माझा जोडीदार (अंतिम भाग)

Story about a girl who expected love,care and respect from her husband.

आधीच्या भागात आपण बघितले की मीरा सगळ स्व खुशीने सासू च ऐकायची आणि सगळ करायची सुद्धा....
आता पुढे......

इतक्या धावपळीची मीरा ला सवय नव्हती खरी पण लहानपणापासून एकटी पडली होती ती, दादा आणि बाबा फक्त नावापुरतेच... बाकी नातेवाईक पण सणांना च भेटायचे..

तिला खरे तर आई बाबा दोघे ही मिळाले होते सासू सासऱ्यांच्या रूपाने... मोहित पण खूप आनंदित होता, की त्याची बायको त्याच्या आईवडिलांची किती काळजी करते..

असेच वर्षा मागून वर्षे गेले.. मीरा आता 2 मुलांची आई झाली होती.. मुलांच्या संगोपनासाठी तिने जॉब सुद्धा सोडला होता...
कारण ती त्या परिस्थितीतून गेली होती, तिला माहिती होते आई जवळ नसेल तर मुलांचं काय होत..? त्यामुळे तिने त्यांना पूर्ण वेळ देण्याचे ठरवले.. मोहित ने सुद्धा ठीक आहे असे म्हटले..
कारण कुठे ना कुठे त्याला माहिती होते की मुलांची काळजी आई च व्यवस्थित घेऊ शकते.. त्याला ही काही हरकत नव्हती. ..
कालांतराने मीरा आपल्या कुटुंबात इतकी गुंतून गेली की तिचे स्वतः कडे संपूर्ण दुर्लक्ष झाले.. सकाळी 5 वाजता पासून तिची धावपळ सुरू व्हायची तर रात्रीचे 11 किंवा 12 वाजायचे झोपायला...

एके दिवशी मीरा आरश्यात बघून स्वतः ला विचारू लागली की खरच मी खूप मोठी चूक केली का? स्वतः ला इतके झोकून दिले का मी सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळण्यात..?
खरे म्हणजे त्या दिवशी सकाळी झाले असे की उपमा मध्ये थोडे मीठ जास्त झाले, पहिल्यांदा च असे झाले, तरी मोहित तिला खूप बोलला., तुला काही येतच नाही, तुला काहीच ठीक जमत नाही.. तु आधीची मीरा राहिली नाही आता.., खूप बदललीय.... सासू सासरे सुद्धा मोहित ला काही न बोलता त्यांच्या खोलीत गेले.. त्यांना ही असेच वाटायचे की मीरा काही ही नीट करता येत नाही... मोहित तसाच चिडून टिफीन न नेता ऑफिस ला गेला ... हे आजचे च नव्हते असे अनेक वेळा मोहित तिला बोलून गेलेला.. कधी कधी तर मुलांसमोर सुद्धा असेच बोलायचा.. त्याला ती करिअर ओरिएंटेड आणि बोल्ड मीरा आवडायची.. पण कुटुंब आणि मुलांच्या संगोपनात ती फार बदलून गेलेली....

मीरा आपली रडत रडत स्वयंपाक घर आवरत होती.. आणि मनात विचार सुरू होताच की एवढे त्याग केले मी या कुटुंबासाठी, त्यांच्या सुखासाठी, आणि शेवटी काय ऐकायला मिळत आहे की मलाच काही येत नाही...

स्वयंपाक घर आवरून झाल्यावर मीरा आपल्या दोन्ही मुलांचा अभ्यास घ्यायला त्यांच्या रूम मध्ये गेली, अचानक लहान मुलाने मीरा ला म्हटले की मम्मी जाऊ दे तू नको घेऊ काही, तुला काही नीट जमत नाही, उगाच चुकेल माझे सगळे ....
लहान मुलाच्या या वाक्याने मीरा फार दुखावली.. म्हणजे आता मुल सुद्धा मोहित सारखी बोलायला लागली होती.. ते सुद्धा मोहित चे ऐकुन ऐकुन....

मीरा ने आपल्या मनाशी निश्चय केला, काहीही झाले तरी चालेल या सगळ्यांना स्वतः ची किंमत ही दाखवून द्यायला हवी.. माझी ही काही किंमत आहे या घरात.., मी एवढे वर्ष दिलेय या घराला, घरातल्या लोकांना, त्यांना पटवून देऊ की मी तेवढीच महत्त्वाची आहे जेवढे या कुटुंबातील सगळे .. ..

विचार करता करता तिने तिची रूम आवरायला घेतली आणि मग स्वयंपाक घरात गेली.. रात्रीच्या जेवणानंतर सगळे आपापल्या खोलीत गेले...
मोहित च्या जवळ जाऊन मीरा त्याला म्हणाली मोहित मला तुझ्या सोबत महत्वाचे बोलायचे आहे, मोहित म्हणाला हं बोल ना,
मीरा: मला दीड महिन्याचा कालावधी पाहिजे आहे, मला केरळ ला जाऊन एक कोर्स करायचा आहे, माझ्या भविष्यासाठी गरजेचे आहे ते..
मोहित पार हादरून गेला.. दीड महिना आणि ते सुद्धा केरळ ला... त्याला पुरतेच समजले की मीरा आपल्या सकाळच्या बोलण्याने खूप दुखावली आहे, त्याला ती पहिल्या मीटिंग मध्ये भेटलो होतो तशी मीरा त्याच्या समोर दिसत होती, ते ही एवढ्या वर्षाने...
त्याला कळून चुकले की तो मिरासोबत खूप चुकीचा वागला आहे.. तिला नको नको ते बोलला, घरच्यांनी पण तिला सपोर्ट केला नाही.. आणि मी सुद्धा नाही.. सदानकदा तिच्या चुकाच काढल्या., ती स्वतः चे शिक्षण जॉब सगळ आपल्या मुलांसाठी आणि घरच्या लोकांसाठी विसरून त्यांना आनंद मिळावा म्हणून या गोष्टीचा त्याग केला. आणि आपण त्याची किंमत नाही केली..
मोहित ने मीरा चा हात हातात घेतला आणि म्हणाला तुला हवे तिथे जा ... जो कोर्स करायचा आहे तो कर.. इथे मी सांभाळून घेईल, खर म्हणजे मोहित ने लग्नानंतर स्वतः चा टिफीन सुद्धा बॅग मधून काढला नसेल आणि आज तो एवढ्या धीराने मीराला म्हणतोय की हो जा मी सांभाळेल सगळ....

मीरा च्या डोळ्यात पाणी आले..

मोहित: अग वेडा बाई!!! रडतेय कशाला?? सॉरी अग.., मी स्वतः मध्ये इतका गुंतून गेलो होतो की मला कळलेच नाही तु आमच्या साठी जेवढं करते तेवढं कोणीच करू शकत नाही.. तरी मी तुझी किंमत केली नाही, तुला खूप बोललो ना....
मोहित दोन्ही कान पकडून मीराची माफी मागत होता.. आणि तिचा हात हातात घेऊन विश्वासाने म्हणाला तू जा हं !! इथची काळजी करू नको.. यांनतर तु जेवढी काळजी आमची घेते त्याच्या दुप्पट काळजी मी तुझी घेईल...

हसत हसत दोघे ही एकमेकांच्या मिठीत सामावून गेले....

मीराच्या एका ठाम निर्णयाने मीराचे आयुष्य पुरते बदलून गेले..  आणि पुन्हा आनंदाने नव्या आणि सुखी संसाराला सुरुवात झाली..

मग मैत्रिणींनो आज काय कळाले यातून???? की स्वतः चा सेल्फ रिस्पेक्ट कधीही गमावू नका.. जिथे आपली किंमत नसेल तिथे दाखवून द्या की आमच्या शिवाय तुमचे आयुष्य अपूर्ण आहे..

"स्त्री त्यागाचे प्रतीक आहे तर पुरुष संघर्षाची प्रतिमा आहे.., कसे म्हणायचे फक्त एकाला श्रेष्ठ., दोघांनाही एकमेकांची गरज आहे..".

🎭 Series Post

View all