माझी कमाई माझा हक्क

Majhi Kmai
उमाच्या घरी आज मुलाच्या बरश्याचा सोहळा होता, पाहुणे यायला अवकाश होता ...घर कसे आनंदाने भरून गेले होते........ घरची मंडळी अजून रस्त्यात होती ...तोपर्यंत इकडे उमाने जय्यत तयारी केली होती.... आज सासरची आणि माहेरची मंडळी येणार होते....
तिला हा सोहळा खूप साधाच करायचा होता,एकदम मोजक्या लोकांमध्ये पण सासूबाईंचा खूप आग्रह होता, मला माझ्या मुलाचे घर सगळ्यांना दाखवायचे आहे..

त्याने किती दिवसाने त्याचे आपले स्वतःचे घर असल्याचे स्वप्न पूर्ण केले आहे ......ही मिजाज मिरवायची होती...
खरे तर उमाची आर्थिक budget कमी होते म्हणून ती कमी खर्चात हा सोहळा पार पडणार होती.....पण सासू म्हणाल्या सगळीकडे पैसे खर्च करतेस तू मग ह्या सोहळ्याला का हात आखडता घेतेस.....तुझे खर्च कमी कर जरा पण हा सोहळा ठरल्याप्रमाणे मोठा कर....माझ्या मुलाची शान दिसू दे इतरांना.... त्याच्या नोकरीवर तर त्याचे आणि तुझे खर्च भागतात ह्याचे भान राहूदे जरा.
ह्या आनंदात विरजण नको वाद नको म्हणून उमाने होकार दिला, तिला परत ऐकवत बसावे लागणार त्यापेक्षा आहे तसे करू.... मग तिच्या माहेरातून आई बाबा, भाऊ बहीण आणि वहिनी येणार होते.... त्यात त्यांनीही अमाप खर्च करणे योग्य नव्हते..... भावालाही कमी पगार होता... बाबा retire होते... मग हा सोहळा attain करण्यासाठी सगळ्यांना गाडीचा खर्च कसा पेलवणार होता.

माहेरचे आले आणि काहीच आणले नाही हे पण योग्य वाटणार नाही आणि त्यांची तर गाडी करून येण्यातच १० हजार जाणार, ते ही उधारीवर, हे तिला कळत होते. मग तिने आपल्या कमाईतून आपल्या बाळासाठी एक चेन केली आणि ती भावाच्या हातात दिली आणि सांगितले दादा सध्या ही चेन तू घे आणि जेव्हा सगळे असतील तेव्हा तुझ्याकडून बाळाच्या गळ्यात घाल .
दादाची परिस्थिती बेताची होती पण तो खूप मानी होता, त्याला काहीच सुचत नव्हते, आपण आपल्या भाच्यासाठी गरिबीत काही करू शकत नाही. ते ही बहीणीकडून घ्यावे लागण्याची वेळ आली आहे....
त्याने ती चेन परत केली आणि म्हणाला मी तुला माझी नोकरी लागल्यावर नक्की यापेक्षा भारी चेन करेन पण ही नको देऊस तू. ती म्हणाली दादा तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे आणि पुढच्या वाढदिवसाच्या वेळी देच तू चेन पण आता ही तू घे.
तिने भावाला सासरचे येण्याआधी चेन दिली, पण तिच्या नणंदेने वहिनीने ती चैन तिच्या भावाला देतांना पाहिले होते, तिला वहिनीच्या ह्या वागण्याचा राग आला होता, माझ्या भावाची कमाई वहिनी माहेरच्या लोकांना देते आणि म्हणते पैशाची अडचण आहे.
तिने आईला जाऊन सांगितले. तेव्हा सासूबाई खूप तापल्या होत्या, तिला सगळे गेल्यावर चांगलेच ऐकवणार होत्या.
सोहळा संपन्न झाला, तिच्या माहेरचेही परत गेले.
इकडे सगळे सोबत गप्पा मारताना सासूबाईने विषय काढला. अरे ही तर म्हणत होती पैसे नाही, कार्यक्रम छोटा करू आणि एकीकडे माहेरच्यांना चेन देत होती. हा काय प्रकार आहे हा, तुला पगार जास्त वाढला का रे, मग कधी आई वडिलांनाही देत जा पैसे, की सगळे सासरीच देणार. मज्जा चालू आहे माझ्या मुलाच्या जीवावर. त्यानेच घर घ्यायचे, हिचे खर्च पूर्ण करायचे आणि ही आपल्या माहेरी पैसे देते, भावाला मदत करते .

विक्रम सगळं शांत ऐकून घेत होता आणि मध्ये पारा चढला, आई आईला ओरडून बोलला, अग हे घर आणि हे खर्च मी नाही हा उचलत, हे खर्च तिच्या पगारातून होत आहेत. ती हे सगळे घर चालवत आहे, कर्ज जरी मी घेतले आहे तरी त्याचे हप्ते ती भरत आहे. माझी दोन महिन्यापूर्वीच नोकरी गेली आहे आणि म्हणून ती हा सोहळा मोठा नको म्हणत होती. पण तू ऐकले नाहीस आई, तुला वाटते इकडे आम्हाला पैशाचे झाड आहे, आम्ही मज्जा करत आहोत.
विक्रम मध्ये म्हणाला, जर मी भाऊ म्हणून माझ्या बहिणीची मदत करू शकतो तिच्या अडचणीत तर जी कर्ती आहे, कमावती आहे तिने जर तिच्या भावाची त्याच्या पडत्या काळात मदत केली तर बिघडले कुठे आणि हो हे घर तिनेच घेतले आहे. माझे स्वप्न तिनेच पूर्ण केले आहे. पण तिला ते फक्त आमच्या दोघातच ठेवायचे होते. तिला माझे घर, माझे पैसे, तुझा खर्च, तुझी मज्जा हे म्हणायला आवडत नाही.
आईला आता जरा चोरी केल्यासारखे वाटत होते, शब्द बोलून गेलो पण खरे तर आपणच चुकलो आहोत हे कळून चुकले होते, तिने डोळ्याच्या खुणा करून उमाची स्मित माफी मागितली होती. तिची कमाई असून तिलाच नको ते बोलून बसले हे त्या खुणावत होत्या.