गोष्ट छोटी डोंगराएवढी..
" आयला, कसला सॉलिड दिसतो आहे ना तो?" शमा म्हणाली.
" कोण?" स्पृहाने रागातच विचारले.
" तो बघ ना, लाल टीशर्ट.."
" नशीब...." स्पृहाने सुटकेचा निश्वास सोडला.
" तुला काय झाले ?"
" मला तो निळा टीशर्ट आवडला ना.." दोघीही एकमेकींना टाळ्या देत खिदळल्या.
शमा आणि स्पृहा दोघीही शाळेतल्या मैत्रिणी. म्हणजे मैत्री यांची छोटा शिशु पासूनची. एकच शाळा. घरे जवळजवळ. त्यामुळे सतत एकत्र. वाढदिवस अगदी एकाच दिवशी नसले तरी एकाच महिन्यातले. दिसायला, वागायला दोघीही सारख्या. अभ्यासात, खेळात नेहमीच बरोबरी. पण आवड मात्र दोघींची वेगळी.. शाळा एकत्र. नंतर कॉलेज एकत्र. आता तर दोघींच्याही घरच्यांना सुद्धा टेन्शन आले होते की यांचे लग्नानंतर काय होणार? पण हा प्रश्न दोघींनीच सोडवला होता.
लाल शर्ट म्हणजे समीर आणि निळा शर्ट म्हणजे प्रतीक. दोघींनाही ते आवडले होते. पुढे जाण्याआधी दोघींनीही आधी हे बघितले की ते राहतात कुठे.. दोघेही जेव्हा जवळजवळ राहतात हे कळले तेव्हाच त्यांनी प्रियाराधन चालू केले. मुले चांगली आहेत, मुलींना पसंत आहेत हे बघून दोघींच्याही घरातल्यांनी लग्नाला परवानगी दिली. एकाच मांडवात जरी नाही तरी दोनतीन दिवसांच्या फरकाने शमा आणि स्पृहाने समीर आणि प्रतीकच्या गळ्यात माळ घातली. ते दोघेही मित्र होतेच पण यांच्या मैत्रीमुळे त्यांचे चौघांचे एक कुटुंबच तयार झाले होते. हनिमूनला जाऊन आल्यानंतर चौघेही खुश होते. नवीन आयुष्य जगत होते..
" शमा.. मला तुला काहीतरी सांगायचे आहे.."
" स्पृहा फोन मी केला आहे.. आधी मी सांगणार."
"बरं.. दोघी एकत्र बोलू.."
" बरोबर.."
" ऐक.. तू मावशी होणार आहेस."
" शमा.."
" स्पृहा.."
" किती छान ना.. आपल्यासारखी आपली मुले पण एकमेकांशी मैत्री करतील."
" हो ना.. अगदी पिक्चरमध्ये चालू आहे असे वाटतेय." दोघीही पुढच्या स्वप्नात दंगून गेल्या. दोघीही एकाच डॉक्टरकडे जायच्या. डोहाळजेवण झाले आणि वेध लागले बाळाच्या आगमनाचे.
" शमा, मला ना मुलगा पाहिजे. मस्त डॅशिंग अगदी प्रतीकसारखा."
" मला ना काहीही चालेल. जे असेल ते माझेच असेल ना?"
" तू पण ना बोअरिंग आहेस. थोडीशी उत्सुकता दाखव की. तुझे बाळ आले ना की मीच त्याला ट्रेनिंग देणार आहे. समजले?" दोघीही बोलता बोलता हसायला लागल्या आणि अचानक शमाचे पोट दुखायला लागले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा