माहेर....

Maher


माहेर



विषय- गोराई माझी लाडाची



राणी आपल्या सासरी नांदत होती. राणीला माहेर नव्हते. तिचे आई बाबा देवाघरी गेले होते. भाऊ नव्हता. तिला. माहेर नसल्याने.. माहेरच महत्त्व सासरी नांदणाऱ्या राणीला महिती होत. राणीला सासुबाईनी तंबी दिली होती की महालक्ष्मी बसण्याच्या वेळी तुझी मासिक पाळी येते गोळ्या घेऊन लांबवयाची आता. राणीने गोळ्या मेडिकल मधून आणल्या आणि पाळी लांबवली.


लागली तयारीला महालक्ष्मी येणार म्हणून.. फुलोरा केला.. बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, अनारसे, शंकरपाळी, करंज्या, साटोऱ्या, चकल्या, शेव तयार केले. महालक्ष्मी साठी वेण्या, फण्या, आरसा, करंडे बनवले.



महालक्ष्मी साठी भरजरी नवीन साड्या घेतल्या. मॅचिंग काचेच्या बांगड्या आणल्या. महालक्ष्मी साठी शेवंतीची वेणी, ठुशी, मंगळसूत्र, कमरपट्टा, बाजूबंद, तोडे दागिने आणले.


राणी महालक्ष्मीना मिरवत, वाजत, गाजत कौतूकाने घेऊन आली. बसवल्या महालक्ष्मी..


राणीने विचार केला महालक्ष्मी, गौरी स्वतः देवी असून यांना 3 दिवस माहेरी यावे, रहावे, लाड पुरवून घ्यावे वाटते. मी तर माणूसच आहे. मलाच नाही माहेर.


मग राणीने असा विचार केला असू दे. मला माहेर नाही पण मी प्रत्यक्ष महालक्ष्मी ना माहेरपण देते मी त्यांची आई झाले. देण्यातला आनंद तर मिळवूच शकते. आई मूलीच्या माहेरपणा साठी स्वतः सासरी नांदत असते. आणि आई काय करते आपल्याला जे मिळाले नाही. ते आपल्या मूलीला मिळाले पाहिजे असा प्रयत्न करते.


राणीने महालक्ष्मीचे सगळे लाड पूरवले मग.. त्यांच्या बाळाचे म्हणजे नात आणि नातूचे लाड पुरवले .. म्हणजे राणीने कमी वयात माहेर नसताना प्रत्यक्ष महालक्ष्मीला माहेरपण दिले आणि मनापासून धन्य झाली.


महालक्ष्मी ला 16 भाज्या, पुरणपोळी, पंचामृत, कोशिंबीर, अळू वड्या, कुरड्या सगळे गोड धोड केले. मनापासून नैवेद्य दाखवला. षोडशोपचारे पूजा केली. मनातून आनंदी झाली. सवाष्ण, ब्राह्मण जेवू घातले धन्य झाली.


3 दिवस माहेरपणाला आलेल्या महालक्ष्मीचा सोहळा संपन्न झाला. यथाशक्ती लाड पुरवले लेकीचे, नात, नातूचे.


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे 

©®