माझ्याशी लग्न करशील भाग 1

Majhyashi


लग्नाच्या आधीच धाक कसा तो पहा..

तो..... ए जरा तू थोडी वाईन घेऊन बघ ना...taste करून बघ ना जराssss शी..मस्तच असते...

ती..... त्याच्या हातातला ग्लास घेते...ओठाला लावण्यासाठी जवळ घेऊन जाते ,आणि खाली सांडून देते...

तो लगेच ओरडतो... काय हे तुला काहीच वाटले नाही..किती महागाची आहे ती तितकी ही वाईन..

ती..... हिच्यात असे काय आहे जे जीवनात नाही

तो.....अग आता तू मला हा विषय सोडून बोल, कारण मी तुला याबद्दल काही ही सांगू शकणार नाही.. आणि मी वाईन सोडणार नाही..सोडू शकणार नाही..

ती... मग मला ही विचार करावा लागेल..

तो....कसला विचार, काय बोलतेस तू ..?

ती.... तुला सोडून देण्याचा... कारण मला माझ्या आयुष्यात एकच व्यसन माहीत आहे ते म्हणजे एकमेकांवरील विश्वास....

आयुष्याची सुरुवातच जर व्यसनाने होत असेल आणि ते व्यसन हेच तुझे आयुष्य असेल आणि हे असले व्यसन तुला आपल्या नात्यापेक्षा जवळचे असेल...ते तू सोडूच शकणार नसेल तर मला हे लग्नच नको आहे..

तो.... मला माझ्या आयुष्यात काही गोष्टी मध्ये कोणी ही लुडबुड केलेली आवडणार नाही मग ती व्यक्ती किती ही जवळची किंवा महत्वाची असो... मी तुझ्या आयुष्यात ढवळा ढवळ करणार नाही तशी तू ही करू नकोस.... आणि भ्रमात राहू नकोस की प्रेमाने ही तू माझ्या सवयी मध्ये बदल करशील...

ती.... बरंच झालं तू हे आत्ताच संगीतलेस...कारण लग्न आणि हे नाते तुझ्यासाठी खेळ असेल ही पण माझ्यासाठी न मोडता येणार संसार असेल...पण वेळेत तू हा संसार व्यसण्यापूर्वी मला तुझ्या स्वभावाची आणि सवयीची कल्पना दिलीस ते एक प्रकारे उत्तम झाले....म्हणजे आता माझा आणि तुझा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे असे मी स्वतः जाहीर करते, आणि हे लग्न मोडले असे समजते...मी भले ही किती ही मॉडर्न असेल पण दारू ,सिगारेट, वाईन या सारखी व्यसन जी गोष्ट माझ्या आयुष्यात ही आली नाही आणि ना मी माझ्या संसारात येऊ देईल....आणि अश्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या कोणत्या ही मुलाशी मी लग्न करणार नाही, ज्याला हे असल्या काही वाही प्रकारचे व्यसन जडलेले असेल आणि तो त्यात मुरलेला असेल....

ती लगेच उठते आणि तिथून चालायला लागते, ती जरा ही दुःखी नसते, ना तिला लग्न मोडल्याची कुठली खंत असते... तिच्या डोळ्यात त्याला तो ठामपणा दिसतो...एक चमक दिसते...तिला पारख करण्यात त्याने कोणती ही चूक केली नाही ,हे त्याला समजते...

त्याने रचलेला डाव हा अगदी सहज यशस्वी ठरला...त्याला ही कळले तिला कोणते ही व्यसन आवडत नाही... ती ही ह्या मॉडर्न युगातील मुलगी आहे परंतू तिला व्यसन आवडत नाही पण या उलट व्यसन करणारी व्यक्ती नवरा म्हणून ही आवडणार नाही म्हणते, म्हणजे आता तिचा माझ्या बाबत झालेला गैरसमज दूर करावा लागेल, नाहीतर ती हे समजून बसायची की मी पूर्णपणे वाया गेलो आहे.


हे त्याचे वागणे पाहून तिने जाहीर केले आता मीच हे लग्न मोडत असून मला हे लग्न करायचे नाही. यार ती जर घरी गेली आणि तिच्या घरच्यांना सांगितले तर सगळा प्लॅन माझ्या अंगलट येणार हे पक्का.. त्या त्यांनी बाबांना सांगितले तर माझी उलट तपासणी सुरू होईल. माझ्या मागे मग गुप्तहेर लावतील माझ्या घरचे.

ती म्हणून गेली त्यात तथ्य आहे असे वाटते.. तिला अशी व्यक्ती तर तिच्या आजूबाजूला नकोच पण अशी नशेडी व्यक्तीसोबत कोणत्या ही प्रकारचा संबंध ही नको..

तीने लग्न मोडतांना सांगितले होते ,अशी तसेच ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ही कोणते ही व्यसन जडू देणार नाही....किंवा त्याला तशी परवानगी ही देणार नाही....आणि त्याला असे काही व्यसन जडले तर ती त्याला त्यासाठी साथ देणार नाही..आणि मला ही अशीच कडकलक्ष्मी हवी आहे संसार करायला.... जी मला नीट सरळ करू शकेल.... माझ्या आयुष्याचा मार्गावर काळजीपूर्वक आणि प्रेमापोटी साथ देईल....जिला माझ्या आयुष्याची किंमत असेल...जी नात्याची किंमत ...आणि आयुष्याची किंमत करत असेल...


तो तिच्या मागे पळत पळत गेला आणि तिला मागून गाठत तिचा हात हातात घेतला... तिच्या समोर खाली गुढग्यावर बसला....आणि बाजूला ठेवलेला गुलाब घेऊन तिला propse करतो....


ती बघतच रहाते.... आजूबाजूला असलेले लोक त्याच्याकडे बघत असतात.... आणि तो तिच्याकडे आशेने बघत असतो...की ती होकार देईल....ती कधी बाजूला बघते... तर कधी त्याच्या कडे....तिला कळत नाही की हा काय प्रकार आहे.... हा असा काय वागत आहे... आताच तर मी ह्याला नकार देऊन आले... ह्यांच्याशी जमलेले लग्न मोडून आले आणि असा हा चमत्कारिक का वागत आहे.... हा वेड्या सारखा का सगळ्यांसमोर मला खजील करत आहे...याला सांगून आले होतेच ना मी ,लग्न मोडले आहे... मग ह्याने हा तमाशा का करावा... जर आपल्या गुणांनी आपण पात्र ठरत नाहीत तर मग ही दिखाव्याचा ड्रामा कश्याला... मला गुंतायचे नाही एका अश्या माणसां सोबत की ज्याला व्यसन हवंय ,आणि नवीन होऊ पाहणारी बायको नको...तिचे मत तिने आपल्यावर विनाकारण लादायला नको...समजले मला आणि म्हणून हा गुंता होण्याआधीच तो आधीच तुटलेला बरा...आणि मी ही तेच केले....सांगेन मी बाबांना की हे नाते नकोय....असला आगाऊ मुलगा, व्यसनी माणूस नवरा म्हणून नकोय...अजूनही किती तरी स्थळे येतील ,हाच दिवा का हवाय लग्नाला...( ती त्याच्या कडे बघत तर कधी बाजूला नजर फिरवत होती...एक मोठा सुस्कारा सोडला ,आणि हात हळूच काढत ती म्हणाली )

"हे बघा मिस्टर करण,आधी तुम्ही उठा आणि कृपया हा तमाशा थांबवा... तुम्ही ड्रिंक केली आहे...नशेत आहात तुम्ही, आता तुम्हाला शुद्ध नाही...म्हणून तुम्ही काही वाही बरळत तर आहातच पण हे असे काही विचत्र वागत आहात तर त्यामुळे लोक आपल्याकडे बघत आहेत... आणि मला हे तुमचे बावळट वागणे अजिबात पटत नाही...मला अजून हे सहन होत नाही...सहन होणार नाही....मी एक निर्णय घेतला आहे ,आणि त्यानुसार मी तुम्हाला माझा निर्णय सांगितला आहे....लग्न मोडल्या बाबत....तुमच्या लक्षात नसेल...मग परत एका मला तुमच्या सोबत लग्न करण्याची आता अजिबात इच्छा नाही.... म्हणून माझ्या मागे येऊ नका....कारण आता त्यात जरा ही बदल होणार नाही...इतका की, तुम्ही जरी म्हणालात की, मी माझे हे व्यसन सोडतो ,वैगैरे वैगैरे तरी मी आता माझ्या निर्णयाला तडा जाऊन त्यात माघार घेणार नाही...कारण एक व्यसनी धुंदीत वचन देतो आणि मग धुंद उतरली की पुन्हा व्यसन सुरू करतो ह्या तिळमात्र ही शंका नाही....सो कृपया आता तुम्ही उठा आणि आपल्या बुक केलेल्या खास table वर विराजमान व्हा.... तुमची वाईन जी वाया गेली आहे त्याचे पैसे हवे असतील तर ते मात्र मी देते...कारण ती खूप महागडी वाईन असेल हो ना.../बुंद बुंद की किंमत होती है.../"

ती तिच्या पर्स मधून काही पैसे काढते आणि त्याला उठायला सांगून त्याच्या समोर हात जोडून त्याला वाया गेलेल्या वाईन ची भरपाई म्हणून पैसे
देते...

" मिस्टर करण तुम्हाला भेटून फार छान वाटले, आणि आयुष्य थोडक्यात एका व्यसनाधीन व्यक्तीच्या आयुष्यात जाता जाता वाचले... इथे भेटलो पण पुन्हा कुठे ही भेटू नका... मला माझ्या ह्या निर्णयावर ठाम विश्वास आहे ,आणि तसा माझ्या आई बाबांना मी निवडले त्या मुलावर ,किंवा मी रिजेक्ट करेन त्या मुलाबाबत त्यांना जरा ही खंत नसणार... भले ही तो किती ही सौजवळ ,सभ्य असो....त्यांना आज आता मी सांगणार आहे...मी लग्न मोडूनच घरी येते...तोंड गोड करण्यासाठी चहा ठेवा...."

तो.... मला बोलू द्याल असे वाटत नाही...जरा मला बोलू द्या...मी काय म्हणतो ते ही ऐका, ऐकल्यावर मग तुम्ही ठरवा...उगाच एका सभ्य माणसाला गमवल्याचे दुःख होईल नाहीतर नंतर...तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो थोडा वेळ पोस्टपौंड करू शकाल का...कारण तो तुम्ही खूपच घाईत घेतला आहे...प्लीज, माझ्यासाठी .."

ती..." माझा निर्णय अगदी योग्य आहेच आणि योग्य वेळीच घेतला आहे, न घाई करता घेतला आहे...मी परिणाम बघून ,सारासार विचार करून ,लक्षपूर्वक निर्णय घेतला आहे.. मी बरोबर की चूक हे ठरवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे, कोणी दिला आहे हा अधिकार...आणि हो नकार दिल्या नंतर ही अधिकार गाजवत आहात ह्या सबळ कारणावरून ही मी लग्न मोडले हे बरेच केले, आता हे माझे ठाम मत आहे... आणि काय म्हणालात , /तुमच्यासाठी मी थोडावेळ पोस्टपौंड करू हा निर्णय / कोण तुम्ही माझे, कसा हक्क गाजवताय माझ्यावर तुम्ही..."

त्याने डोक्याला हात लावला, किती वेळ तिच्या समोर गुढग्यावर बसून त्याला आता अवघडल्या सारखे होऊ लागले होते...त्या टाईल्स वर असलेले खडे टोचू लागले होते... त्याला एक खडा टोचला होता...आणि जोरात कळ निघाली तसा तो...ओरडला...आईssss ग !!!


तिने त्याला हात धरून उठवले.. आणि त्याला बाजूला बसायला सांगितले...तो अणकुचीदार खडा टोचल्याने त्यातून जरा रक्त निघाले... तिला ते दिसले आणि ती तरी त्याला सोडून बाहेर निघून गेली...

तो तिला बोलवत राहिला... यारsss सुमेधा ऐक तरी...एकदा तरी माझी बाजू समजून घे.... अग मी तुझी परीक्षा बघत होतो... अग मी खरंच कुठले ही व्यसन करत नाही ग....मला वाटले की तुलाच जर कसले व्यसन असेल का.... तू ह्या सगळ्या गोष्टींची आदी आहेस का....?...आणि बघ तुझी परीक्षा बघता बघता ,माझी नापास व्हायची वेळ आली....मीच नापास झालो तुझ्या परीक्षेत.... तूच नापास केलेस तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत..... आता पुन्हा बसावे म्हंटले तर तू म्हणतेस ही परीक्षा पुन्हा होणार नाही...यारsss
माझ्या मूर्खपणा मुळे मी तुला गमावले....मी नको होते माझ्या मित्रांचे हे म्हणणे ऐकायला....

असे मनात म्हणून तो थकून बसलेला ,आता मान खाली घालून बसलेला होता... बराच वेळ झाला होता सुमेधाला बाहेर जाऊन...आता ती गेली ..आता ती पुन्हा येणार नाही...तिने ह्या नात्याला राम राम केला....माझा अति शहाणपणा मलाच भारी नडला.... मी पण का तीची अशी परीक्षा बघावी... मीच गेलो बाराच्या भावात...किती गुणी मुलगी गमवावी लागली ती...सुमेधा एकदा फक्त ,एकदा पुन्हा ये ,एक चान्स दे....

तो उठला आणि आपल्या टेबल कडे जायला निघाला होता... आणि तो तिथपर्यंत पोहचला होताच...त्याने त्या बॉटल्स हातात घेतल्या आणि वेटर ला त्या पॅक करायला सांगितल्या...तोपर्यंत तो त्या टेबल वर बसला... त्याने मित्रांना फोन लावला.."यार खेळ संपला रे मूर्ख माणसांनो, काय हे असे काही प्लॅन करत असतात का ,जवळ जवळ जुळत आलेले नाते तुम्ही तोडुनच टाकले रे बिनडोक माणसांनो...कुठे फेडल ही पाप...गेली माझी न होणारी ,/ कदाचित / होणारी बायको..."

मित्र.... अरे बायको नाही न झालेली बायको म्हणायचे का तुला...कारण आता ती गेली भावा.. दुसरी बघ आणि हो सल्ला आमच्या कडून घे..तुला चांगला सल्ला देऊ...नक्की जुळेल तुझे लग्न...आणि तो त्या वाईन च्या bottle ज्या फुल जश्याच तश्या ठेवल्या असतील त्या आम्हाला घेऊन आम्ही इथे मिळून संपवून टाकू...आणि बाकी कसलेच tension नको घेऊ तू....

तो.... डोक्याला हात मारून घेत....मला वाटलेच तुम्ही साले माझ्या दुखत्या जागेवर ही मीठ चोळल्या शिवाय राहणार नाहीत.... मला कसले टेन्शन आहे...ह्याचे तुम्हाला काही पडलेले नाही..तुमचा जीव त्या न संपलेल्या वाईन च्या bottle मध्ये अडकला असणार हे चांगलेच माहीत होते...म्हणूनच तुमच्यासाठी त्या पॅक केल्या आहेत... तो वेटर घेऊनच येत असेल...

--------------------------------------------------------

तो फोन ठेवतो आणि "जरा" वेळापूर्वी झालेली ती मुलाखत आठवतो...लग्नाआधी भेटू म्हणून /ती/ भेटायला आली होती, मस्त ब्लॅक ड्रेस त्यावर वाईन कलरचे मोठे फुल,( आणि मनात हसतो ,फुल ही वाईन कलरची ,कमाल आहे ) त्या फुलात सोनेरी मोती..हातात गोल्डन कलर च्या मोत्याने जडलेल्या बांगड्या.... कानात मोठे गोल्डन झुमके.. केस मोकळे... मध्ये एक सेंटर पिन...हलका मेक अप...तिचे डोळे जणू मृग नयन......जरा महिम लावलेले काजळ.....नेमकी उतरत्या सूर्याच्या विरुद्ध बाजूने बसली असल्याने त्या सूर्याचे सोनेरी हलके किरण तिच्या चेहऱ्यावर पडले होते... आणि तिची नितळ कांती अजूनच उजळली होती...ती खुद सोन्या सम चमकत होती... एकंदर खूप भावली होती...तिला बघत रहावे... त्या तिच्या रूपाचा नशेत दूबावे.... तिच्या आकर्षणाचा व्यसनाधीन व्हावे....आणि तेच एक व्यसन जडावे .../.अरे व्यसन जडावे म्हणता म्हणता ,मित्रांनी सांगितलेली तिची जी परीक्षा घ्यायची आहे ती आठवली / आणि तिच्या नजरेच्या व्यसनातून बाहेर निघायचे नव्हते पण निघावे लागले... तिच्या रूपाची खूप नाही पण थोडी तारीफ केली आणि तिला तिच्या आवडी निवडी बद्दल विचारायला सुरुवात केली...आणि मग म्हणाला ,"ऐका मॅडम तुम्हाला हवं असेल ते बोलवा "

ती.... हॅलो, तू मला मॅडम म्हणतोस, निदान आता तरी नाव घ्यायला हरकत नसावी रे!!!

तो...उफ्फ..! मी तुम्हाला नावाने हाक मारली तर चालेल हे मी विसरलो होतो....सवय होईल..आणि मी तुला नावानेच हाक मारेन हे नक्की ग..

ती...हो ,पण पुढे विसरून जाऊ नका ...

तो.... grt, आहात तुम्ही....वा..तुम्ही मला मात्र आहो किंवा आवो जाओ करा..हे पटत नाही बरं.. हे तुझं वागणं ठीक नाही...मी जर तुला नावाने हाक मारत आहेच तर तू ही नावानेच बोलव ना मला..भारी वाटतं..

ती.... त्यात grt असे काय होते..? त्यात काय भारी वाटण्यासारखं...होईल मला ही सवय तुझ्या नावाची..पण वेळ घेईल मी..कारण मला पटकन कोण्या अनोळखी व्यक्तीला लगेच त्याच्या नावाने हाक मारताना, बोलतांना जरा ऑकवर्ड फील होत...

तो.... म्हणजे मी तुम्हाला नावाने हाक मारू म्हणतात ,आणि दुसरी कडे तुम्ही मला आहो जाओ करणार आहात तर...हम्मम!!

ती... हसून...हो खरंय तुमचे.... म्हणजे तुझे...मी ही तुम्हाला... sorry तुला नावाने हाक मारुच शकते हो ना....इतका तर हक्क आहे आता मला... पण तुमच्या...पण तुझ्या घरचे...त्यांच्या समोर ,नावाने हाक मारली तर चालेल का ??

तो.... आज तरी घरचे नकोत आपल्या मध्ये...ही भेट फक्त आपलीच असावी...जी आपल्या आयुष्यभर लक्षात रहावी...मी आणि तू...बस्स...आपणच दोघे....नव नवी ही आपली भेट...स्मरणात राहावी....

ती.... amm, ok....पण आलेच चुकून कोणी तर मग....म्हणजे बोलण्यात संदर्भ येऊ शकतो चुकून...निदान माझ्या घरच्यांचा ....कारण मी नाही डावलू शकत त्यांना...हो पण मी ही प्रयत्न करेन शक्यतो....की ही भेट फक्त तुझी आणि माझीच रहावी.... कधी पुढील जीवनात आपण असेच एकटे बसलो तर त्या गप्पा मध्ये ही भेट असावीच,soo sweet तुझी कल्पना...आवडली एकदम मला...तू रोमँटिक आहेस तर..?

तो.... अग मला आयुष्यातील काही क्षण family साठीच द्यायला आवडते पण जो खास वेळ खास माणसासाठी द्यावा असे वाटत होते त्यात मग कोणी नको...आणि ती हीच वेळ आहे... आणि त्यातील तो क्षण फक्त तुझ्यासाठीच...मित्र सांगत असतात...त्यांची तिच्या सोबत खास भेट आणि पहिली भेट...मग तेव्हाच मनात यायचे आपली ही भेट अशीच राहील....

ती.... मस्तच...मी ही साथ देईन...खास आठवणीत राहील ही भेट...


क्रमशः.....??
-------------------------------------------------

🎭 Series Post

View all