माहेर कडची नागपंचमी

Nagpanchmi is a maharashtriyan festival ...

माहेर कडील नागपंचमी

माझ्या माहेरी नागपंचमी खूप छान होत असे,मला आज ही माहेरची नागपंचमी आठवते,खरंच किती छान असतात ते माहेरचे दिवस आणि तिथे असणाऱ्या प्रत्येक गोष्टी...आज ही कधी कधी माहेरच्या आठवणीत डोळ्यातील अश्रू वाहू लागतात.किती मस्ती करायचो आम्ही भावंडं,मोठ्या उत्साहाने सर्व सण साजरे करायचो..त्यातील च एक म्हणजे नागपंचमी....

जेव्हा मी लहान होते,त्यावेळची नागपंचमी म्हणजेच खूप च छान अगदी आज मला देखील आठवते ती नागपंचमी,त्यावेळी आजी होती,आजी मुळे जरा जास्त मज्जा यायची,नागपंचमी च्या पाच दिवस आधी जिवती असायची,जिवती च्य दिवशी एक माणूस काहीतरी छोटस स्टिकर घेऊन यायचा अन् मग घराच्या बाजूला एका साईड ला चीपकायचा,त्या स्टिकर मध्ये काही मजेशीर चित्र असायची आणि नंतर जिवती ची पूजा करायची...मग तिथून पाच दिवसांनी नागपंचमी...

नागपंचमी च्या दिवशी आई आम्हाला पाटीवर नाग काढायला लावायची आणि मग ती पाटी देव्हारा जवळ घेऊन त्याची पूजा करायची...घरात पण काही ठिकाणी तुपाचे नाग काढायची...नंतर पूजा करून शिरा म्हणजेच प्रसाद करायची,आणि संपूर्ण घरात लया फुटाणे फेकून त्या दिवशी लया फुटाणे चा सुध्धा प्रसाद ठेवायची.

नागपंचमी ला आपण तवा ठेवत नाही तसेच भात वरण करत नाही...या दिवशी शिरा पुरी, चा नैवद्य दाखवायचा असतो,आणि तसेच फुलोरा असेल तर त्यासाठी करंजी व पापड्या कराव्या लागतात...

हे सर्व नागपंचमी सनाचे महत्त्व पण माझ्या माहेरी नागपंचमी चा दुसरा दिवस म्हणजेच यात्रेचा...हो माझ्या माहेरी नागपंचमी ची यात्रा भरायची,त्या यात्रेमध्ये पाळणे यायचे,मग आम्ही त्यावर मस्त झोके घ्यायचो...

आणि यात्रेत जाऊन छान छान वस्तू आणायचो,खूप मज्जा यायची...खर तर त्यावेळी प्रत्येक च सण खूप छान वाटायचं आणि आता तर सर्व सण नुस्त नावा पुरते आहेत...

आजही जुन्या गोष्टी विशेष करून सण वैगरे खूप आठवितात....आणि त्या सणाचा उलगडा व्हावा म्हणून मला आठवण आली....

Ashwini Galwe Pund