मैत्री वया पलीकडची

एक नात जे अधुरं राहील होत त्याला साथ मिळाली मैत्रीची मैत्रीची. जरूर वाचा 'मैत्री वया पलीकडची'.
संस्कृती वृद्धाश्रम...
वेळ सकाळी ९ वाजताची...
गार्गी मॅडम म्हणजेच वॉर्डन गार्गी यांनी सकाळीच आश्रमाची साफ सफाई करून घेतली आज आश्रमात जरा जास्तच गडबड होती त्यामुळे गार्गी मॅडमना निवांत बसायला एक मिनिट देखील वेळ न्हवता.
खर तर आज कारण देखील तसच होत आज आश्रमात आजून एक जण राहायला येणार होत त्या आश्रमाचा एक नियम होता कुठलीही नवीन व्यक्ती राहायला आली की त्यांचं अगदी जंगी स्वागत व्हायच आणि त्याचीच ही तयारी होती.
हा नियम देखील त्यांनीच बनवला होता त्यांचं म्हणण होत. "समाजात वृद्धाश्रम संस्कृती व्हायलाच नको आणि असली तरी ते घर प्रत्येकाला आपलस वाटायला हव."
आणि म्हणूनच त्याची इतकी जय्यत तयारी सुरु होती.
आश्रमात फुले माळा सजत होत्या, साफसफाई सुरु होती, खाण्यापिण्याची तर अगदी जय्यत तयारी सुरु होती.
वृंदा ताई संस्कृती वृद्धाश्रमाचे नवीन सदस्य त्यांना नेहमीच स्वच्छता आवडतं असे खोली, पूर्ण घर अगदी स्वच्छ साफ आणि आनंदी वातावरणाचं असावं अस वाटायच त्यांच्या याच स्वभावाला समोर ठेऊन गार्गी ताई सगळी तयारी करत होत्या अगदी त्यांच्या आवडीचे पदार्थ देखील बनवले जात होते.
आणि शेवटी ती वेळ येऊन पोहोचलीच वृंदा आजी आश्रमात आल्या त्यांना आलेलं पाहून सगळ्यांनाच प्रश्न पडला होता इतक प्रसन्न व्यक्तीमत्व असून देखील ते इथ कसे आणि तसेच सगळ्यांना आनंद देखील झाला होता. आणि त्याच लोकांमध्ये एक चेहरा असाही होता. ज्यांना वृंदाताईना बघून खूप आनंद झाला होता ते म्हणजे अशोकराव.
अशोकराव आणि वृंदाताई दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकलेले पण त्यावेळेस ची परिस्थितीच अशी होती की दोघांना ही एकत्र येता आलं नाही आणि त्यामुळे दोघही एकमेकांपासून दुरावले गेले आणि आज तब्बल चाळीस वर्षानंतर त्यांची भेट झाली होती.
अशोकराव त्यांना बघून खूपच खुश होते त्यांना उत्सुकता होती तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची त्यांच्याशी बोलण्याची पण एकदम कस बोलणार हा विचार करून ते मागेच राहिले. व सगळ्यांनी त्यांचं स्वागत केल आणि गार्गी ताईंनी त्यांना आश्रमात आणलं. व त्यांची वीचारपूस करू लागले.

"कश्या आहात तुम्ही तुम्हाला इथपर्यंत यायला कसला त्रास तर नाही झाला न." गार्गी आपलूकीने विचारू लागते.

"मी ठिक आहे बस जगायचं आयुष्य आता असच." निराशेच्या स्वरात वृंदाताई म्हणतात.

त्यांचं बोलण ऐकून अशोकरावांचं मन विचारमग्न होत ते विचार करू लागतात अस काय घडल असेल हिच्या आयुष्यात. तेवढ्यात गार्गीताई बोलतात.

"आजी असा विचार नसतो करायचा हे बघा तुम्हाला कुठलाही एकटेपणा जाणवयला नको म्हणून सगळ्यांनी किती मेहनत घेतली आहे हे आता तुमचं ही घर आहे आणि इथे तुम्हाला कसलाच एकटेपणा जाणवणार नाही बघा तुम्हाला कधी नातवांची आठवण आली तर हे नेहमी तुमच्यासाठी उभे असतील. आम्हाला आणखी एक आजी मिळणार ह्या आनंदात ह्या निरागस मुलानी ही सजावट केलीये बघा. तुम्हाला एक सांगते आम्ही लोक तुमच्या मुलांची फॅमिली ची जागा घेऊ शकणार नाही पण तुमच्या मनात आमची एक वेगळी जागा निर्माण करु शकूत ह्याच्या जरूर प्रयत्न करुत." गार्गीताई प्रेमाने समजावतात

त्यांचं बोलण ऐकून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर स्मित हास्य उमटत आणि सगळे वृंदाताईंना आश्रमात घेऊन येतात. तेवढ्यात रामू सगळ्यांना चहा नाश्ता आणून देतो आणि सगळे गप्पा मारता मारता चहा नाश्त्याचा आनंद घेऊ लागतात.

काही वेळा नंतर...

नाश्ता करता करताच वृंदाताईंची नजर अशोकराव यांच्यावर पडते तस एका क्षणात त्यांच्या कॉलेजमधील आठवणी मनात ताज्या होऊन जातात आणि वृंदाताई त्या आठवणीमध्ये हरवून जातात. त्या क्षणी त्यांच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडतो.

"तुम्ही? इथे " वृंदाताईंचे डोळे पाणावलेले असतात त्याच स्वरात त्या विचारतात.

दोघ ही एकमेकांकडे भारावलेल्या नजरेने बघत असतात अशोकरावांना आपण काय बोलाव हेच सुचत नाही आणि त्याच भावनेने ते त्यांना विचारतात.

"कशा आहात तुम्ही?" अशोकराव

"मी छान आहे आणि तुम्ही?" वृंदाताई

"मी ही छान आहे. मी ऐकलं होत तुम्ही अब्रॉड ला शिफ्ट झाला होता अस." अशोकराव उत्सुकतेने विचारतात.

"हो, झालो होतो आम्ही अब्रॉडला शिफ्ट पण मग मुलाची परत इकडे ट्रान्सफर झाली त्यामुळे यावं लागलं नातवंडांना ही सांभाळायला कुणीतरी हव होत मग काय करणार यावं लागलं इकडे." चहा घेत वृंदाताई सांगतात.

"प्रत्येक घराची एकच कहाणी असते प्रत्येक मुलांना आपले आईवडील नको असतात तर त्यांच्या मुलांना सांभाळणारे हवे असतात. आणि त्यांची जेव्हा गरज संपते तेव्हा ते आपल्याला इथे सोडून देतात." एकजण निराशेच्या स्वरात सांगतात.

तेवढ्यात वासुदेव राव बोलतात.

"अहो शेंडे अस नका बोलु मला एक सांगा जस आपल्याला आपल स्वातंत्र्य महत्वाच आहे तस मुलांना मुलांना महत्वाच वाटल तर काय चूक आहे आपण मुलांच लग्न ही हाच विचार करून लावतो न काय वाक्य असत नेहमी आपल "एकदा का मुलांची लग्न झाली की आपण मोकळे." मग या मोकळे या शब्दाचा अर्थ काय तर आपल स्वतः च आयुष्य जगायला मोकळे बरोबर न मग एवढ निराशावादी का विचार करायचा द्या सोडून सगळ जगू द्या त्यांना ही त्यांचं आयुष्य. " वासुदेव राव समजावत बोलतात.

"तुमचं म्हणण पटतय हो फडके मला पण करू काय बापाचं काळीज आहे न आणि थोडी अपेक्षा ठेवणारच हो कुठलाही माणूस. बर ते सोडा (अशोकरावांना) अशोकराव मी मघापासून नोटीस करतोय तुम्ही ओळखता का एकमेकांना." शेंडे विचारतात

"अं, हो म्हणजे आम्ही कॉलेज" अशोकराव मध्येच बोलायचं थांबतात.

"मी सांगते आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो." वृंदाताई

"हो, हो तेच ते." अशोकराव लगेच वृंदाताईंच्या बोलण्याला दुजोरा देत सांगतात.

त्यांचं बोलण ऐकून सगळेच हसू लागतात आणि अशोकराव व वृंदाताई आपल्या गतकाळ्यातल्या आठवणींमध्ये हरवून जातात.

काही क्षणानंतर...

"वृंदा, आपल्या दोघांच ही आयुष्य एकाकीच आहे कॉलेज मध्ये असताना एक गोष्ट मला तुला सांगायची होती पण कधी हिम्मतच झाली नाही आणि आज तू माझ्या समोर आहेस तर आता ती वेळ आणि वय राहील नाही." वृंदाताईंचा हात हातात घेत अशोकराव आपल मन मोकळ करतात.

"अशोक जेव्हा वेळ होती तेव्हा बोलला नाहीस. पण एक सांगु मैत्री आणि प्रेम याला वयाच बंधन नसत कदाचित याक्षणी आपण भेटलो हे देवाच्याच मनात असेल. अरे एकटेपणा घालवायला आयुष्यभर एकत्र राहाण गरजेच नसत दोन दिवसाची मैत्री देखील पुरेशी असते. आता बघ न आपण वेगवेगळ्या जोडीदाराना आयुष्यभरा साठी निवडलं साथ दिली आणि त्यांनी काय केल आपलीच साथ सोडली आणि दोघांना ही एकाकी ठेवल आयुष्यभरा साठी. पण त्यात त्यांचा ही दोष नाहीये कदाचित आपण नव्याने परत भेटणार असूत म्हणून हे घडल असेल नाही का." वृंदा ताई समजावतात.

"मग आता मागचं सगळ विसरून जाऊत मुलांना त्यांचं आयुष्य जगू देऊत आणि आपण आपल आयुष्य जगू एकदम नव्याने स्वछंदपणे." आनंदाने अशोकराव सांगतात.

आणि दोघेही आपल्या आठवणीत हरवून जातात