प्रेमाची माझी माणसे ही

Premachi Manse Majhi


विणा विभासची बायको... राणेंच्या घरातील मोठी सून.. दोघांचेही लग्न arrange होते... पण सासरपेक्षा माहेराला खूप मिस करत होती असज तिला लग्न होऊन १५ दिवस झाले होते आणि तिच्या माहेरी घर तिच्याशिवाय कसे असेल हे ती जाणवत होती.
ती तिच्या माहेरची शेंडेफळ, लाडाची, प्रेम तर भरभरून मिळाले होते कारण ती एकुलती एक मुलगी होती, तिकडे चार भाऊ, आजी बाबा, आई अण्णा, काकू काका यांची खूप लाडाची लेक होती विणा... आणि शेंडेफळ म्हणून तिची खूप गम्मतही केली जात होती, सगळे तिलाच घरातील छोटे मोठे काम सांगत... भाऊ तर हे करून दे, ते करून दे, ह्या फरमाईशी करत... आई काकू तर चल चपात्या लाट, तारेवरचे कपडे काढून घड्या घालून ज्याच्या त्याच्या खोलीत ठेऊन दे... भाजी निवडून दे... बाबा, काका तर तिला चल माऊ जरा डोक्याची शीर दुखते, मग डोक्याची मालिश करून दे... पाय दुखत आहेत जरा दाबून दे.... इकडे आजी म्हणत माऊ अग माझी माऊ किती गुणाची ग म्हणून म्हणून तिला उरलीसुरली दमून घेत... चल मंदिरात सोडून दे... चल मला हरिपाठ ऐकव... चल त्याच्या हाताने मला जरा पाठ चोळून दे करत करत कसा दिवस मावळत असे आणि मग माऊ दमली की हे सगळे तिला सगळे तिच्या हातात आणून दे..

मग ती ही रागात म्हणायची जर इतके पुढे पुढे करायचेच होते तर स्वतःच्या पुढे पुढे करवून मला का दमून घेतात तूम्ही सगळे.... ती वैतागली की मग भाऊ... तिचे पाय दाबत म्हणत आमची मनी माऊ, आमची मनी माऊ, चारा खाऊ.... पाणी पियू... आणि उद्या तिच्या घरी उडून लावू... खूप झालं आता तुमचे मी कुठेच उडून जाणार नाही.. हे घर माझे आहे... आणि हो त्यालाच इथे आणेन मी.. माझ्या घरी नांदवायला... तुम्ही सगळे बघतच रहाल..

माझ्यातून तुम्ही कदापी ही सुटका नसणार..... मग मध्ये सौरभ म्हणत... ए इतके सोपे समजू नकोस तू सासर बाई... आम्ही जितके लाड पुरवतो ना तितके ही पुरवले जाणार नाही..... मग अभिषेकही म्हणाला, आता घे तू लाड पुरवून मग बघा कसे हाल होतील सगळ्यांच्या पुढे पुढे करून, दमछाक होईल..... रवी लगेच तोंड बंद ठेवायचे ना तर तो ही हात धावून घेत होता.... हे इतके पाय चोपून देत आहोत ना ते ही ते लोक करणार नाही... मग बसशील तू रडत मुलूमुलू.... प्रशांत म्हणाला अरे बावळटा ते मुळुमूळू असते मुलुमूल नाही...☺️

ती अजूनच चिडते त्यांच्यावर.. आणि tv बघायला hall मध्ये निघून जाते, त्यांची कटकट नको म्हणून, तर हे अवलीये तिथेही येतात, ती जिथे बसली असते तिथे तिला त्रास देतात, गम्मत करतात, एक पोरगी चिडली रे चिडली.. मग कोणी हातातून remote घेऊन तिच्या आवडत्या serial चा आवडता सीन लागताच ते बदलून टाकतात... तो रडका सीन असतो... लेक नांदायला जाण्याचा... आणि भाऊ रडत असतात असा तो सीन.... इकडे म्हणून हे भाऊ तो बदलून टाकतात.... ती म्हणते दादा तुम्हाला जराही माझ्या emotions ची कदर नाही ना... उलट म्हणतात तू कधी जाणार...
हीच का तुमची माया... आणि तिच्या डोळ्यात पाणी येते.... मग सगळे भाऊ तिला जवळ घेतात त्यांच्या मिठीत.... आणि ती ते emotional झालेले पाहून जोर जोरात हसु लागते..... आणि म्हणते कशी वाटली माझी गम्मत, रडवलं ना मी तुम्हाला..... पण खरे तर तिने गम्मत केलीच नसते.... ती खरंच रडत असते... पण तिला तिच्या भावांच्या डोळ्यात पाणी बघवत नसते.... तिला तिच्या भावांना कायमच असेच हसत बघायचे असते... मी जरी नसेल तरी त्यांनी असेच आनंदी रहावे अशी तिची इच्छा असते.... मग सगळे एकसोबत जेवायला बसतात... मस्त अंगतपंगत जमते.... सगळ्यांच्या आवडत्या भाज्या आज मुद्दाम बनवलेल्या असतात.... गोड धोड असते.. विणाची आवडती कढी आणि भजे असतात... एकीकडे पालक पनीर.... तर एकीकडे मस्त तांबडा पांढऱ्या रस्यातील वांगे असते... सगळे कसे सप्तरंगी असते....

आजच्या ह्या मेजवानीमध्ये एक आनंदाची बातमी दडलेली असते, ती खास विणासाठी असते... तिच्या बाबतीत असते... आणि म्हणून जरा खास जेवण तयार केलेले असते..... आई काका आता अण्णा आणि काकाकडे इशाऱ्याने बघत असतात.... मूलही त्यांच्याकडे बघत असतात, की नेमके काय चालू आहे.... काय काय.. बाबा काका, अण्णा, काकू आई काय गुपितं सांगत आहे तुम्ही जोड्या जोड्या एकमेकांना.... मग अण्णा मोठे म्हणून जाहीर करून टाकतात.... अरे बावळटा आमचे जोड्या जोड्याचे गुपित नाही रे... आता तुमचे वय आहे हे गुपित गुपित खेळायचे..... आणि काका म्हणतात... असे वाटते तुम्हाला जोड्याने हणावे.....
मग काय सगळी गँग सोबत बोलून उठते, मग सांगा काय इशारे करत आहात तुम्ही...
अरे मुलांनो आपली विणा आता परक्या घरी जाणार आहे, तिला बघून गेलेला मुलगा त्याने तिला पसंत केले आहे, आता विणा आपल्या घरी काही दिवसांची पाहुणी आहे...
हे ऐकताच, तिच्या डोळ्यात पाणी वाहू लागते, डोळे खूप भरून येतात आणि इकडे बाकीचे भाऊ एकमेकांना टाळ्या देतात... आता मस्त मजा करू आपण हिच्या लग्नात.... नाचू गाऊ धमाल करू... आधी मस्त शॉपिंग करू... धिंकचिका धिंकचिका.... परत अभी म्हणतो.. येड्या ते ढ आहे ध नाही... ढि म्हण....

अण्णा लगेच म्हणतात माझी लेक परक्या घरी जाणार आहे, तिची हौसमौज खूप करायची आहे मला, हा आणि तिला कोणीही आता त्रास द्यायचा नाही काम सांगायचेही नाही... ती फक्त आजी आजोबांचे काम करेन बस.. कळले का रे गोट्यांनो.... ती जितके दिवस असेल तितके दिवस तिच्याच आवडीचे जेवण होईल बरं.....
तिला रडताना पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते... तिने लगेच बाबांची मिठी जवळ केले होती, तिच्या डोक्यावरून हात फिरवत ते ही रडत होते....
आई काकूच्या हाता खाली आता परत काम करणार नाही मी हे पक्के आहे ना बाबा आणि मी ह्या पोरांच्या फरमाईशीही ऐकणे गरजेचे नाही हे परत एकदा निक्षून सांगा हं बाबा... नाहीतर हे उद्या परत मला तेच ते कामे सांगतील... हे आता चालणार नाही सांगा... आणि ती रडता रडता हसत होती....
असे सप्तरंगी तिचे माहेर तिला खिडकीतल्या इंद्रधनूसारखे वाटत होते... घरात नुसता गलबलाट असे... नाते काय असते ते तिच्या माहेरातून ती समजून आली होती म्हणून तर सासरमधील तसेच इंद्रधनू तिला सुंदर वाटत होता... तसेच सगळे इथेही होते... फक्त तिच्या जागी तिची छोटी नणंद होती.... हसत खेळत हे ही घर होते... तो गलबलाट इथेही होता.... आपल्या भावांऐवजी इथे तिच्या चुलत, सख्या नणंदा होत्या.. इतकेच काय तो फरक..

बाबासारखे सासरे होते, आईसारखी सासू होती, जीव ओळवाळून टाकणारा दिर आणि नणंद होती... समजदार, प्रेमळ स्वभावाचा नवरा होता.... हे ती तिचे भाग्य समजत होती....
आणि भाग्य भाग्य अजून तरी काय असते दुसरे... हो ना

तुम्हाला काय वाटते ...? सांगा नक्की