माहेरची मनी भाग 2

नायिकेला मांजर आवडणारा मुलगा मिळेल का?



माहेरची मनी भाग 2

मागील भागात आपण पाहिले की मांजर प्रेमी तृप्ती आणि तिचे कुटुंब. तृप्तीला मांजरीसह स्वीकारणारा मुलगा मिळेल का?


रवी,त्याचे आई आणि बाबा घरात येऊन बसले. पार्थ पाणी घेऊन आला. त्यानंतर हवा पाण्याच्या गप्पा सुरू झाल्या.

तेवढ्यात सारिकाताईंनी फोन केला,"खायला दिलेस ना? नीट काळजी घे."

"कोणी आजारी आहे का?" पार्थ म्हणाला.

लगेच रवीच्या बाबांनी विषय बदलला,"मुलीला बोलवा."

तृप्ती पाणी घेऊन आली. रवीच्या गालावर पडणारी खळी पाहूनच तिला तो आवडला. ती पाणी देणार एवढ्यात मनी त्याच्या मांडीवर येऊन बसली.

"अय्या,तुमच्याकडे मांजर आहे?" रवीची आई आनंदाने किंचाळली.

पुढची अर्धा तास तृप्ती आणि त्या मांजर ह्या विषयावर बोलत होत्या. रवी पोहे खाताना तृप्तीला पाहत होता.

अखेर जाताना सरिकाताई म्हणाल्या,"तुझी मनी आवडली बर का तृप्ती."

पाहुणे गेले आणि तृप्ती आनंदाने उड्या मारायला लागली.

"आई,अग त्यांना किती माहिती आहे कॅट्स बद्दल. मला तर भारी आवडल्या त्या." तृप्ती आनंदाने गिरकी घेत म्हणाली.


"तायडे,तुला लग्न मुलाशी करायचे आहे. तुझी ती मनी त्याच्या मांडीवरच ठाण मांडून बसली होती. कसे वाटले असेल त्याला?" पार्थ वैतागला.

तेवढ्यात मनीने पार्थला एक पंजा मारला आणि पळून गेली.

"आई ग! आई हिचे लग्न झाल्यावर ह्या मांजरीला पोत्यात भरून सोडून येतो का नाही बघच." पार्थ रागावला होता.

"हु,माझ्या छकुलीला सोडून मी जाईलच कशी? तिला नेणार मी माझी पाठराखीन म्हणून." तृप्ती नाक उडवत बोलली.


"मुलगी छान आहे,पण..." रवीचे वडील म्हणाले.

"पण काय? तिला मांजरी आवडतात. हो ना?" रवीची आई कंबरेवर हात ठेवत बोलली.

"पण आधीच एक मांजर असताना?" रवीचे बाबा मुद्दा रेटत होते.

"गारफिल्ड बोका आहे. तोही पर्शियन. तसेही मनी आली तर त्याला सोबत होईल. काय रे रवी?" आईने विचारले.

तृप्तीच्या स्वप्नात बुडालेल्या रवीने मान डोलावली आणि होकाराचा फोन आला. कदमांच्या घरी आनंदाला भरते आले.

"कुमे,होकार आला बाई. आता खरेदी,याद्या सगळे करायला हवे. साखरपुडा नकोच. लग्नात करू सगळे विधी." सुमन बहिणीशी बोलत होती.

बैठकी झाल्या. तारीख फिक्स झाली. "मोहनराव बस्ता उरकून घेऊ." रवीचे वडील म्हणाले.

रवी आणि तृप्तीच्या फोनवर गप्पा सुरू झाल्या होत्या. तृप्तीचे बाबा म्हणाले,"या रविवारी करू खरेदी. काय ग?"


तेवढ्यात सारिकाताई म्हणाल्या,"रविवारी सकाळी नको ह. गारफिल्ड रविवारी उठत नाही लवकर."

लगेच तृप्ती म्हणाली,"मनीची सुद्धा ब्युटी सलून अपॉइंटमेंट असते. दुपारीच करू."


दुसऱ्या दिवशी बस्ता बांधायला जाताना मनीला हट्टाने बरोबर घेतले. सगळेजण पोहोचले.

दरवाजात वॉचमन म्हणाला,"मॅडम, पेट्स आत न्यायला परवानगी नाही."

तितक्यात सरिकाताई म्हणाल्या,"अरे पण ती नवरी आहे. मी मुलाची आई."

वॉचमन शांतपणे म्हणाला,"मांजरांना आत नेता येणार नाही."

तृप्तीने जळजळीत कटाक्ष टाकला तेवढ्यात आई म्हणाली,"पार्थ,तू सांभाळ ह्या दोघांना."

पार्थ बिचारा आलिया भोगासी असावे सादर म्हणत पाच तास त्या दोन मांजरांना घेऊन बसला.

सगळे बाहेर येताच पार्थ म्हणाला,"ही घ्या तुमची मांजरे."

पार्थने दोघांना तात्पुरते एकेका खोक्यात ठेवले होते. अशा गमती जमती घडत लग्न झाले एकदाचे. तृप्तीच्या शालूला मॅचींग ड्रेस घालून मनी सासरी आली.

सासरी मनी जुळवून घेईल का? रवीचे मनिशी आणि तिच्या मालकीण बाईंशी जुळेल का? पाहूया अंतिम भागात.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all