मज ठाऊक नाही कैसे

नकळत गुंतलेले मन
थरथरत्या संध्याछाया
ओघळल्या काजळ रात्री
नकळत अलगद कैसा
आमोद पसरला गात्री

भिऊन फिरले मागे
डळमळला कितीदा पाया
नकळत अलगद कैसी
बांधून ठेवते माया

जाणून अंतर जपले
कासावीस झाला जीव
नकळत अलदग कैसे
घट्ट बांधले नींव

निश्चय कितीदा केला
उमटेना नाजूक चित्र
नकळत अलगद कैसे
उमलून आले मैत्र

अवतरती मनीची स्वप्ने
नकळत अवती भवती
मज ठाऊक नाही कैसे
अन् अतूट झाली नाती

शर्वरी ताथवडेकर