माझी होशील ना भाग 06

Twisted love story

अन्वी हॅलो बोल..‌

अमेय ओके आहेस ना तू ?

अन्वी – yaa !

अमेय गुड ! जेवलीस का ?

अन्वी नाही.

अमेय का ?

अन्वी मला नव्हतं जेवायचं !

अमेय हे बघ जेवून घे ! आय नो तुझा राग एवढ्यात जायचा नाही पण माझ्यापध्दतीने मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय कारण माझ्यामुळे उगाच तुमच्या मैत्रीत फूट पडली. तुमचं रिलेशन तुटलं.‌

अन्वी उलट मला हे सगळं सांगितलं ते बरं केलंस. आणि रिलेशन तुटायला आमच्यात काहीच नव्हतं.

अमेय खरंच ?

अन्वी तुझा नाहीये का विश्वास माझ्यावर ?

अमेय स्वत:पेक्षा जास्त.

अन्वी आम्हा दोघांत फक्त एक मैत्री होती. त्यापलिकडे जाऊन मला काहीच दिसलं नाही .‌ त्याने मला फसवलं इथेच आमची मैत्री संपली. मगाशीच मी त्याचा नंबर डिलीट केला. ब्लॉक करून टाकलं.

अमेय वेडी आहेस का तू जरा ? नाही. चूक माझीच होती की तुला ते रेकॉर्डींग सेन्ड केलं. नशीब अर्धच सेन्ड केलं .

अन्वी मला पूर्ण रेकॉर्डींग आत्ताच्या आत्ता हवंय.‌

अमेय सॉरी . हा हट्ट तुझा मी नाही पूर्ण करू शकत.

अन्वी मग बोलू नकोस माझ्याशी.

अमेय अगं ते खूप घाण आहे. मला स्वत:ला नाही ऐकवत.‌

अन्वी कसंही असलं तरी मला पाठव.

अमेय नको हा उगाच हट्ट करू. आणि मी ते डिलीट केलंय.‌

अन्वी बरं .‌ मला आता ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे.‌

अमेय गुड .‌

अन्वी उद्या भेटूयात का ? तसंही उद्या कॉलेजला सुट्टी आहे.‌

अमेय कुठे आणि किती वाजता ?

अन्वी हनुमंत टेकडी माहीत आहे का तुला ?

अमेय हा..

अन्वी तिथे भेटूयात सकाळी ११ वाजता. जमेल तुला ?

अमेय हा . तुला भेटण्यासाठी जमवून घ्यावच लागेल.

अन्वी एवढी important आहे मी तुझ्या आयुष्यात ?

अमेय कदाचित स्वत: पेक्षा जास्त..

अन्वी हो का ? बरं !

अमेय ऐक आता तू जेवून घे पहिलं आणि शांतपणे झोप !

अन्वी मला नाहीये भूक !

अमेय प्लीज माझ्यासाठी जेव .‌ मी जेवावं म्हणून तर जेव.‌

अन्वी मीन्स अजून तू सुद्धा जेवला नाहीयेस का ?

अमेय मला माहीत होतं की तू उपाशी असणार म्हणून मी सुद्धा तपाशी होतो.

अन्वी तपाशी ?

अमेय तुझा राग घालवण्याच्या तपाशी...

अन्वी ओह ! माझा त्याच्यावरचा राग नाही जाणार कधीच !

अमेय चूका माणसांकडूनच होतात ना !

अन्वी तू ठेव फोन आता. जास्त पकाऊगिरी नको करू. उद्या भेटू. बाय .‌

अमेय अगं ऐक तर..‌

तिने फोन तिच्यापासून वेगळा केला.. तो गॅलरीत जाऊन उभा राहिला. आकाशात पौर्णिमेचा चंद्र झळकत होता.. चांदण्या लखलख करत होत्या. एक वाऱ्याची झुळूक त्याला भिनून गेली. बाहेरचं वातावरण पाहून तो पुन्हा खोलीत आला. त्याची लाडकी गिटार त्याने हातात घेतली व‌ पुन्हा गॅलरीत आला.. डोळे बंद करून गिटार वाजवू लागला..अचानक त्याचं गिटार वाजवणं थांबतं. सूर चुकले होते. योग्य सूर त्याला सापडत नव्हता..‌सैरभैर होऊन गिटार वाजवत होता.‌ उद्याच्या दिवसाची वाट पाहत होता.. तिला भेटण्यासाठी तिला पाहण्यासाठी उत्सुक झाला होता. काही वेळाने तो झोपी गेला.

         सूर्य उगवला. सकाळचे ७:३० वाजले होते. त्याला अन्वीची आठवण आली. बाजूला असलेला मोबाईल उचलला व अन्वीला good morning मेसेज केला. अन्वी ऑनलाईन नव्हती.त्याने अन्वीला कॉल केला . अन्वीचा कॉल व्यस्त होता. त्याने सारखा पुन्हा कॉल केला. तिचा कॉल बिझी तो बिझीच...

        अर्धा तास झाला... अजून अन्वीचा कॉल बिझी. काही वेळाने समोरून अन्वीचा कॉल आला. ताबडतोब त्याने कॉल उचचला. स्पीकरवर ठेवला...

अन्वी अरे काय ? कशाला इतके कॉल करतोय्स ?

अमेय अगं जरा एक सांगायचं होतं.

अन्वी हं. सांग.

अमेय आज संध्याकाळी भेटूयात का आपण ?

अन्वी -नाही जमणार.

अमेय ऐक तर..

अन्वी नाही जमणार. ११ म्हणजे ११.

अमेय नको हट्ट करूस..

अन्वी आपल्या मैत्रीत मी जे सांगणार तेच ऐकणार आहेस तू !

अमेय सुधारणार नाहीस .

अन्वी- काय करणार तुझीच मैत्रीण आहे.

अमेय बघतो . मी प्रयत्न करतो ११ ला टेकडीवर येण्याचा.

अन्वी यावं लागणारच आहे.

अमेय बरं. ठेव फोन जरा लिहयला बसतोय..

अन्वी जरा कशाला ? पूर्ण लिही ना..

अमेय प्लीज. पीजे बंद कर. ठेव फोन.

अन्वी कॉल बंद करते. हा लिहीण्यात मग्न‌ होता. लिहीता लिहीता १०:३० वाजले. एव्हाना २ पेज आणि नाटकाचे ४ सीन लिहून झाले होते.‌ घड्याळ पाहीलं. १०:३० वाजले होते. ह्याची गडबड सुरू झाली. सगळं आवरून तो तिला भेटण्यासाठी तयार झाला होता.‌ एव्हाना ११:१५ झाले होते. तिचे ५ missed call आणि ५० मेसेज एव्हाना आले होते. तो धावत घरातून बाहेर आला. बाईकला किक मारली आणि टेकडीच्या दिशेने निघाला. अन्वी त्याची वाट पाहत घामाघूम झाली होती. तो जोमात टेकडीवर आला.

अन्वी या साहेब !

अमेय सॉरी उशीर झाला.

अन्वी ओके. झालं  लिहून ?

अमेय येस !

दोघेही एका कातळावर बसले.‌ समोर एक मोठी दरी होती. एक थंडगार वाऱ्याची साद त्यांना भोवत होती. माथ्यावर सूर्य होता.

अमेय तू बरी आहेस ना ? त्याचा काही कॉल , मेसेज ?

अन्वी येतो मेसेज त्याचा .‌ मी रात्री रडतच होते. मी त्याला ब्लॉक करून टाकलं.

अमेय तुला काय वाटतं की ब्लॉक करून प्रॉब्लेम solve होतील ?

अन्वी - प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करणं चांगलं.. प्रॉब्लेम आपोआप solve होतात.

अमेय हो का ?

अन्वी होच.

ती आता खूप बरी होती. सगळं काही एका रात्रीत विसरून गेली होती. त्यांच्या खूपवेळ गप्पा रंगल्या होत्या आणि तिची निघण्याची वेळ झाली.

अन्वी बाय ! मी निघते. बाबा घरी जेवायला यायच्या आत पोहचायला हवं.

अमेय एवढं घाबरतेस ?

अन्वी आदर. आदरयुक्त भीती.

अमेय थांब ना थोडावेळ.

अन्वी बरं थांबते.‌

अमेय तुला माहीतीये.. तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस.

अन्वी हं. तुला खरंतर एक सांगायचं होतं.

अमेय बोल की‌

अन्वी माझा बेस्टी अर्णव आहे.

अमेय अर्णव ?

अन्वी आहे एक माझा खूप चांगला जवळचा मित्र. आम्ही २ वर्षांपासून ओळखतो एकमेकांना. आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करतो.

अमेय माझ्याबद्दल सांगितलं आहेस का त्याला ?

अन्वी अं.. हो. म्हटलं की माझा एक नवीन मित्र झालाय.. अमेय नावाचा.

अमेय- मग काय बोलला तो ?

अन्वी काही नाही.

अमेय काहीच नाही बोल्ला ? ओके.

अमेयला कळत होतं की अन्वी खोटं बोलत्ये. अमेय कडे ह्या बाबतीत एक मॅजिक होतं. होय मॅजिक. अमेयला सहज कळायचं की समोरचा व्यक्ती खरं‌ बोलतो की‌ खोटं. अमेयला अंदाज आला होता की अन्वी स्पष्टवक्ती नाही. ती काहीतरी लपवते...

®© पूर्णानंद मेहेंंदळे