहे...

त्याला ती आली आहे परत ,बहुतेक तिला माझी दया आली असावी..आणि पुन्हा जुळवायला आली असावी...मग त्याच्या मनात लाडू फुटा...दिल गार्डन गार्डन हो गया...चेहरा खुलला त्याचा...नसत्या गुन्ह्यात फसला होता..नसत्या गुन्ह्याची शिक्षा तिने सुनावली होती... तिच्या ह्या सुनावणी मुळे असे वाटते होते की फाशी बरी..

तो..त्या बॉटल्स घेऊन तरी तसाच उभा होता...जणू तो आता परत घेतो की काय ड्रिंक अशी त्याची एकंदर पोज होती...त्याला ते कळत नसले तरी लांबून बघणाऱ्या सुमेधाला पुन्हा तोच गैरसमज झाला होता...तिच्या बघण्याचा एकंदर दृष्टीने तेच वाटत होते...

तो तिच्या कडे बघत बघत तिच्या कडे जात होता,दोन हातात दोन बॉटल्स होत्या..ती बघत होतीच त्याच्या त्या अस्वथे कडे...पुन्हा वाटले हा पक्का पिणारा ,व्यसनी माणूस आहे...ह्याची दया कशी आली मला...ह्याने तर किती विनंती केली होती बाहेर मला आणि मी जाताच पुन्हा एक सोडून दोन bottle हातात घेऊन माझ्या समोर उभा आहे निर्लज्जपणे..हा सुधरणाऱ्यातला नाही..आणि ती पुन्हा माघारी फिरते...आल्या पाऊली...तो तिला येताना पाहून जितका खुश असतो तितकाच तिला जवळ येऊन परत माघारी फिरताना पाहून दुःखी..त्याला कळले नाही...ही अशी का वागते...रुसून लग्न काय मोडते...मग पुन्हा काय येते...मग मला पाहून पुन्हा माघारी फिरते...हे प्रकरण गूढ आहे...

तो लगेच हातातल्या बॉटल्स सहीत तिच्या मागे पळतो...पळता येत नाही म्हणून बॉटल्स त्या table वर ठेवतो आणि पुन्हा तिला पळत पळत गाठतो..धाप लागते...आणि शेवटी तिला थांबवतो..तिचा हात पकडतो...ती हात झटकून टाकते आणि हात पकडला म्हणून त्याचा।कानाखाली लावते... बिचारा अजूनच आश्चर्यकारक नजरेने तिच्या कडे बघतो...सगळे लोक त्याच्या कडे बघतात...जणू कोणी चोर मवाली मुलीला छेडत आहे...तिला त्याने हात धरून थांबवले आणि तिने तडक तोंडात ठेवून दिली हे सगळे बघत असणारे पुढे आले..आणि त्याला चांगलेच सुनावले..


कोणी तर त्याला मारणार आणि प्रकरण वाढणार...हे पाहून सुमेधा पुढे आली आणि तीने त्यांना सांगितले, विनवणी केली की हे आमचे व्यक्तिक मॅटर आहे...तो माझा होणारा नवरा आहे...आणि मी त्याच्यावर रुसलेली होते...मग त्याने मला खूप समजवण्याचा प्रयत्न ही केला...पण मी ऐकत नाही आणि निघून जात आहे हे पाहून त्याने मला थांबवण्यासाठी माझा हात पकडला बस इतकेच...आणि अचानक माझा तोल गेला आणि मी त्या रागाच्या भरात एक ठेवून दिली..म्हणजे मला माझ्या नवऱ्याला सांगायचे होते.. की मग तू मला असाच हात धरून पहिलेच का नाही थांबवले...मी तेव्हाच तुझी वाटत बघत होते...जर तू तेव्हाच मला थांबवले असते.. माझा असाच हात धरला असता तर मी तुझ्यावर रागावले नसते... पुन्हा सोडून निघून गेले नसते.. आणि ना मी तुझ्यावर हात उगारला असता... त्याने ह्या रागात मग वाईन घ्यायला सुरू केली ते ही मी नको म्हणत असताना... बघा ह्या नवऱ्याला हे असे वागणे शोभते का..? नाही ना..!! आणि मला आवडत नाही दारू आणि त्याचे व्यसन करणारा..मग भले ही तो माझा नवराच का असेना..."

ती हसत हसत सगळ्यांना सांगत होती, हा माझा।नवरा आहे..तेव्हा त्याचे तोंड बघण्यासारखे झाले होते... कशी आहे ही मुलगी...आधी लग्न मोडून आता सगळ्यांना सांगत फिरते हा माझा नवरा आहे... कोणत्या प्रकारची आहे ही ...ही डोक्यावर पडली आहे हे नक्कीच...किंवा हिलाच चढली आहे.. आता हिला सांगूनच टाकतो..मलाच हे लग्न करायचे नाही...गेली उडत...

तो... ए, काय काय बरळतेस तू..तू घेतलीस का थोडी..कोण नवरा, कोण बायको..मी तुझा नवरा नाही...तुला रुसायचे असेल तर खुशाल रुस..मी तुला काडीचा ही भाव देणार नाही...मीच हे लग्न करणार नाही आता..अशी विक्षिप्त बायको मला नकोच...

ती... अरे आता मी ह्यांना सांगितले तूच माझा नवरा आहे, मग असा कसा तू निघून जाशील..इतके सोपे नाही हो...आपले ठरलेले लग्न मोडणे...हो आणि मी आता सांगितले तू माझा नवरा आहे म्हणूनच तू वाचला आहेस. आत्ता जर सांगितले की हा मला छेडत आहे आणि ह्यानेच मला धमकी देऊन सांगायला लावले की मी तुझा नवरा आहे असे सांग नाहीतर मी तुला एकटीला रस्त्या गाठून छेडत राहील..मग मग बघच तुझी अस्वथा काय होईल..तर मग आता लग्न पुन्हा जोडते मी...तुलाच माझा नवरा म्हणते मी...तू किती ही दारुडा असला तरी मान्य आहे मला...मग मी ही घेत जाईल तुझ्यासोबत थोडी थोडी.../ त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणते / चल त्या वाईन च्या bottles आन, किंवा आपणच तिथे बसू...थोडी तू घे थोडी मी घेते... जाऊदे ते संस्कार...मी बाबा मॉडर्न आहे.. मला ही ह्या नवऱ्यासोबत जर जुळवून घ्यायचे असेल तर मला त्याचा सवयी सोबत..त्याला जडलेल्या व्यसणासोबत जुळवून घेणे भाग आहे.. ते माझे कर्तव्य आहे..हो ना...त्याच्या सोबत सात फेरे घ्यायचे आहेत..सात जन्म काढायचे आहेत...मग कश्याला लपून छपून घ्यायची..आता तुझ्या सोबतच घेत जाईल.."

तो...तिचा हात झटकतो..आणि तिला शुद्धीवर आणतो...एक ठेवून देतो...

लोक पुन्हा बघतात...बघतात...आणि मग कोणी त्यांच्या भांडणात भाग घेत नाहीत...म्हणतात दोघे ही नवरा बायको येडे दिसतात.. दोघांना ही चढलेली दिसते..

ती... तू गम्मत करू शकतो तर मी का नाही करू शकत तुझी गम्मत...मला माहित आहे तू साधी सोपं सुपारी ही खात नाहीस..मग तू ही वाईन कसा घेत असशील...मला तुझ्या मित्रांनी तुझा प्लॅन तुला भेटण्या आधीच सांगितला होता..मग मी ही ठरवले तुला थोडा त्रास द्यायचा

तो... oh ,तर ही गम्मत होती तर...

तो कान पकडतो आणि तिला सॉरी म्हणतो. मी चुकलो यार..हे आडून आडून काही विचारण्यापेक्षा तुला विश्वासाने विचारायला हवे होते.. म्हणजे अशी फजिती झाली नसती..

ती.. लगेच तिच्या जवळ असलेले फुल घेते आणि त्याला प्रोपोज करते...डायरेक्ट लग्नासाठी..
?
" will you marry me "

तो... always dear..



🎭 Series Post

View all