माझे घर कुठे

Majhe Ghr
दिपाली चार बहिणीच्या सोबत वाढलेली ,पण आईविना पोर .
मामाने तिची जबाबदारी घेतली चार मुलीप्रमाणे ती ही पाचवी मुलगीच म्हणून संभाळ करेन म्हणाला, आणि मामी ला ही  दिपालीची माया आली, ती ही नवऱ्याच्या निर्णयात सोबत चालू लागली.

मामींच्या मुली कोणी शिकत होत्या तर कोणी नौकरी करत होत्या.

दीपाली 12 वी ला होती, ती ही काही दिवसांनी नौकरी करणार होती, पण मामाने सांगितल्या नुसार तिने आधी तिचे शिक्षण पूर्ण करण्याची गळ घातली.

मामीला दिपालीचा घर कामात हातभार लागत,म्हणून दीपाली घरात सहज समावली गेली,त्यात तिला पुढे शिक्षण करायचे असेल तर इतरांना कामात मदत करणे भाग आहे असे मामीने खूप सॊम्य भाषेत मामाला  सांगितले...

दिपाली घरात अगदी रुळून गेली होती, मामी तर मनातून म्हणत होती दिपालीचे शिक्षण पूर्ण होऊ आणि लवकर तिला नौकरी लागो, आणि तिच्या लग्नाची सोय निदान काही प्रमाणात तीच करो, बाकी आम्ही आहोतच.

मामीचे तरी कुठे चुकत होते, त्यांच्या विचारानुसार बघायचे झाले तर त्यांच्या मुली जेव्हा पासून त्यांच्या त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या तेव्हापासून त्यांनी आपले खर्च आणि शिक्षण स्वतः पूर्ण केले तर होतेच, पण त्यांनी घर खर्च ही उचलले होते आणि आपल्या लग्नासाठी ही काही रक्कम fix मध्ये टाकली होती....

मग साहजिक आहे जर दीपाली ला जर मामी मुलीप्रमाणे वागवत होती तर तिच्याकडून ही त्याच अपेक्षा होत्या, नाही घर खर्च तर निदान स्वतःच्या लग्नाचा खर्च करेल इतकी अपेक्षा होती...

पण शेवटी लोकांचे घर ते लोकाचे आणि आई वडिलांचे हक्काचे घर ते हक्काचे असतेच,जरी मामी मामा जीव लावत असतील तरी कुठे तरी दिपालीला  तिथे परके वाटत होते, ती आई वडिलांना खूप आठवून रडत असे,पण हे तिने कडी कोणाला जाणवू दिले नाही,की कधी तक्रार केली नाही....

कधी कधी जितक्या हक्काने मामी त्यांच्या मुलींना जीव ओतून जेवू घालत, तितक्या हक्काने प्रेमाने तिला ही घालावे असे वाटत पण ते तिच्या नशिबात नव्हते.. मग अजूनच हे घर परके वाटत.

जेव्हा त्या सासर हुन माहेरी येत तेव्हा हक्काने मामीला म्हणत आम्ही थकलो ग आता तूच आयते दे जेवायला, पण हे दीपा म्हणू शकत नव्हती,ना तिला हक्काने कोणत्या गोष्टी जाऊन घेण्याची सोय होती, की कधी न सांगता गेली आणि खात बसली असे होत.

एकदा असेच तिला  लाडू  खावेसे वाटले होते आणि तिने त्या लाडू साठी सगळे तूप संपवून टाकले होते आणि मामी खूप रागावली होती ,तेव्हापासून तिने कधीच न सांगता काही घेतले नाही की न विचारता काही खाल्ले होते.

घर म्हणायला होते नुसते पण घरावर हक्क नव्हता कधीच आणि असणार ही नाही कधीच, प्रेमाला खूप आसुसलेली होती ग गरीब पोर, पोटात तुटत असत तिच्या मामाच्या पण काही करू शकत नव्हता तो, फक्त डोक्यावरून हाथ फिरून म्हणायचा हे ही दिवस निघून जातील,तुझ्या आयुष्यात तुझा हक्काचा कोणी तरी येईल..तिला तर अजूनच भीती वाटायची...माहेर नाही ,माझे कोणी हक्काचे नाही मग सासर कसे असेल. कोण तिथे माझी बाजू घेईल,जीव लावेल, प्रेम करेल,..  सगळ्या चिंतेत ती डोळ्यातून पाणी आणत झोपी जायी.....

जेव्हा ती उपाशी झोपत तेव्हा तिला मामी विचारायला ही येत नसत की तू जेवलीस का ग,तुला भूक लागली का,तू आज अशी उदास का आहेस ,मायेने हात फिरवत म्हणणे की आज तू खूप दमली असशील ...पण नाही असे कधीच झाले नाही जे दिपाला हवे होते

दीपाला आता निदान पुढच्या आयुष्यात तरी तिला समजून घेणारा नवरा मिळो ही मनोमन प्रार्थना तिचा मामा देवाकडे करत असतो, त्याला आपली भाची ही आपल्या मुली इतकीच तिच्या नवऱ्याच्या घरी सुखी राहो असे वाटत असते..

दीपाला एक दिवस तिच्या आत्याच्या मुलगा भेटायला येतो, छान भारदस्त, गुणी, लाघवी स्वभावाचा अंकुश त्याला दीपा अगदी लहानपणापासून खूप आवडतं ,आणि आता कुठे कुठे लहानपणी चे प्रेम त्याच्या मनात दीपा बद्दल फुलू लागले होते, शिक्षण होऊन नौकरी करत होता, आणि आज दिपाच्या आयुष्यात त्याने entry घेतली होती, जणू तिचे आयुष्य बदलून जाणार असे वाटत होते, मामाला ही एक आशेचा किरण दिसला घरात जेव्हा अंकुश ने प्रवेश केला होता... राजबिंडा हुशार ,मन लगेच जिंकून घेणारा, असा.

तो आला तेव्हा आढे वेढे न घेताच त्याने direct लग्न ह्या विषयात हात घातला आणि सगळे बघत राहिले... दीपा ही मनातून आनंदी होतीच मामा ही खूप खुश होता....

इकडे कोपऱ्यात उभ्या असलेल्या मामीला ही आंनद झाला चला आता दिपाची काळजी मिटली,हुंडा ही नको द्यायला आणि लग्न खर्च ही नको करायला म्हणून सुखावली होती..

अंकुश ने आपल्या घरच्या कडून आधीच परवानगी काढली होती, आत्याला आपली सून आपली भाची असणार इतर मुलीसारखी आगाऊ नसणार याची कल्पना होती, त्यात ती शिकलेली, त्यात तिला नौकरी ,आणि तिच्या बापाची असली धन संपत्ती ही आपल्याच मुलाला मिळणार हे ही माहीत असतांना ती ह्या स्थळाला नाही कशी म्हणणार..

लग्न झालं पण कमी खर्चात ,ते ही खुद नवऱ्या मुलाची इच्छा होती की थाटात माटात लग्न करण्यापेक्षा एक फ्लॅट घेऊ, आणि तो दिपाच्या नावावर करू ..

इकडे लग्न झाल्यावर काही दिवस मस्त गेले, सगळे खुश होते, मामा ही समाधानी होता, मामी आता वरचे वर दीपाला खुशालीसाठी फोन करत... काळजी घे सांगत, वेळेवर जेवत जा असे ही आवर्जून सांगत.... माहेर तुझेच आहे तू कधी ही हक्काने ये म्हणत..

इकडे सासू आता आत्याचे नाते विसरून सासू होऊ बघत होती, दीपाला हवे ते लागणार ते तिने मला मागावे, असे तिने दीपाला ठणकावून सांगितले होते, हो तुझे डाग दागिने ही माझ्याकडे दे ,ते तेव्हा मिळतील जेव्हा सण वार असेल, आणि घरात आलेला पगार ही सगळे माझ्याकडे देतात तू ही माझ्याकडे दे...

दीपा जरा कुठे सुख उपभोगत होती तर परत तो परकेपणा तिला ह्या घरी ही जाणवत होता, तो दबाव, तो त्रास जो कोणाला माहेरी ही  बोलून दाखवता येत नव्हता तो सासरी ही हळूहळू जाणवू लागला होता... अंकुश ला सांगितले तर त्याला आई विरुद्ध कां भरून देते असे वाटू नाही म्हणून सहन करत...

पण दिवस सरत होते तसे अंकुशला ही आईच्या वागण्याची चाहूल लागत होती, त्याने आईला ठणकावून संगीतले हे घर जितके माझे,तुझे, आणि बाबांचे आहे तितके दीपा चे नसतील तर मी आणि दीपा आमच्या घरी रहायला जात आहोत.... तिने पूर्ण आयुष्य लोकांच्या घरात मन मारून जगली आहे आणि आता कुठे ती तिच्या घरात आली असे वाटत होते ,तर तिला तू परक्या सारखी जाणीव करून देत असशील तर मी ह्या घरात राहणार नाही

ज्या घरात तिला काही खायला, करायला, कोणाची परवानगी लागत असेल त्या घरी ती राहणार नाही..

अंकुश ने आता नवीन घरात राहण्याचा निर्णय घेतला होता, त्याला दिपाच्या मनात चाललेल्या सगळ्या गोष्टी ची कल्पना आणि जाणीव होती...

आज खरी गरज तिला साथ देण्याची होती ....तिला तिचे हक्काचे घर मिळून देण्याची होती ....

----/-------------------//---------------------------------------------


ज्या घरात एखाद्या सुनेला आपलेपणाचा ओलावा जाणवत नाही तिथे ती मनमोकळेपणाने कधीच राहू शकत नाही, म्हणून आपले घर सोडून आलेल्या प्रत्येक मुलीला सासरी तो आपलेपणा जाणवावा ह्यासाठी ती ही धडपड असते.?