माहेरवाशीण भाग३

माहेरवाशीण

जलद कथा मालिका.                                                        माहेरवाशीण भाग ३.                                                                 आणि संदीप बोलतो करूणेला विचारा माहेर म्हणजे काय...करुणा बाई करा सुरू तुमचं भाषण.....खरतर पोरं आमची खिल्ली उडवत होते पण करुणा बोलू लागली आणि सर्वजण शांतपणे ऐकू लागले.करूणाचं लग्न होऊन पाच वर्ष उलटली होती,तसा तिचा प्रेमविवाह पण लग्नानंतर ते प्रेम जणू काही गायबच झालं होत की काय कोण जाणे...अस तिच्याकडे पाहून स्पष्ट जाणवत होतच...पण जस करुणा बोलत होती तसा सर्व गोष्टींचा उलगडा होत होता...                                                                              माहेर ही संकल्पना नव्याने समजायला लागली होती ...करुणा बोलली माहेरच्या लोकांसाठी सहन होईल तेवढा सासरच्या मंडळींचा त्रास सहन केला आणि तिकडेच रहात होते कारण माहेरच्या सर्वांनी सांगितलं होत मनाने लग्न केलंय तिकडेच तोंड काळं कर....पण मी घरच्यांची पण संमती घेऊनच लग्न केलं होतं ना गं , पण असो त्यांची काही चूक नाही. ज्या मुलावर विश्वास ठेवला सगळ आयुष्य आणि माझ सर्वस्व मी ज्याला दिलं त्याला च माझी कदर नाही.                                                                              व्यसनी निघाला गं तरीही मी त्याच्यासोबत संसार करायला तयार होते आणि करत ही होते पण कदाचित नियतीला ते मंजूर नसावे.माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यातच त्याच निधन झालं , आणि सासरच्या लोकांनी सांगितल आमचा मुलगाच आता राहिला नाही तर तू पण इथे नाही रहायचं तुला हे घर सोडावं लागेल...नवऱ्याच दुःख करायला सुद्धा वेळ दिला नाही देवाने जणू काही एकामागून एक असे धक्के द्यायचेच ठरवले होते...आता मला माहेर सोडून पर्याय नव्हता, पण माझ्या घरचे पण बोलत होते मनाने लग्न केलंय ना तर मग भोग आता कर्माची फळे, बाबा मला घरी आणायला तयार नव्हते लोक काय बोलतील, समाजाचं काय असं बोलत होते ,तेव्हा मात्र मला वाटलं होत सीता माते प्रमाणे धरणी मातेने मला तिच्या पोटात घ्यावे, काहीच सुचत नव्हतं पायाखालची जमीन सरकली होती,पण कदाचित भावाला माझी दया आली असावी आणि म्हणाला तिला घरी नेऊ आपण आणि मग मी इथे आले कायमची माहेरी ...                                                                        वेगळी रहाते मी एकटी.माहेरी असून सुद्धा माहेरपण नशिबात नाही माझ्या...असो नशिबाचे भोग दुसरं काय. पण हा समाज कुत्सित नजरेने पाहतो ग लोकांची टोमणे नको वाटतात आता म्हणून मी आता कोणाशी बोलत नाही सर्वांशी बोलणं टाळते.... आणि हं खर सांगू का जेव्हा मुलगी सासरी असते ना तेव्हा तिचे सर्व हट्ट, लाड पुरवले जातात आणि खर सांगू आपल्या मुलींना पण अस वाटत माहेर म्हणजे खूप थकल्यावर हक्काने मिळणारा सुखाचा विसावा , मन हलक करण्याचं एकमेव ठिकाण , एकमेकांची मस्करी करणारे हक्काचे मिञ , भांडणारे पण तितकंच निस्वार्थ प्रेम करणारा भाऊ ...पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा सगळी नाती , माणस बदलतात....                                                                          पण या सगळ्यात घुसमट कोणाची होते, आपल्याला समजून घेणार अस कोणी नाही उरत. उरतात ती फक्त स्वार्थी नाती, आणि आपल दुःख कमी करण्याऐवजी त्यावर मीठ कसं चोळत येईल हे काम समाज अगदी चोख पार पाडत असतो.यालाच तर समाज म्हणतात. कधी कधी तर आपलीच मानस जखमेने खपली धरलेली असताना देखील खपली काढून जखम अधिक कशी चिघळेल आणि रक्तभंबाळ होईल याची काळजी घेतात, आणि तेव्हा वाटतं आपण कुठे आहोत सासरी की माहेरी , शंका येते खरच का हे माहेर आहे माझा नवरा अपघातात गेला यात माझी काय चूक....                                                            शेवटी हाच समाज बोलतो.. काय तर..तुझ नशीब काय करणार. पहा ना कसं असत आयुष्यातला एक निर्णय चुकला की आयुष्यच कसं चुकत जात समजत देखील नाही.पण मला नेहमी एक प्रश्न पडतो आपण सगळेच काय बोलतो जे नशिबात आहे तेच होणार तिथे कोणाचं काही चालत नाही....बरोबर ना? मग आपण हे सगळं किती सहज विसरतो आणि इतरांना दूषण लावतो.....तेव्हा का नाही कोणी बोलत नशिबात होत तेच झाल त्याला कोण काय करणार....समजाची रीतच आहे ती... आता मी कोणावर ही अवलंबून न रहाता जिथे आणि जे मिळेल ते काम करते किंवा कोणाच्या शेतात काम करून गुजराण करते. मला तर सासर आणि माहेर यामध्ये काहीच फरक नाही वाटत.                                                         क्रमशः

🎭 Series Post

View all