माहेरचं वाण...भाग 2
"काय झालं सायली का अशी गोंधळ घालतीयेस."
"अदिती आहे ना, तिला माहेर नाहीये ती अनाथ आहे, अनाथाश्रम मध्ये राहूनच मोठी झाली, तिथल्याच लोकांनी चांगलं स्थळ आलं म्हणून तिचं लग्न लावून दिलं. नवरा चांगला आहे, घरातील मंडळी सगळी चांगली आहे पण माहेरचं म्हणावं असं कुणीच नाही. यावर्षी अधिकमास आलाय ना तर सगळे माहेरी जाण्याबद्दल बोलत होते. अधिकमासाला जावयाचा मान करतात, मुलीला साडी देतात, माहेरपण करतात. सगळ्यांच्या चर्चा सुरू होत्या, तिला माहेर नाही म्हणून खूप वाईट वाटलं.
ती बाजूला जाऊन बसली, मी तिला विचारलं काय झालं तेव्हा ती बोलली मला माहेराहून कुणीच बोलवणार नाही."
"सायली स्पष्ट बोल."
"मला तिला घरी बोलवायचं आहे."
"म्हणजे?"
"म्हणजे मला तिचं माहेरचं वाण करायचं आहे. तिला माहेरी बोलवायचं आहे. जास्त खर्च नाही येणार फक्त मला तुझी मदत हवी आहे, तुझा होकार हवा आहे मला. तिला माहेरचं वाण द्यायचं आहे, तुझी हरकत नसेल तर मी करू?"
"तुझी इच्छा आहे ना? तुझ्या मनात आलंय ना मग कर."
"थँक्यू सो मच मी उद्या सकाळी तिच्याशी बोलते."
सायली खूप आनंदी झाली, ती दुसऱ्या दिवशी अदितीच्या घरी गेली.
"हाय अदिती."
"अगं सायली तू ये ना, आज सकाळी सकाळी?"
"तुझ्या हातचा गरम गरम चहा प्यायला आले."
"खरंच तुला माझ्या हातचा चहा आवडतो?"
"मग काय खोटं बोलते आहे." दोघीही हसल्या.
"ओके तू.. तू बस, मी मस्तपैकी चहा बनवते आणि आणते बस तू."
अदितीने चहा बनवून आणला, दोघींच्याही गप्पा सुरू झाल्या.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा