मैत्री तुझी नि माझी

poem is about friendship

                                                              मैत्री तुझी नि  माझी

सुख  असो व दुःख

येति पहिले तुझेच नाव ओठी

आनन्दाने हसाया , दुःखामध्ये रडाया

घट्ट बांधल्या या रेशीम गाठी

जरी असले तनाने दूर

मन तुला भेटण्या आतुर

दुरावा असेल जरी क्षणाचा

पुरावा आहे हा एकत्रपणाचा

मैत्री आपली शान !

मैत्री आपली महान

जीव जरी असले दोन

एकचं  आपले मन

रडता रडता हसलो

हसता हसता रडलो

भरभरून जगलो

कठीण समयी सुद्धा तरलो

 वाढदिवस माझा ,पार्टी तुझी

नंबर तुझा पहिला , पार्टी माझी

कॅन्टीन मध्ये दोघींची एकच ख्याती

सेलिब्रेशन ला असतात नेहमीच राजी

मैत्री म्हणजे प्रेमाचा सागर

सुख ,प्रेम,आनंद आणि भावनांची कदर

मायेची उब  आणि विचारांचा आदर  

कितीhi  भरली  तरी  रीती मैत्रीची घागर

मैत्री तुझी नि  माझी

अतूट आणि अनंत अनादी

 साथ तुला माझी मला तुझी

रहो सदा हात तुझा हाती

© शीतल महामुनी माने