माझी होशील ना भाग 01

Twisted love story

हि गोष्ट आहे तिची आणि त्याची... तो म्हणजे अमेय दळवी . वय १८ वर्षे. एक लेखक ..‌कॉलेजात नाटकं , एकांकिका दिग्दर्शित करत असे... त्याचं कॉलेजमध्ये तो इयत्ता बारावीत शिकत होता.. त्याच इयत्तेत त्याच वर्गात शिकत असणारी अन्वी श्रीवास्तव . समवयस्क. एक सुंदर मुलगी. तिला पाहताक्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी ‘ ती ’. ती म्हणजे अन्वी. समजुतदार मुलगी.

तो वर्गात सारखं तिच्याकडे बघत बसायचा. तिचा कोणी बॉयफ्रेंड असेल का ? हे त्याला माहीत नव्हतं. ती कुठे राहते हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं.. फक्त माहीत होतं तिचं नाव.. अन्वी.‌तिच्याशी कसं बोलावं ? आपण बोलायला गेल्यावर ती बोलेल का आपल्याशी ? ती आपल्याशी मैत्री करेल का ? याच विचारात तो असायचा.. तिचं हसणं , तिचं रडणं , तिचं चिडणं .. सगळं कसं त्यानं हेरून ठेवलं होतं... आणि हेरून ठेवली होती तिच्या गालावरची खळी.

तिच्या आणि आपल्या कॉमन फ्रेन्ड द्वारे आपण बोलू शकतो का तिच्याशी ? पण नको दोघांमध्ये तिसरा कशाला ? त्याचे विचार त्याच्याशीच भांडू लागले होते. तिला पाहिल्यावर टेंशन सगळं निघून जायचं.. तिच्या आठवणीत रमताना कागदावर अलगतपणे शब्द लेखणीतून उतरायचे....

आज तिला बरं वाटत नव्हतं.. ती कॉलेजमधून घरी जायला निघाली. ती एसटीने कॉलेजला यायची .. तिला तेव्हा फारच बरं वाटतं नव्हतं... म्हणून ती तिच्या आणि त्याच्या कॉमन मैत्रिणीकडे गेली. तिचं नाव अपूर्वा. अपूर्वा सुध्दा cultural activities करत होती. ती तेव्हा cultural room मध्येच होती. त्यामुळे अन्वी cultural room मध्ये गेली. त्याला आश्र्चर्य वाटलं की अन्वी cultural room मध्ये कशी ? तो तिला पाहतच बसला. अन्वी अपूर्वा जवळ गेली...

अन्वी – Hii....

अपूर्वा काय गं तू इथे... ?

अन्वी अगं माझं जरा डोकं दुखतंय.. तापही आलाय.. आत्ता घरी जायला एसटी सुध्दा नसेल.. मला सोडतेस का घरी ?

अपूर्वा तिच्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठी होती. सिनियर होती. त्यामुळे तिची लेक्चर्स सकाळी असत... ती तिला घरी सोडायला तयार झाली...

अपूर्वा घरी सोडायला काही प्रॉब्लेम नाही गं.. पण गाडी नाहीये आपल्याकडे.

अन्वी मग आता ?

अपूर्वा थांब जरा . बघूयात कोण गाडी देतंय का ?

अश्यात तिला अमेय दिसला.. तिने अमेयला बोलावलं.

अपूर्वा .. अम्या... जरा इकडे ये.

त्या दोघी cultural room बाहेर उभ्या होत्या... अन्वीला बघून अमेय लगेच धावत आला.

अमेय बोल काय झालं ?

अपूर्वा अरे जरा गाडी मिळेल का तुझी ? हिला घरी सोडायच्ये..

नेमकी त्यावेळी अमेयकडे गाडी नव्हती. अमेय कॉलेजला चालतच यायचा.

अमेय थांब जरा .‌ मी करतो काहीतरी जुगाड...

अमेय लगेच त्याच्या एका मैत्रिणीकडे गेला.. तिचं नाव पावनी. लेक्चर ऑफ असल्याने पावनी क्लासरूम बाहेरच होती.

अमेय ए पावनी , जरा प्लीज गाडी दे ना तुझी...

पावनी का ?

पावनी हव्ये.. दे ना..

पावनी बरं थांब...‌

पावनी क्लासरूम मध्ये गेली.. गाडीची चावी घेऊन अमेयपाशी आली....अमेयला चावी दिली..

अमेय थॅन्क्स.. लवकर देतो आणून..

पावनीहां..

पावनी आणि अमेय एकाच गावात राहायचे. बालपणीपासून यांच्यात खूप चांगली मैत्री होती. त्यामुळे पावनीने खूप विश्र्वासानं ती चावी अमेयला दिली... अमेय चावी घेऊन धावत अपूर्वाकडे गेला.

अमेय ही धर.. किती वेळात येशील तिला सोडून.. ?

अपूर्वा पाऊण तासात येईन..

अमेय ओके..

अमेय व अन्वीने एकमेकांकडे पाहीलं. दोघेही एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसले.. अन्वी पहिल्यांदा त्याच्याशी बोलली

अन्वी थॅन्क्स..

अमेय मला कशाबद्दल थॅन्क्स..

अन्वी म्हणजे मला घरी जाण्यासाठी गाडीची सोय केल्याबद्दल..

अमेय तसं असेल तर आभार पावनी चे मानायला हवेत ना ? पावनी म्हणजे माझी मैत्रीण.

अन्वी ओके...

पुन्हा त्यांच्यातला संवाद संपला.. अपूर्वा काही कामानिमित्त cultural room च्या आत गेली. आता फक्त अन्वी आणि अमेय दोघे एकमेकांसमोर उभे होते. काय बोलावं ? कसं बोलावं ? हेच कळत नव्हतं. त्यात अमेयला तिच्याशी बोलण्यासाठी विषय सुचला...

अमेय अं.. तुला एक विचारू ?

अन्वी हां. विचार ना.

अमेय अॅक्चुली मी आपल्या गॅदरिंग साठी स्किट लिहीतोय आणि बसवतोय सो तू करणार का त्यात काम ?

अन्वी अं. कळवते तुला नंतर..

अमेय ओके.

अन्वी एक काम कर मला तुझा नंबर देऊन ठेव मी तुला what’s app वर सांगते‌. तू what’s app वर आहेस ना ?

अमेय हो..

अन्वी बरं सांग नंबर..

अमेय नंबर सांगतो. अन्वी नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करते. मी घरी गेल्यावर करते तुला मेसेज..

अमेय ओके.

तोच अपूर्वा आली.

अपूर्वा चल गं अन्वी...

अन्वी हां. बाय अमेय..

अमेय बाय..‌

अन्वी अपूर्वा सोबत गाडीवर बसून निघून गेली‌ . अमेय आता खूप खूष झाला.. अमेय अन्वीच्या मेसेजची वाट पाहू लागला.. तिचं बोलणं तो आठवू लागला.. तिच्या तंद्रीत तो वर्गात जाऊ लागला.. तिच्या विचारात हरवून जाऊन तो त्याच तंद्रीत वर्गात जाऊ लागला.. लेक्चर सुरू होतं. तो मात्र तिच्या बोलण्यात पूर्णपणे हरवला होता. हळूच त्याने खिशातून मोबाईल काढला .‌बेंचच्या खाली शिक्षकांना दिसणार नाही असा ठेवला.. तो तिच्या मेसेजची वाट पाहू लागला.. तिची आणि त्याची पहिली भेट त्याच्या नजरेतून जात नव्हती.. तारीख होती. 19 जुलै. लेक्चर संपलं आणि तो वर्गाबाहेर गेला.. तिचा मेसेज आलाय का ? हे पुन्हा तपासलं. तोच पावनीने त्याला पाहीलं... पावनी थोडी चिडलेली होती..

पावनी अरे काय अमेय ? गाडी कुठाय माझी ?

अमेय गा .. गाडी ना ? गाडी .. येईल ना ५ मि.

पावनी लवकर हव्ये . मला घरी जायचंय..

अमेय चील ! येईल ५ मिनीटात ..

पावनी कोणाला दिल्येस तू गाडी ?

अमेय अपूर्वा घेऊन गेल्ये अगं...

पावनी फोन लाव तिला.. ती कुठे आहे ते विचार.‌

अमेय वेट ! लावतो फोन..

अमेय अपूर्वाला कॉल करतो.‌ अपूर्वाचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. अमेय पुन्हा एकदा फोन लावतो.. पुन्हा तिच परिस्थिती होती.

अमेय तू फक्त ५ मि ‌. थांब ! ती येईल..

पावनी काय यार तू पण..‌ तू काहीही कर. मला घरी जायचंय लगेच..

अमेय अगं हो.. एक काम कर. ती येईपर्यंत आपण कॅन्टीनमध्ये बसू ! चल..

पावनी ओके. तिला तू कॉल लाव .. मेसेज कर. काहीही कर.. ती नाही आली तरी चालेल पण गाडी सुखरूप आली पाहिजे...

पावनी फारच चिडलेली. अमेय साठी ते काही नवीन नव्हतं. दोघं कॅन्टीनमध्ये आले. त्यांनी खूप वेळ अपूर्वाच्या येण्याची वाट बघितली. साधारण एक तास झाला.. अपूर्वाचा काहीही पत्ताच नव्हता.. एवढ्यातल्या एवढ्यात त्या दोघांचे 3-4 वडापाव खाऊन झाले होते. दोघेही खादाड होते. अमेयला टेन्शन आलं होतं ते अन्वीचं .. ती सुखरूप पोहचली असेल ना ? ह्याच विचारात तो होता. पावनी मात्र फारच बडबड करत होती. तोच अपूर्वाचा कॉल अमेयला आला.. अमेयने कॉल रिसिव्ह केला..

अमेय अगं आहेस कुठे तू ?

अपूर्वा २ मिनीटात येते..

अमेय ये पटकन..‌

अमेयने कॉल लगेच कट केला.‌

अमेय अपूर्वाचा कॉल आलेला.. २ मिनीटात येत्ये..

पावनी मी आता फक्त २ मिनिटं वाट पाहणार हा ! जर ती नाही आली तर ती जिथे कुठे पाताळात असेल ना तिथे आपण जातोय...

अमेय अगं हो.. किती चिडशील ?

पावनी अरे मला गाडीची चिंता आहे... तू होतास म्हणून गाडी दिली. दुसरं कोणी असतं तर नसतीच दिली... ते जाऊदे , अजून २ वडापाव मागव..

अमेय नाही . मला नकोय हो एकच मागवतो..

पावनी तुला धरून २ वडापाव नाही बोलले मी.. मला एकटीला २ .. तू खाल्लं नाही तरी फरक नाही पडत...

अमेय ओके...

अमेय २ वडापावची ऑर्डर देतो... पावनी अधाशासारखी वडापाव खाऊ लागते... ती प्रचंड टेन्शनमध्ये होती.. तोच अपूर्वाचा पुन्हा कॉल आला..

अमेय हा . बोल..‌

अपूर्वा अरे मी पार्किंग एरियात आल्ये.. तुम्ही कुठे आहात ?

अमेय कॅन्टीनला ये..

अमेय कॉल कट करतो.. अन्वीचा मेसेज आलाय का पाहतो.. तिचा मेसेज अजूनही आलाच नव्हता..

पावनी बोल , काय म्हटली ती ?

अमेय येत्ये कॅन्टीनला..

अपूर्वा कॅन्टीनमध्ये आली. तिने पावनीला चावी दिली.. पावनीने लगेच तिच्या हातातील चावी हिसकावून घेतली.

अपूर्वा सॉरी. जरा उशीर झाला..

पावनी – it’s ok.. चल , मी निघते.‌ बाय.

अपूर्वा बाय..‌

पावनी अमेय , तू येणारेस की इथेच थांबणार आहेस ? येणार असशील तर एकत्र जाऊ..

अमेय ओके चल.. बाय अपूर्वा .. भेटू उद्या ‌. आणि सोडलंस ना तिला व्यवस्थित ?

अपूर्वा हो !

अमेय बरं.. बाय !

अपूर्वा बाय..

तिघेही तिथून निघून जातात. पावनी व अमेय आपापल्या घरी निघून गेले. अमेय अजूनही तिच्या मेसेजची वाट पाहू लागला.. तिचा का मेसेज येत नसेल ? हेच त्याला कळत नव्हतं.. कधी पुन्हा तिच्याशी बोलतोय ? कधी तिला भेटतोय ? हेच प्रश्न त्याला पडतो होते..‌ पावनीने त्याला घरी सोडलं व ती घरी निघून गेली.. घरी आल्यावर सुध्दा तो अन्वीच्या विचारांत गुंतला होता.. तोच त्याला एका व्यक्तीचा फोन आला .

अमेय – hello

व्यक्ती नमस्कार ! अमेय दळवी ना ?

अमेय हो । बोलतोय

व्यक्ती -मी दादर वरून चिन्मय बाविस्कर बोलतोय. तुम्ही लिहीलेली ‘ तिच्या अंधारात ’ नावाची एकांकिका वाचली मी. मला फार आवडली. पण मला या एकांकिकेचं व्यावसायिक नाटकात रूपांतर झालेलं हवंय. मी स्वतः दिग्दर्शित करेन.. त्यासाठी तुमची परवानगी हवी होती.

अमेय हो. नक्की. मी तुमच्याविषयी खूप ऐकलंय सर.. तुम्ही सोनंच कराल माझ्या लिखाणाचं..

व्यक्ती धन्यवाद ! तुम्ही दादर ला येऊ शकता का 2 दिवसांनी ? सगळं व्यवहाराचं आणि बाकीच्या विषयांवर चर्चा करू शकतो आपण..

अमेय हो येईन ना सर... नक्की येईन.

व्यक्ती ठिक आहे. मी address सेन्ड करून ठेवतो तुम्हाला..

अमेय ओके.

व्यक्ती भेटू नंतर..

व्यक्ती फोन कट करते. अमेय खूप खूष झाला होता. त्याच्या आयुष्यातलं हे पहिलं नाटक .. यशाच्या शिखरावर जाण्यासाठीचा प्रवास सुरू झाला होता.. पण अचानक त्याला एक गोष्ट लक्षात आली. अन्वी आयुष्यात आल्यापासून चांगली गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली.. अन्वी खूप लकी आहे असा समज निर्माण करून तो पुन्हा अन्वीच्या मेसेजची वाट पाहू लागला..

क्रमशः

®© पूर्णानंद मेहेंदळे 

7507734527