माहेरची दिवाळी

Maherchi Diwali

तो ऑफिसमध्ये काम करून थकला होता...आणि त्याला आज घरी ही लवकर जायचे होते...ती त्याची वाट बघत असेल असे वाटत होते..त्याने तिला फोन ही केला..ती मात्र सासुबाईने सांगितलेली कामे करत होती...खूपच दमली होती...तिला ही त्यातून सुटका हवी होती...पण हा तिचा नवरा तो मात्र ऑफिसमध्ये मग्न होता...त्याला ओव्हरटाईम चे पैसे मिळणार होते...त्यातून तो तिला सोन्याची अंगठी करणार होता...

तो नेमका श्वास टाकत बाहेर पडला तिला फोन लावला होता ,आणि ती तिकडून हॅलो हॅलो करत होती।,त्याचा आवाज येत नाही म्हणून तिने फोन कट केला...रागात होती ,चिडली होतीच सकाळपासून... सासूने नुसते कामच काम लावले होते...कामाचा सटाका जणू सुरूच केला होता...घरातील अडगळ ,तर डब्बे...जुने कपडे...तर बेडशीट तर कुठे ट्रॉली साफसफाई करत करत ती दमली होती...सासू कडक लक्ष्मी ती मात्र काम काढतच होती...सगळे काम जणू आजच्या आज करून बसायचे होते असे भराभर उरकत होत्या...बरेच घर जे जुन्या अडगळीने भरले होते ते नवीन सून येताच रिकामे करण्याच्या जिद्दीने पेटून उठल्या होत्या...सकाळी भरपेट सुनेच्या आवडीचा नाश्ता केला जाता, दुपारी ही तोच नाशता होता, तर एक ग्लास ऊसाचा रस जो त्याने तिच्यासाठी आणला होता तो आईने आणि सुनेने जेवणानंतर घेतला होता...जेवण करून गच्च पोट भरले होते ,आणि आता तिला सुस्ती आली होती , पडू का असे शब्द ओठावर आले होते ,इतक्यात सासूबाई म्हणाली ,आता मोर्चा सगळ्या गॅलरी कडे वळवायचा आहे, तिथली सगळी घाण काढायची आहे,खूपच जळमटे झाली आहेत , खूप दिवस झाले कोणी बारीक व्यक्ती शोधत होते पण कोणी सापडले नाही ,तशी तू बारीक आहेस तू खूप सहज करू शकते हे काम...मग।पुढे पुढे पाहू...आज तूच कर...सुनेची हे ऐकून झोपच पळाली....आईच्या घरी इतक्या दिवाळ्या केल्या पण इतके कधीच जाणवले नाही की दिवाळी आली आहे।, तोंडावर आहे ,केसात आहे...पण आज प्रकर्षाने जाणवले आहे दिवाळी केसात आहे, तोंडावर पडलेली जाळी ,जळमटे सांगत आहे, दिवाळी आली आहे , लगे रहो...माहेर आई हे काम रामू दादा आणि त्याच्या बायकोकडून करून घ्यायची , मी फक्त रांगोळी काढायला बाहेर यायचे...मला आई म्हणायची जरा पार्लर मधून जाऊन ये, थोडे केस कट कर ,फॅसिल कर...म्हणजे छान उजळेल चेहरा...किती धूळ धूळ अश्याने तुझी त्वचा खराब होईल...वेळीच काळजी घे...पण सासरी कोणीच काळजी घे असे चुकून ही म्हणत नाही ,ह्याची जाणीव झाली....माहेरची दिवाळी खरंच दिवाळी वाटत होती...वरवर सगळी कामे परस्पर होत होती,आई करून घेत होती पण सासरी हे कधीच शक्य नाही होणार...लक्ष्मी म्हणून घ्यायचे आणि कामाला लागायचे..

इतकी तणतणत असतांना त्याचा परत फोन येतो...

ती लगेच म्हणते बोल आता तुझी काही कामे बाकी असतील तर सांगा, मी आहे करायला मोकळी...सकाळपासून जरा ही उसंत नाही मिळू दिली ना आराम जरा ही...सगळी साफसफाई जणू माझ्यासाठी ठेवली होती...जणू माझ्याच हाताने करून घ्यायची होती...मी पुरती दमले एका दिवसात, मी माझ्या माहेरी ह्यापेक्षा किती तरी पट आरामात होते...

तो लगेच म्हणाला ,अग हो हो जरा आरामात बोल ,आई असेल मागे तर ऐकेल ,तिला वाईट वाटेल, तिने दिवाळीला हे काम मुद्दाम नाही काढले ,तिला तर नकोच होते हे काम पण दिवाळी जर अश्या राढ्यात साजरी केली तर लोक काय म्हणतील...पण एक गोष्ट सांगू तू फटकन म्हणू शकली असतीस आईला ,तुझ्या त्या तोऱ्यात...की हे काम मी कधी केलेले नाही ,मी करणार नाही ,मग का तू करत बसली सकाळपासून... म्हणायचे होते...तुम्ही तुमचे काम करा...मी करणार नाही...

ती लगेच म्हणाली ,तू मूर्खासारखे कसे बोलू।शकतोस असा, मी त्यांना कसे नाही म्हणू शकते... मी जर नसते केले तर घर त्यांच्या कडून आवरले गेले नसते, आणि घर आवरणे गरजेचे होते हे मला ही कळते पण मी आज अति थकले आणि ही त्याची चिडचिड आहे...पण ही अगदी शेवटची वेळ आहे ,ह्या नंतर मी माझ्या हाताखाली नौकर घेऊन काम करून घेईल...पण ना मी काम करून थकणार ना मी त्यांना मर मर करायला लावणार हे नक्की.. आता तू घरी येशील आणि मला मदत करशील..मी वाट बघते, सोबत चहा घेऊ...

तो लगेच म्हणाला, जी हुकूम मॅडम हा मी आलोच, आणि येतांना बाहेरून जेवण घेऊ येतो, म्हणजे स्वयंपाक करावा नाही लागणार माझ्या राणी सरकारांना...आईला ही कळवतो ....मग बाहेर जाऊ...म्हणजे तुझ्या घरी जाऊन येऊ...

ती लगेच , इतके काही करायची गरज नाही ,मला माहेरची आठवण आली इतपत ठीक आहे पण लगेच हातातले काम सोडून जाण्याची गरज नाही..

©®अनुराधा आंधळे पालवे