सरिता आपल्या दोन मुलं सह त्या लहान मुलाला सांभाळत होती. सरिताच्या दुसऱ्या मुलाची हालत खराब होती, तो देखील खूप लाचार होत चला होता. बायको सकाळी सहा वाजता जेवण बनवायची आणि जी फिरत राहायची ती 2 वाजता यायची आणि परत 3 वाजता जेवण बनवयची ती 4 ला फिरायला जायची ती रात्री यायची. त्याच्या बायकोला जणू त्यांची गरज नव्हती. त्याच दुःखाने तो देखील हे जग सोडून गेला पण आपल्या आईला न भेटता. किती दुःख झालं असेल ना सरिता ला आपली मोठी दोन्ही मुलं आपल्या बरोबर न बोलता आपल्याला सोडून गेले. आता फक्त तिचे आधार तिची दोन मुलं आणि तिची मुलगी राधिका. राधिका ला पण एक मुलगी आणि एक मुलगा झाला होता. सरिता पण आता खचली हाती. पण सरिताच दुःख इथेच संपणार नव्हते अजून खूप दुःख तिची वाट बघत होते. हो दुःखच तिची वाट बघत होती. सरिताला आता काम होत नव्हती म्हणून एक घरकाम करण्यासाठी एक बाई कामाला ठेवली. ती बाई पण खूप चलाख निघाली. त्या बाईने गोड बोलून खूप काही केल. सरिताचा लहान मुलगा पोलीस मध्ये कामाला लागला. थोडं चांगलं चालू होत पण सरिताच दुःख वाट बघत होती तेच खरं
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा