"हुश्श..किती मेली गर्दी त्या ट्रेनला! त्यात ही दोघे. शीतल.. जरा थंडगार पाणी आण बाई.. उकडायला लागलं नुसत!" सत्या
"कश्या आहात वन्स? घरी कसे आहेत सगळे?" शीतल विचारणीच्या सुरात बोलली.
"घरी सगळे मजेत आणि मी पण ठणठणीत आहे हो..तू काळजी करू नको एवढी. जा.. जरा चहा टाक दुधाचा..आणि वेलची जायफळची पूड पण घाल." सत्या तुसडेपणाने बोलत होती.
शीतल भरल्या डोळ्यांनी एक नजर सासू वर टाकून आत निघून गेली.
"बरं, बाकी काय म्हणतेस सत्या? जावई बरे आहेत ना?" सुमन ताई
"हो, बरे आहेत ते. बरं आई.. माझी खोली आवरून ठेवली आहे ना ग?" सत्या
"हो, शीतल ने अगदी छान आवरून ठेवली आहे तुझी खोली. तुला आवडतात म्हणून गुलाबाचे गुच्छ आणि चाफ्याची फुलं ही ठेवली आहेत हो!" सुमन ताई
"अग हो हो.. किती ते कौतुक सुनेचं?अश्याने डोक्यावर बसेल ती!" सत्या कुत्सितपणे बोलली आणि तिच्या खोलीत निघूनही गेली.
शीतल मात्र शांत राहून सासुकडे पहात होती.
"मामी मामी..आमच्यासाठी शिरा बनवला आहेस ना?" क्षितिज आणि सारा मामीला बिलगत विचारत होते.
"हो..बनवला आहे ना! माझ्या दोन लोडोबांना शिरा आवडतो आणि मामी बनवणार नाही अस होईल का?" शीतल दोघांच्या डोक्यावरून हात फिरवत आणि दोघांच्या गालावर पापा घेत बोलली.चला आता तुम्ही फ्रेश होऊन घ्या मग मी शिरा देते.
मुलं खुश होऊन शीतलला मिठी मारून फ्रेश व्हायला गेली. इकडे चहाला उकळी आली तशी शितलने गॅस बंद केली.
सुमनताई बाहेरचा पसारा आवरत होत्या.
"अग आई..शीतल करेल की, तू बस माझ्या सोबत! जरा बोलूया निवांत बसून. "सत्या पुन्हा शितलकडे बघत बोलली.
"हो आई.. बसा तुम्ही मी आवरते." सुमन ताईंच्या हातावर हात ठेवत शीतल बोलली.
"उगाच नखरे ते नुसते.." म्हणत सत्या ने मान हलवली.
" आई ग.. यावेळी मी चांगले पंधरा दिवस राहणार आहे हो. तुला काही हरकत नाही ना? सत्या शीतलला सांगण्यानिमित्ताने जरा मोठ्यानेच बोलली.
"नाही ग.. आम्हाला कुणाला काहीच हरकत नाही. घरची पोर माहेरवाशीण म्हणून सणासुदीला येणारच ना! त्यात हरकत कशाला असेल." सुमन ताई
"हो, नशीबच माझं..मला माहेर आहे ना! काहींना ते ही नसतं!" नाक मुरडत आणि हसत सत्या बोलली.
तिचे एक एक शब्द शीतलच्या जिव्हारी लागत होते पण शीतल अगदी तिच्या नावाप्रमाणेच शांत होती. कधी कोणाला उलट उत्तर नाही की दुखवणार नाही.
*****************
शीतल आणि विवेकची भेट कॉलेजच्या शेवटच्या वर्षीच्या निरोप समारंभाला झाली होती. शीतल अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली होती. स्वतःच्या हिमतीवर आणि स्कॉलरशिपच्या जोरावर तिने शेवटचं वर्ष पूर्ण केलं होत. अभ्यासू आणि कामसू मुलगी. शांत स्वभाव..कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. पार्ट टाईम जॉब करून आणि नोट्स वरून तिने सगळा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तिची जिद्द आणि मेहनत कॉलेजच्या सगळ्याच प्राध्यापकांना माहीत होती.
विविके पण अगदी तसाच.. लहान असताना वडील गेले त्यामुळे आईने खूप कष्टाने त्याला वाढवलं होत. आईचे कष्ट त्याने पाहिले होते म्हणून तो नेहमी जे असेल तेवढंच मागायचा. आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याची जिद्द होती त्याच्यात पण कोणाकडून कधी कसली अपेक्षा नाही ठेवली त्याने त्यामुळे तो ही पार्ट टाईम जॉब करून अभ्यास करत होता.
विवेक थोडा बोलका होता पण शीतल मात्र अबोल.. मोजकच बोलायची त्यामुळे तिला जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. निरोप समारंभाच्या दिवशी बाकी सगळ कॉलेज मज्जा मस्ती करत होत आणि ही दोघेच नोट्स काढत होते. प्रश्न उत्तर या निमित्ताने तो तिच्याशी बोलत होता. विविकेला शीतल आवडायची पण त्याने कधी हे सांगण्याच धाडस केलं नव्हत. दोघे एकाच वर्षाला होते पण मुलींचं कॉलेज वेगळं आणि मुलांचं वेगळं होत. सण समारंभ साजरा करायला दोन्ही कॉलेज एकत्र यायचे. त्यामुळे शीतलने कधी विवेकला पाहिले नव्हते पण विवेक मात्र रोज तिला पहायचा. त्याच्या आईला आणि घराला शितलच सांभाळू शकते याची त्याला खात्री होती. शेवटच्या दोन पेपर आधी विवेकने ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली. मुळात आई बापाविना वाढलेली विवेकची आई ..तिला अनाथ असणं काय असतं हे चांगलच माहीत होत म्हणून तिने विवेकला शीतलला लग्नाची मागणी घालण्यास सांगितल.

दुसऱ्या दिवशी विवेक तासभर लवकरच गेला आणि त्याने शीतलला गाठून त्याच्या मनातली गोष्ट सांगितली.
"शीतल.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..माझी जीवनसंगिनी होशील? हे बघ, वर्ष दोन वर्ष फिरून विचार करण्यात वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. तू विचार करून उत्तर दे आणि तुला गर्लफ्रेंड म्हणून फिरवण्यापेक्षा माझी बायको म्हणून मिरवायला मला जास्त आवडेल. तुझ्या उत्तराची मी वाट बघतोय.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे..
क्रमशः
@श्रावणी लोखंडे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा