Login

मैत्री म्हणजे काय असतं?

मैत्री वरील लेख
मैत्री म्हणजे काय?....एक अस नातं जे प्रत्येकाला हवं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी मित्र-मैत्रिण तर असतेच. हे नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ नातं असतं. जिथे धर्म, जात-पात, पैसा, प्रसिद्धी, रंग, रूप, वय, गरिबी-श्रीमंती, लहान-मोठा हे काहीही महत्वाचे नसतं. असती फक्त आणि फक्त मैत्री. मैत्रीमध्ये कोणताही भेदभाव नसतो. मग तो स्त्री असो पुरूष, कोणी ही असो. मैत्री ही मैत्रीच असते. निरपेक्ष, निस्वार्थ, निखळ, नितळ मैत्री.

मैत्रीत मनाच्या तारा जुळतात. आपुलकी, माया, जिव्हाळा, काळजी, आदर आणि खूप सारं प्रेम आणि विश्वास असतं मैत्रीत. मैत्री ही निरपेक्ष निस्वार्थ, पारदर्शक हवी.

मैत्री कधी ही कोणाशीही होऊ शकते. मैत्री कधीच ठरवून नाही होत ती आपोआप होऊन जाते. अनोळखी कधी ओळखीचा होतो आणि कधी मैत्री होऊन जाते हे देखील नाही कळत. स्वभाव वेगवेगळे, मते ही वेगवेगळी तरीही मैत्री होतेच.मतभेद ही होतात, एकमेकांना ओरडतो देखील, रागावतो, भांडतो सुध्दा. हे ही असायला हवं, ना.त्याशिवाय ती मैत्री मैत्री नसते आणि त्याची किंमत नाही ना कळतं. पण तरीही मैत्री नाही तुटत ती आणखी दृढ होत जाते. पण हा, त्यात विश्वास असणं खूप महत्त्वाचं. त्यावर हे नातं आणखी जास्त घट्ट होत जातं.

मैत्रीमध्ये गैरसमजाला जागा नसावी.कारण त्यामुळे मैत्रीत दरार पडू शकते. कित्येक वर्षाची मैत्री तुटते ती केवळ एक छोट्याशा गैरसमजामुळे. त्यामुळे चूकून जर गैरसमज झाले असेल तर तो वेळीच दूर केले पाहिजे.

मैत्रीशिवाय जीवन अधूर आहे. त्याशिवाय जीवनात रसच पण नाही. निरस असते जीवन .जस की मिठाशिवाय जेवणात काहीच अर्थ नाही तसेच जीवनात मैत्रीशिवाय अर्थच नाही. मैत्रीशिवाय आयुष्याची कल्पनाही करूशकत नाही कोणी. म्हणूनच मैत्री खूपच महत्त्वाची. म्हणूनच प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात किमान एक तरी मित्र-मैत्रिण असायला हवं,असतेच म्हणा ..

प्रत्येकाच्यात काही ना काही दोष असतातच त्या दोषांसहित मित्र-मैत्रिणीला स्वीकारले पाहिजे. आपल्या मनात जे काही असतं ते फक्त आपण त्याला/तिलाच सांगतो. मनात काय चाललंय हेही फक्त तोच जाणतो. आपल्या सुख-दुःखात सोबत असतो. आपल्या कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही संकटात खंबीरपणे आपल्या पाठीशी ठाम उभा राहतो. 'मी आहे ना ,नको काळजी करुस'हे त्याचे एवढेसे शब्दही मनाला दिलासा देऊन जातात. आपल्या आनंद-दुःख दोन्हीमध्ये सहभागी होते ती मैत्री.

आपल्या मनातील सर्व काही सांगण्याच हक्काच ठिकाण म्हणजे मैत्री. आपल्या मनातलं गुपित खुलं करतो ते फक्त मैत्रीच्या दारातच.दिलखुलास, मनसोक्त गप्पा मारण्यासाठीचे हक्काचे अंगण म्हणजे मैत्री.

कोणत्याही विषयावर सहजतेने, मोकळेपणे बोलण्याचे महत्वाचे आणि हक्काचे ठिकाण म्हणजे मैत्री. मैत्रीमुळेच जीवन सुखकर होते. मैत्रीमुळेच आयुष्य हसतखेळत राहतं. मैत्रीमुळेच जीवनाला नवीन आयाम,दिशा मिळते.

जीवाला जीव देणारी मित्र-मैत्रिणी जीवनात असले ना तर मग आयुष्यात कितीही संकटे आली तर काहीच फरक पडत नाही. उलट न डगमगता त्या संकटाशी सामाना करण्याचे बळ मिळते.

सुखामध्ये जे हात आपल्या खांद्यावर असतात तेच हात दुःखातही आपल्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी पुढे सरसावले जातात.

मैत्री ही फुलबागासारखी फुलतं बहरत राहावी. सोन्यासारखी नेहमीच चमकत राहावी. लोखंडाच्या साखळीप्रमाणे अटूट आणि घट्ट राहावी पण गंज चढू देवू नये. मैत्री जूनी असू अगर नवी असू ती नेहमीच बहरत राहावी.

"दोस्तों के बिना अधुरी है जिंदगी ...
वे हो तो आबाद है जिंदगी ....
गम हो या खुशी ....
उनसे ही है होठों पर हँसी ....
हर पल साथ हो तेरा ....
तू ही सच्चा यार मेरा ....
रहना तुम हमेशा साथ मेरे .....
करना ये वादा हाथो में लेके हाथ मेरे ....
रहना जिंदगी भर यूँ ही हमेशा साथ मेरे....
रहना जिंदगी भर यूँ हीहमेशा साथ मेरे"....

©️ जयश्री शिंदे