माझी ऑनलाईनवाली सखी भाग -१

Friendship

मैत्री कशी असते ना!!!! कोणाची बालपणीची तर कोणाची शाळेतील, कॉलेज, ऑफिस......... अगदि काय तर बस, ट्रेन मध्ये होणारी............ हो ना!!!!! कारण मैत्री ही फक्त मैत्रीचं असते निव्वळ मैत्री????

मैत्री..तुझी नी माझी.

पावसाच्या थेंबाचं शिंपल्यात पड़णं अन्

मोती म्हणून त्याचं नवजीवन घडणं...अगदी तसंच

अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच

अचानक एकमेकांची सवय होवून जाणं

म्हणजे....तुझी नं माझी मैत्री...!!

मोगऱ्याचा दरवळणारा मनमोहक गंध

म्हणजे तुझी नं माझी मैत्री....

चुकलेच कधी वाट तर दिशा दाखवणारा दीपस्तंभ

म्हणजे तुझी नं माझी मैत्री...!!

नकळत जडलेला एक स्वैर छंद

म्हणजे.... तुझी नं माझी मैत्री

मनापासून जपावासा वाटणारा हा रेशीमबंध

म्हणजे....तुझी नं माझी मैत्री...!!

तुझ्यासारखी खूप खूप गुणी... अन् माझ्यासारखी थोड़ी थोड़ी खुळी....जशी कायम बहरलेली सदाफुली...

म्हणजे तुझी नं माझी मैत्री...!!

हसवणाऱ्या, फसवणाऱ्या तर कधी कंटाळवाण्या गप्पा..

म्हणजे....तुझी नं माझी मैत्री....

मनात निर्माण झालेला तुझ्या आठवणींचा कप्पा...

म्हणजे....तुझी नं माझी मैत्री...!!

मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन्

तुझ्याशी बोलताना विसर पडलेला शीण

म्हणजे....तुझी नं माझी मैत्री...!!

संसाराच्या गोतावळ्यात हरवून जातील अशा पायवाटा अन्

'तू विसरलीस तर.....या कल्पनेनेही अंगावर सरसरणारा काटा.... म्हणजे....तुझी नं माझी मैत्री...!!

मंदिराचे पावित्र्य जपणारा घंटेचा जणु मंजुळ नाद

सुखदुःखात हक्काने आवर्जुन मारावी अशी साद

म्हणजे....तुझी नं माझी मैत्री...!!

अगदीच महागडं सुंदर फुलझाड नसेलही पण दुर्मिळ

गवताचं एक नाजुक पातं...

म्हणजे....तुझी नं माझी मैत्री....

देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजावं असं पवित्र नातं

म्हणजे....तुझी नं माझी मैत्री...!!

उतरत्या वयाच्या सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान

आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं

असं पान....म्हणजे....तुझी नं माझी मैत्री...!!

हसता हसता अलगद टीपावं असं डोळ्यातलं पाणी..अन्...

स्वप्नवत वाटणाऱ्या स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची

अशी ही कहाणी...म्हणजे.... मैत्री......तुझी नं माझी......!!!! ????????????????

किती मस्त ओळी आहेत ना!! कोणाच्या आहेत नाही माहीत पण मैत्रीची सुंदर व्याख्या आवडली मला!!!!! माझी आजची कथा आहे एका वेगळ्या मैत्रीची........☺️

रागिणी गेले कित्येक वर्षे आयटी क्षेत्रात काम करीत होती, आज ऑफिस मध्ये ती लवकर आली, मूड खूप छान होता आज तिचा, असणारच ना!!!!! तिची अनिव्हर्सरी होती म्हणून आज मस्त बेत होता संध्याकाळी घरी.

तिने स्वतःच्या हाताने केलेले मस्त बटाटे वडे नाश्त्याला घरी केले होते व ऑफिसमध्ये घेऊन आली होती, तिने ते सर्वांना दिले,तिने दिलेल्या बटाटे वड्यांचे सगळ्यांनी भरभरून कौतुक केले. नेहा ने तिने नेसलेल्या रेड कलरच्या साडीचे तर तोंडभर स्तुती केली, इतर सरकारी मित्रांनी तिला येऊन शुभेच्छांचा वर्षाव केला, सगळ्या मैत्रिणीं तिचे व साडीचे भरभरून कौतुक केले, तशी रागिणी ऑफिस मध्ये सगळ्यांशी बोलणारी, कायम हसरी, दुसर्यांना मदत करणारी अशी होती, सगळ्यात तिची वेगळी ओळख होती तिथे ती म्हणजे रागिणी मॅडम मस्त कविता करत होत्या, अशी ती थोडी वेगळी होती, बर तू हीच का साडी नेसलीस आज सांग बघू नेहाला तिला म्हणाली......... राधिकाने तिला सांगितलं कि हि साडी नवरोबा कडून तिला ऍडव्हान्स गिफ्ट होत, त्याची अशी इच्छा होती ती नेमकी आजच मी ही साडी नेसावी.!!!!!
नेहाने तिला विचारले आजच अस ग का??? रागिणी मनातल्या मनात गोड हसली, मग म्हणाली अग आज आमच्या सुखी संसाराची दहा वर्षे पूर्ण झालीत, आणि म्हणून मिहिरने तिला आधीच दिली, त्या मागे एक गोड कारण होत कि सगळ्यात आधी माझ्या बायकोला मीच बघणार असा गोड हट्ट होता त्याचा????????

मिहिर नेहमी मला म्हणतो माझी बायको साडी, ड्रेस किंवा जीन्स अगदि काय तर साधा पंजाबी ड्रेस जरी घातला तरी माझ्यासाठी गोड आणि सुंदर दिसते.......  अशीच तिला आठवण झाली मिहिरची, तो नेहमी तिला असेच प्रोत्साहन देत असे, मग स्वतःच ती त्याला आठवून लाजली????

नाते तुझ माझ्या शब्दांस निमित्त
ते आजे एक अनमोल बंधन
नाते तुझे माझे असेच राहावे अतूट...........

कोणी हे लिहिलंय माहीत नाही पण आज चक्क मिहिरने तिला जवळ घेऊन असे गुणगुणले....... पुन्हा तिला सार आठवले, नेहा ने तिला हलकेच चिमटा काढला.....आई ग!!!! रागिणी स्वतः शीच हसली, तशी नेहा म्हणाली ओ मॅडम जरा परत या ????, अस म्हणून झाली दैनंदिन कामाला सुरुवात, कामात ती पारंगत होती, आज तिला काम पटापट आवरून लवकर निघायचे होते, पण अचानक तिला बॉस ने बोलावले केबिन मध्ये आणि सांगितले रागिणी काही महत्वाचे प्रेझेन्टेशन करायचे आहे जरा थांबून कर आणि जा, कारण मला उद्या एक  महत्वाच्या मिटिंग साठी जायचे आहे, रागिणीचा मूड ऑफ झाला, नेहाला हे समजले पण चेहऱ्यावर तिने दाखवले नाही.  नेहा तिची जवळची मैत्रीण होती असे रागिणीचा गोड गैरसमज होता. तिला कुठे ठाऊक होतं कि तिच्या भोळ्या भाबड्या चेहऱ्यामागे कपटिपणा दडलेला असेल!!!!!!!!

ऑफिस सुटले इतर सहकारी निघून गेले, नेहा पण निघून गेली,बाकी मोजकेच लोक तिच्या सोबत होते, ती भराभर काम आवरत होती आणि लक्ष्य घड्याळा कडे होते, वेळ पटपट पुढे सरकत होती आणि तिच्या मनात चलबिचल चालू झाली, कसंबस काम आवरून बॉसला फाईल मेल केली आणि ती निघाली ऑफिस मधून, अजून माझी बायको का बर नाही आली, मिहिर विचार करत होता तेवढ्यात रागिनींचा फोन त्याला आला, अग कुठेस???? कधीचा मी वाट पाहतोय, तिने त्याला झाला प्रकार सांगितला आणि सॉरी म्हणाली, मी येते रे थोड्याच वेळात????????, घरी पोचायला तिला नेमका आजच उशीर झाला, आज दुपार पासून सगळं विचित्र घडत होतं, ठरवल्या प्रमाणे काहीच झाल नव्हते, अस करत करत एकदाची पोचली घरी???????? सगळा उत्साह कमी झाला तिचा, हिरमुसली होती आणि मिहिरने जाणले,त्याने तिला समजावले अग रागिणी होत असे कधी कधी, चल पटकन एक छानशी स्माईल कर बघू, अशी रुसलेली तर छान दिसतेस पण हसल्यावर गोड दिसते,हे ऐकल्यावर पटकन तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिचा मूड परत छान झाला व दोघे बाहेर गेले डिनरला????. खुप रोमॅंटिक वातावरण होत ती जरा लाजली, मिहिर ने तिला मस्त गाणे ऐकवले, परत न विसरता लाडक्या बायकोला आवडणारा केक आणला होता, सार कस प्रफुल्लित वातावरण होत.

आता पुढे बघू काय घडत रागिणी सोबत??

🎭 Series Post

View all