माहेरचं वाण...भाग 3
"खरंतर मी तुला इनविटेशन द्यायला आले होते."
"मला कशाचं इंविटेशन? काही आहे का? म्हणजे काही कार्यक्रम आहे का? माझी मदत लागणार आहे का तुला? तू सांग मी ऑलवेज रेडी असते."
सायली हसली.
"मला माहिती आहे तू ऑलवेज रेडी असतेस पण आज मी वेगळ्याच कामाने आले आहे."
"म्हणजे?"
"म्हणजे मी तुला आणि सौरभला आमच्याकडे संध्याकाळी जेवायला यायचं आहे हे सांगायला आली आहे. सौरभ घरी आहे का?"
"अगं नाही तो आत्ताच बाहेर गेलाय."
"ओके तू त्याला सांगणार आहेस की मी सांगू?"
"मी सांगेल त्याला."
"नक्की."
"हो नक्की."
सायली तिथून गेली.
सौरभ आल्यानंतर अदितीने सौरभला सांगितलं तो सायलीच्या घरी जायला तयार झाला.
सौरभ आणि अदिती संध्याकाळी सायलीच्या घरी जायला तयार झाले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा