महिषासुर मर्दिनी

------

महिषासुर मर्दिनी 


रश्मी एक हूशार विद्यार्थिनी. कॉलेज मध्ये अव्वल, खेळत अव्वल. त्यात घरच्यांनी स्वरक्षणासाठी धडे दिले होते. समाजसेवेचे वेडही होतेच. समोरच्याची मदत करायची पण अशी की समोरच्याला ते उपकार वाटू नयेत. मोकळ्या मनाची आणि हसरी रश्मी प्रसंगी दुर्गा रूप धरायची. त्यामुळे सर्व शक्यतो वचकूनच असतं. 

एकदा एका प्रोजेक्ट संदर्भात मैत्रिणीकडे गेली. निघायला उशीर झाला. मैत्रीनिचे वडील म्हणाले मी येतो सोडायला. पण रश्मी नको म्हणाली, " सोबत गाडी आहे. गाडीतूनच तर जायचं आहे मग तुम्ही का त्रास घेताय काका ?  " असं ती म्हणते. घरी पोहचल्यावर कळव असं म्हणून मैत्रीण तिला निरोप देते. 

गाडीत स्लो गाणं वाजवत आणि गुणगुणत रश्मी निघाली खरी पण आजूबाजूला नावालाही माणूस प्राणी दिसत नव्हता. रश्मी मुळातच निडर असल्यामुळे या गोष्टीचा तिला फरक पडत नव्हता. पुढे आल्यावर रश्मीला एका मुलीचा आवाज आला " वाजवा ". पण रश्मीला वाटलं की भास झाला असेल. पण पुन्हा तोच आवाज आला. आणि येतच राहिला. रश्मीने गाडी थांबवली. तिने अजून एकदा खात्री  केली आणि पोलिसांना phone करून सर्व सांगितलं आणि लोकेशन पाठवलं. त्यानंतर रश्मी त्या आवाजाच्या दिशेने चालू लागली. 

थोडं पुढे चालत गेल्यावर तिला दिसलं की झाडा - झुडपात एका मुलीला खेचून ३-४ मुलांनी नेलंय आणि तिच्यावर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या मुलीला रश्मी दिसते आणि ती रश्मी कडे वाचवण्याची विनवणी करते. मुलांचं लक्ष तिच्याकडे जात आणि ते हसू लागतात. अजून एक सावज मिळालं म्हणून. रश्मी सुद्धा जोरात हसते. ते पाहून ती मुले गोंधळतात. म्हणतात, " तू आमच्या तावडीत सापडली आहेस तरी तू हसतेस?  " रश्मी म्हणते, " तुमच्या पैकी कोणीही मला हात लावू शकत नाही. तेवढी सक्षम मी आहेच. मी लहान होते ना, तेव्हा कुणी मारलं की मी रडत घरी आईकडे जायचे. आईने एकदा - दोनदा पाहिलं आणि तिसऱ्यांदा मला म्हणाली, " यापुढे कोणाचा मार खाऊन माझ्याकडे रडत आलीस ना तर, मी अजून दोन रट्टे देईन. तुला पण हात आहेत ना मग ?  समोरच्याने ४ मारल्या तू १ तरी मारू शकतेस ना ?  " तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, घरी कोणती गोष्ट नेण्याची गरज पडली नाही. " आता राहिला प्रश्न तुमचा, तुमच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला फक्त एकदा या मुलीशी बोलायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं काम करा मी अडवणार नाही. मुलंही रश्मीकडे पाहतच राहतात. 

रश्मीचं बोलणं ऐकून त्या मुलीच्या डोळ्यात पाणी येतं. रश्मी त्या मुलीला उचलून उभी करते. ती मुलगी रश्मीला म्हणते, " एक मुलगी असून तू असं म्हणतेस?  तू सुद्धा एक मुलगीच आहेस ना ? " तिचं बोलणं ऐकून रश्मी तिच्या कानाखाली मारते. त्या मुली सोबतच ती मुले सुद्धा हैराण होतात. 

रश्मी बोलते, " तुझ्यासारख्या मुलींमुळे बाकीच्या मुलींचा आत्मविश्वास नाहीसा होतो. तुझ्यासारख्या मुली ज्यांना सहन करण्याची सवय असते. त्या त्यांच्यावर होणार अन्याय सहन करतात. पेपरात बातमी येते. बाकीच्या मुलींच्या मनात भीती आणि मुलांच्या मनात आपण काहीही करू शकतो अशी भावना निर्माण होते. हे सर्व तुझ्या सारख्या मुलींमुळेच. काही मुली ज्या अपंग आहेत किंवा विरोध करण्याच्या परिस्थितीत नाहीत अशांचं समजू शकते पण तू धडधाकड आहेस ना. ( रश्मी त्या मुलीला चिथवण्याचा पूर्ण प्रयन्त करते. ) अगं तुझ्यावर होणारा अन्याय बघायला इथे कोणी नाही. याचाच अर्थ तुझ्यावर अन्याय करणार्याचा तू वध करताना बघायला सुद्धा इथे कोणी नाही असा होतो. स्त्रीने लक्ष्मी, सरस्वती आणि अन्नपूर्णा व्हावं, तसंच वेळ प्रसंगी महिषासुर मर्दिनी सुद्धा बनाव. तुला नसेल येतं कराटे पण एक एकाची डोकी तू नक्की फुडू शकतेस. ज्या स्त्रीवर कोणी अत्याचार करण्याचा प्रयन्त करत असेल तर तिला त्याचा खून करण्याचाही अधिकार कायद्याने दिला आहे. आज मी वाचवेन, उद्या मी नसेन तेव्हा  ?  तेव्हा काय करणार?  जो पर्यंत तू स्वतः विरोध करत नाहीस तो पर्यंत तुला त्रास देतच राहणार हे.  मुलींनी असं बनाव की मुलांना बघून तिने नव्हे, तर तिला बघून टुकार मुलांनी त्यांची वाट बदलली पाहिजे. आता तू ठरव काय करायच ते. " 

नक्की काय घडतंय हे त्या मुलांच्या लक्षात यायला वेळ जातो पण लक्षात येतच ते त्या दोघींकडे धाव घेतात. रश्मी हाताने तिच्याकडे येणाऱ्याला थांबवते आणि म्हणते, " मला नंतर पकडा आधी तिला आवरून दाखवा. " पण तो पर्यंत ती मुलगी पेटून उठली होती. खाली पडलेले दगड उचलून एक एकाच डोकं फोडलं. जे हाताला मिळेल त्याने ती त्या मुलांना मारायला सुरुवात करते. मुलांना कळत नव्हतं की अचानक हिच्यात एवढी ताकद आली कुठून?  ती त्यांना एवढं मारते की त्यांना तिथून पळणं ही कठीण झालं होतं. रक्ताने बरबटले होते. आणि त्या मुलीचा अवतार पाहून साक्षात दुर्गा समोर आहे असं वाटतं होतं. 

तेवढ्यात पोलीस तिथे येतात आणि त्या मुलांना पकडतात. पोलीस तिला विचारतात, " FIR करायची आहे का?  कारण अश्या केस मध्ये मुली समोर येतं नाहीत. नंतर आम्ही तोंडावर पडतो. " त्यावर ती मुलगी म्हणते, " साहेब तुम्ही FIR नोंदवा, मी मागे फिरणार नाही, मला आताच कोणीतरी सांगितलं की माझ्यासारख्या अन्याय सहन करणाऱ्या मुलींमुळे बाकीच्या मुलीच्या मनामध्ये भीती तर मुलांमध्ये आपण काहीही करू शकतो ही भावना निर्माण होते. त्यामुळे आता गप्प नाही बसणार. माझ्यामुळे मुलींच्या मनात आत्मविश्वास की माझं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. कारण माझ्यातच दुर्गा आहे, आणि मुलांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे की असं काही केलं तर हॉस्पिटल किंवा देवाचं घर. त्यामुळे उद्याच्या headline ने एक नवी उमेद पसरू द्या. पोलीस तिच्या निर्णयाच कौतुक करतात आणि त्यांना घेवून जातात. 

गाडीवरून परत घरी निघालेली रश्मी त्या मुलीला विचारते, " घरी सोडू का? " त्यावर ती मुलगी म्हणते, " याच रस्त्याने नेहमी जायचं आहे. त्यामुळे मला रस्ता बदलण्याची गरज पडणार नाही, आणि मला बघून नालायक मुलांना रस्ता बदलण्याची गरज पडेल असं जगायचं आहे. त्यामुळे आता एकटीनेच गेलं पाहिजे. रश्मी हसून तीला निरोप देवून निघून जाते. 

दुसऱ्या दिवशी रश्मीची बहीण पेपर नाचवत येते आणि म्हणते, " आई, बाबा, ताई बघा किती छान बातमी आहे. काल एका मुलीवर ३ -४ जण मिळून अत्याचार करण्याचा प्रयन्त करत होते. त्या मुलीने त्यांना एवढं मारलं की ते सध्या हॉस्पिटल मध्ये आहेत. नेहमी मुलीवरच्या अत्याचारांची बातमी ऐकून खरंच खूप वाईट वाटत होतं. पण आता खूप छान वाटतंय. रश्मीला बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून फार छान वाटत. 

( रश्मी तुम्हा आम्हांला भेटेलच असं नाही. पण आपण कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी नेहमी तयार राहायला हवं. मान्य प्रत्येक स्त्री कराटे वगैरे शिकू शकत नाही. पण आपल्या आतल्या जगदंबेला जागृत ठेवा. स्त्री पेक्षा ताकदवर दुसरं कोणी नाही. ही गोष्ट आधी स्वतः स्त्रीला पटली पाहिजे.  घरात कोणत्याही परिस्थितीत डळमळीत न होता स्वतः सोबत घर सावरते, ती लक्ष्मी, सरस्वती होते. कारण तिची मानसिक स्थिती त्यासाठी मजबूत असते. तसंच तुमची मानसिक स्थिती मजबूत ठेवा, आणि वेळ प्रसंगी महिषासुर मर्दिनी बना. )

काही निवडक कथा ...

डेडलाईन 

https://www.irablogging.com/blog/deadline

भाकरी 

https://www.irablogging.com/blog/bhakari_4547

दान 

https://www.irablogging.com/blog/daan_4609

 पेरावे ते उगवते 

https://www.irablogging.com/blog/perave-te-ugavate_6344

संस्कारच नाहीत 

https://www.irablogging.com/blog/sanskarch-nahit_6444

प्रमोशन 

https://www.irablogging.com/blog/promotion-_6482

कठोर ममता भाग १ 

https://www.irablogging.com/blog/kathor-mamta---bhag-1_6311

कठोर ममता भाग २ ( अंतिम )

https://www.irablogging.com/blog/kathor-mamta---part-2-antim_6317

माझा पैसा उधळण्यासाठी नाही भाग १ 

https://www.irablogging.com/blog/majha-paisa-udhalnyasathi-nahi-_6383

माझा पैसा उधळण्यासाठी नाही भाग २ अंतिम

https://www.irablogging.com/blog/majha-paisa-udhalnyasathi-nahi-antim_6393