माझी होशील ना भाग 07

Love story

आपल्या आयुष्यात कुणीतरी यावं.. आपल्याला जाणून घेण्यापेक्षा अनुभवावं असं इथे अन्वीचं मत होतं. अगदी अमेय तसंच करत होता. तिला पारखत होता. तिच्या आयुष्यात तो कधीच गेला होता .‌ त्याला कळत होतं की अन्वी काहीतरी लपवते.

अन्वी – I don’t know .. Why ? But माझ्यासाठी माझ्या फॅमिलीनंतर अर्णव जवळचा वाटतो आणि त्यानंतर स्वानंद...‌

त्याला कळून चुकलं की अन्वीसाठी आपण एवढे important नाही आहोत.‌ तरीही तो शांतच होता कारण तो तिच्या दुनियेत होता.

अन्वी स्वानंद , पुण्यात असतो. एकदा तो दापोलीत आमच्या घरी आलेला तेव्हा भेट झाली. तो आमच्या नात्यातलाच आहे. त्याला मी माझ्या मनातलं सगळं सांगते.

अमेय थोडक्यात तुझे ते दोघं बेस्टी आहेत. बरोबर ना ?

अन्वी येस ! का ते माहीत नाही रे. त्यांच्यासोबत राहीलं ना की खूप फ्रेश वाटतं.‌सगळा ताण निघून जातो.

अमेय मग आम्हाला भेटल्यानंतर काय विकनेस येतो का ?

अमेय खोटा खोटा हसतो.

अन्वी छे ! अजिबात नाही.

अमेय मग मला भेटल्यावर कसं वाटतं ?

अन्वी छान सुंदर !

अमेय एवढंच ?

अन्वी अजून काही असेल तर नंतर कधीतरी सांगेन. बाय निघू का मी आता ?

अमेय बरं . पुन्हा कधी भेटायचं ?

अन्वी सांगेन तुला.

अमेय उद्या भेटूया का ?

अन्वी रोज रोज गाडीचं पेट्रोल संपवायला पैसे वर नाही आले मला. आठवड्यातून एकदा भेटू . चलो. निघते मी.

दोघेही हसऱ्या चेहऱ्याने निघतात. अन्वी तिच्या गाडीने घरी जाऊ लागली होती. अर्ध्यावाटेत एक अनोळखी मुलगा बाईकवरून‌ सुसाट आला. तिच्यापर्यंत येऊन पोहचला.. अन्वी जरा बिथरली. ती गाडी चालवतच होती.

मुलगा , आयटम. एक नंबर दिसतेस हा..

अन्वी गाडी फास्ट चालवू लागली होती.‌ तो तिचा पाठलाग करू लागला.. तिने गाडी चालवतानाच अमेयला कॉल लावला. अमेयचा कॉल स्वीच ऑफ होता.. ती अजून जास्त स्पीड ने गाडी चालवत होती. त्या मुलाने त्याची गाडी मध्ये आणली व तिला थांबवलं. तिने कचकन ब्रेक मारले व गाडी थांबवली ‌.‌

मुलगा शेवटी थांबावं‌ लागलंच की तुला.

अन्वी काय प्रॉब्लेम आहे तुझा ? कोण आहेस तू ?

मुलगा आय लव्ह यू ‌!

अन्वी इडियट आहेस का तू ?

मुलगा तुझ्यासाठी आहे इडियट.

त्याने अन्वीचा हात पकडला. ती कळवळली.

अन्वी सोड हात माझा. मारेन मी तुला. सोड..

मुलगा मार ना मग . मार ना.. हात तुझा इतका सुंदर आहे.‌ अजून काय काय सुंदर असेल याचा विचार करतोय मी.

अन्वी शी ! सोड मला . मी आरडाओरडा करेन.‌

रस्त्याच्या दुतर्फा जंगलच जंगल होतं.

मुलगा ओरड ना . ओरड की.

त्याने अन्वीच्या गाडीची चावी स्वत:कडे हिसकावून घेतली.

अन्वी चावी दे.

ती रडायला आली होती.‌तिच्या छातीत धडधडू लागलं होतं.‌

अन्वी प्लीज सोड मला.

मुलगा मगाशी तुझ्यासोबत असलेला मुलगा कोण होता ?

अन्वी तू आमच्यावर लक्ष्य ठेवून होतास ?

मुलगा मी यत्र , तत्र सर्वत्र आहे.‌ बोलाव‌ तुझ्या यार ला . बघ येतो का !

अन्वी सोडणार नाही तुला

मुलगा आधी स्वत:ला सोडव.

अन्वी लिमीट मध्ये रहा.

मुलगा रात्री येतेस का घरी ? अनलिमिटेड शो दाखवतो..‌

अन्वी शेवटी धाडस करून त्याच्या हाताला चावते. स्वत:ला सोडवून घेऊन लगेच हातातील चावी हिसकावून घेते व गाडी स्टार्ट करून‌ निघते. तो मुलगा सुध्दा तिथून परत निघून जातो. अन्वी सुटकेचा निःश्वास सोडते.

        अमेय आता कुठे घरी पोहचला होता.‌ मोबाईल बघतो तर स्वीच ऑफ.अजिबात मोबाईल चार्ज नव्हता. त्याने मोबाईल charging ला लावला.‌ त्याचा बाकीचा वेळ टंगळमंगळ करण्यात गेला. अन्वी मात्र घरात येऊन रडत होती. तिला तिच्या आईने विचारलं.‌

आई का रडत्येस ? ए बाळा बोल की.‌

अन्वी आई...‌

ती एक गच्च मिठी मारली. आईने तिला कुरवाळत पुन्हा विचारलं..‌

आई अनू.. काय झालं बेटा ? बस तू इथे.

अन्वी आत्ता घरी येताना एका मुलाने माझी झेड काढली.

आई काय ? तू बरी आहेस ना ? कोण होता तो मुलगा ?

अन्वी मी बरी आहे. मला खूप वाईट वाटलं .‌

आई ही अशी मुलं लांडगे असतात गं ! कधी लचका तोडतील काहीच सांगू नाही शकत ! ह्या अश्या मुलांशी दोस्तीच नाही करायची.

अन्वी तो मुलगा कोण होता ते माहीत नाही. परत भेटला तर सोडणार नाही त्याला..‌

आई अशीच धाडसी बन ! कुणालाही घाबरायचं नाही. मी आहेच तुझ्यासोबत.

आईने तिला समजवलं.. ती जरा शांत झाली .‌ अमेयने २-३ तासांनी मोबाईल ऑन केला. मोबाईल स्वीच ऑफ असल्याने अन्वीच्या कॉलचं नोटिफिकेशन‌ त्याला‌ आलंच नव्हतं...‌त्याने तिच्याशी बोलण्यासाठी what’s app वर मेसेज केला..‌ती ऑनलाईनच होती.

तो – Hey !

ती – hiiee

तो काय करत्येस ?

ती काही नाही . तू ?

तो तुझ्या आठवणीत रमलोय.

ती – ohhhh !

तो जेवलीस का ?

ती हो. एक सांगू का ?

तो हा बोल .‌

ती मी मगाशी तुला कॉल करत होते.

तो हो का ? मला नाही आलं नोटिफिकेशन. अगं माझा फोन स्वीच ऑफ होता.

ती माहीतीये.

तो कशासाठी कॉल करत होतीस ?

ती एक प्रॉब्लेम झाला होता.

तो कसला प्रॉब्लेम ?

ती मी घरी येत असताना मला एका मुलाने अडवलं. माझा हात पकडला. मला प्रपोज केलं ‌. माझ्या गाडीची चावी घेतली. मला सोडतच नव्हता.. मी त्याला चावले तेव्हा त्याने सोडलं...‌

अमेयने तिचा हा मेसेज वाचला आणि तिला ताबडतोब कॉल केला..

अमेय हॅलो..

अन्वी बोल.

अमेय मला सांग तू ok आहेस ना ?

अन्वी – yaa ! I am fine..

अमेय कोण होता तो मुलगा ?

अन्वी  - माहीत नाही.

अमेय सॉरी. मी येऊ शकलो नाही.‌खरंच सॉरी.

अन्वी हं.

अमेय मला खूप वाईट वाटतंय.

अन्वी तू कशाला वाईट वाटून घेतोस ? त्रास तर मला झाला ना !

अमेय त्रास तुला होत असला तरी वेदना मला होताय्त.

अन्वी तो आपल्यावर लक्ष्य ठेवून होता.‌

अमेय तो फक्त भेटूदे. सोडायचं नाही त्याला..

अन्वी ठेव फोन.. नंतर बोलू. मला जरा शांत बसूदे.

 अन्वी लगेच फोन बंद करते.‌अमेय खूप चिंताग्रस्त झाला .‌ तो अन्वीने पाठवलेले मेसेज चाळू लागला. मेसेज वाचल्यावर त्याला अन्वीचा संशय येऊ लागला. तिने सांगितलेली कथा पूर्णपणे फिल्मी वाटत होती. त्याला वाटलं की अन्वी मस्करी करत असावी. ती गाडीवर असताना आणि त्यात तो मुलगा तिचा पाठलाग करताना तिला कॉल करायला वेळच कसा मिळाला ? ती मस्करीच करत असणार हे त्याला कळत होतं.. मग त्यानेही तिची मस्करी करण्याचं ठरवलं...

क्रमशः

®© पूर्णानंद मेहेंदळे