माझी होशील ना भाग 11

Twisted unpredictable love story

अन्वी असं म्हणतोस ? बरं चल ठेवला तुझ्यावर विश्वास.. आता मी जे सांगते ते नीट ऐक.. आणि हे कुणालाही सांगू नकोस.. मी प्रेग्नंट आहे.‌

अमेय तू मस्करी नको हा करू माझी.

अन्वी हा मस्करी करण्यासारखा नाहीये विषय.. मला भीती वाटते या गोष्टीची.

अमेय मग करताना मज्जा घेतलीस ना ? खाल्लस ना शेण ? आता भोग तू तुझ्या कर्माची फळं..

अन्वी म्हणजे तू नसणार आहेस का माझ्यासोबत ?

अमेय का म्हणून ? मी तुझ्यासोबत केलं नाहीये. ज्याच्यासोबत तू केलंस ना त्याला विचार.. आता का गरज तुला माझी ? तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळावर माझा काहीही हक्क नाहीये . मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी तुला सांभाळेन पण बाळाला नाही. ती जबाबदारी माझी नसेल.. तुझे धंदे आणि तुझी थेरं.. निर्लज्जपणाचा कळस तू गाठला आहेस.. आपण कधीच एकत्र नाही येऊ शकत हे कळालंय कारण तू खूप फालतू आणि बकवास मुलगी आहेस.‌

अन्वी झालं का तुझं सगळं बोलून ? आता तुझं पुराण थांबव. मी काय सांगते ते नीट ऐक. तुला मिळालेली माझ्या बाबतीतील सगळी माहिती पूर्णपणे चुकीची आहे.. तुला माहीत नसेल तर सांगते , मनस्वी लॉजवर मी आणि माझ्यासोबतचा मुलगा ज्या रूममध्ये गेलो होतो ना त्याचरूममध्ये त्यादिवशी दुपारी ११ वाजता एक माणूस ऑलरेडी शिफ्ट झालेला होता. आणि माझ्यासोबत जो मुलगा होता ना तो माझा कोणी बॉयफ्रेंड नव्हता माझा भाऊ होता. माझा भाऊ IT Sell मध्ये काम करतो आणि त्याचा बॉस ११ वाजता त्या रूममध्ये आला होता. त्याला भेटण्यासाठी आम्ही गेलो होतो.

अमेय पण तू कशाला गेलेलीस ? आणि मुळात म्हणजे तुमचं एवढं घर असताना तो तुझ्या भावाचा बॉस का म्हणून हॉटेलमध्ये रहायला गेला गं ?

अन्वी बॉसचा अचानक कॉल आला माझ्या भावाला. आम्ही बॉसला घरी नेण्यासाठी हॉटेलला गेलो होतो. मला त्यांच्या कंपनीत जॉब हवा होता म्हणून मी सुद्धा गेलेले...

अमेय हे असले छक्के पंजे माझ्यासमोर नको खेळू अन्वी.. तुझी सगळी नाटकं माहीत आहेत मला..

अन्वी मला माहीत आहे की मी कशी आहे ते. दुसऱ्यांनी भुंकून सांगायची गरज नाही मला. आणि अजून एक गोष्ट.. मी प्रेग्नंट नाहीये. मी खोटं बोलले तुझ्याशी. मला जाणून घ्यायचं होतं की हे संशयाचं वादळ तुझ्या मनात किती आहे ते. ज्या व्यक्तीवर प्रेम करतोस त्या व्यक्तीवर संशय घेतोस ?

अमेय हे बघ..

अन्वी बास. प्लीज बास. तुम्हा मुलांची जातच अशी असते. एक मुलगी दुसऱ्या मुलासोबत दिसली की मुलीवर संशयाचे शिंतोडे उडवायला तुम्ही मोकळे असता.

अमेय- किती सज्जन असण्याचं नाटक करणार आहेस ?

अन्वी तुला कधीच समजणार नाही मी..

अमेय- समजून घेण्याची इच्छा नाहीये.

अन्वी- तो तुझा प्रश्न आहे..

अमेय शाळेत एका मुलासोबत वर्गात जो काही किसिंग सीन केलेस ना त्यावरून तू काय लायकीची आहेस ते माहिती आहे..

अन्वी ते आमच्याकडून नकळत झालं..

अमेय- ह्या गोष्टी नकळत कशा होतील ?

अन्वी मुद्दाम तरी  कशा होतील ?

अमेय हे बघ .. तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या मुलीशी बोलण्याची माझी इच्छा नाहीये..

अन्वी- मग कशाला सारखे मला कॉल आणि मेसेज करतोस ?

अमेय- I don’t know ..तुला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये..

अन्वी तू माझा एक मित्र होतास म्हणून एक गोष्ट तुला सांगते.. प्लीज सुधार. खूप मोठा हो पण उगाच लोकांवर स्पेशली मुलींवर शहानिशा न करता असे घाणेरडे आरोप नको करूस. मी हात जोडते तुझ्यासमोर . तुला सतत वाटत की मी हट्टी आहे. तिरसट आहे . वाईट आहे.. सगळ्या गोष्टीत मी वाईटच आहे.

अमेय हे बघ असं नाहीये काही..

अन्वी कसं आहे ते जाणून घेण्याची इच्छा नाहीये आणि वेळ देखील नाहीये..

अमेय तुझा गैरसमज होतोय.

अन्वी गैरसमज झाला होता तुझ्याबाबतीत. खूप चांगला समजत होते. खरं प्रेम करणारा समजत होते पण तू तसा अजिबात नाहीस.

अमेय ऐकून घे माझं.

अन्वी काहीच ऐकून घ्यायचं नाहीये.. यापुढे मला कधीच कॉल आणि मेसेज करू नकोस.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... बाय. मी तुला ब्लॉक करते.

तो पुढे काही बोलणार तोच कॉल कट झाला होता. त्याने पुन्हा कॉल केला तर तिने त्याला ब्लॉक केलं होतं...  ती आता त्याच्या आयुष्यात कधीच येणार नव्हती. आता तर तो पूर्णपणे बदलत चालला होता. फिल्म इंडस्ट्रीत स्वत:चं नाव कमवत होता पण तरीही ह्या माणसांच्या दुनियेत तो तिच्याविना एकटा होता.. रोज तिला कॉल करणं सुरूच होतं . ती प्रतिसाद देत नव्हती. तिच्या विश्वात नवे मित्र येत होते. तरीही ती त्याला विसरूच शकत नव्हती. रोज तो तिला कॉल करून त्रास देत होता . तो हळूहळू कामात गुंग होत चालला.. तिला स्वत:च्या कथेत जगवत होता आणि अखेर एके दिवशी ती पुन्हा त्याच्याशी बोलू लागली... तिने त्याला अनब्लॉक केलं होतं. तो खूप खूष झाला. ती त्याच्याशी बोलू लागली. तिने त्याला माफ जरी केलं असलं तरी तिच्या मनातून तो दूरावला होता. एक मित्र म्हणून ती त्याच्याशी वरवरचं बोलत होती. त्यालासुध्दा कळत होतं की आपण तिच्या मनातून उतरलो गेलोय. संशयाचं भूत त्याच्या मानगुटीवर तसंच बसलं होतं. एके दिवशी त्याने पुन्हा तिला न आवडणारा प्रश्न विचारला.

अमेय तुझा कोणी boyfriend असेल तर प्लीज मला सांग.

अन्वी पुन्हा चिडली.

अन्वी- झालं तुझं सुरू ? माझा कुणी बॉयफ्रेंड आहे की नाही हे मी तुला का म्हणून सांगू? कोण आहेस तू माझा ?

अमेय लोकांना फसवू तरी नको ना निदान .

अन्वी मी कुणालाही फसवलं नाहीये.

अमेय मग सांग कोण आहे तुझा बॉयफ्रेंड? नाव काय त्याचं ?

अन्वी तुला का जाणून घ्यायचंय ? माझं आयुष्य मला जगू दे ना यार. माझ्या आयुष्यात मी कुणाला महत्त्व द्यायचं हे माझं मला ठरवूदे...

अमेय तुला कधीच नाही कळणार की मी असा का वागतो तुझ्याशी.

अन्वी मला जाणून नाही घ्यायचंय. माझा तुझ्यातला इन्ट्रेस्ट कधीच संपलाय.

अमेय का संपलाय ते माहित आहे मला. इतर मुलांसारखा तुझ्या जवळ आलो नाही. तुला हात लावला नाही..

अन्वी लेखक म्हणवतोस ना स्वत:ला ? मुलींशी कसं बोलावं हेच कळत नाही का ?

अमेय मुलगी असण्याचं प्लेकार्ड वापरण्याची प्रथा जुनी झाली . तू किती बाराची आहेस ते ठाऊक आहे. महिन्या महिन्यात बॉयफ्रेंड बदलणारी आहेस तू. कपडे कसे पटापट बदलावेत ना तसे बॉयफ्रेंड बलतेस तू.

अन्वी ओह! सांग ना जरा मी कुठल्या मुलासोबत कुठे जाते ?

अमेय- मला नाही सांगायचं .

अन्वी कारण उत्तर नाहीच आहे रे तुझ्याकडे.

अमेय हे बघ . तू मुलांसोबत फिर किंवा गाढवासोबत फिर. मला फरक नाही पडत.. तू त्यांच्या सोबत फिरल्याने तुला काही होऊ नये याचा पडतो फरक. मला नाही सहन होत तुला काही झालेलं. तू खऱ्या प्रेमाची कदर करत नाहीस आणि खोट्या प्रेमाची कदर करतेस याचा जास्त राग येतो म्हणून मी तुझ्याशी एवढं घाण बोलतो. माझ्या मनात मुलींविषयी आदर आहेच. तू गैरसमज नको करून घेऊस. मला सारखी भीती वाटते की तू माझ्या पासून लांब जाशील.. आणि सतत एक प्रश्न तुझ्या या वागण्यामुळे सतत पडत असतो तो म्हणजे तू माझी होशील ना ? भीती असते गं तू नसल्याची. भीती वाटते गं तुझ्या अशा वागण्याची. मला तू हवी आहेस. तुझा आभास नको. मला तुझी साथ हव्ये साद नको. माझ्या आयुष्यात आणि माझ्या प्रत्येक कथेत तू दिसतेस गं. कागदावर मी उमटवलेल्या शब्दात तू दिसत असतेस. म्हणूनच माझ्या आयुष्यातील तुझं अस्तित्व संपू नये. तू माझ्या आयुष्यात रातराणी बनून रहावं म्हणून तुला छळत असतो. तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस. तुझ्यातला सतत दरवळत राहणारा प्रेमाचा , सौदर्याचा गंध मला तुझ्याचपाशी घेऊन जातो म्हणून मी तुला त्रास देतो.

अन्वीला त्याचं बोलणं ऐकून पुढे काय बोलावं हे सुचलं नव्हतं. अश्रुंच्या धारा दोघांच्याही डोळ्यातून वाहत होत्या.

अन्वी मी तुझ्यासाठी एकच करू शकते. तुला अनब्लॉक करेन पण तुझ्याशी अजिबात बोलणार नाही....

अमेयअसं नको ना करू..

अन्वीमला जे योग्य वाटतंय ते मी करत्ये.. बाकी मला काहीच ऐकून नाही घ्यायचं. बाय.

अन्वीने स्वत:चे अश्रु आवरत कॉल ठेवून दिला. ती स्वत:शीच बोलू लागली .

अन्वीमी का तुला नकार दिला ? का तुला भेटणं टाळलं? का तुझ्याशी दुरावा केला ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी कधीच तुला खरी दिली नाहीत अमेय. मला माफ कर. रिअली सॉरी. मी लवकरच तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन आणि मगच मी खरी कशी आहे? माझी खरी ओळख काय हे समजेल...काही गोष्टी चांगल्यासाठी लपवाव्या लागतात. नियतीने या गोष्टी घडवून आणल्यात त्या गोष्टी तू किंवा मी नाही बदलू शकत.

काही गोष्टी नैसर्गिक असतात काही मानवनिर्मित .. यांपैकीं एक गोष्ट अन्वीच्या बाबतीत घडत होती आणि म्हणून ती अमेयपासून लपवाछपवी करत होती. कळत नकळत मोठ्या घटना दोघांच्या आयुष्यात घडणार होत्या.इथे अमेय सुध्दा रडत होता... एक वेगळं वळण आता कुठे या कथेला मिळणार होतं...

क्रमश :

®© पूर्णानंद मेहेंदळे