Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

माहेरवाशीण गौराई... गोष्ट छोटी डोंगराऐवढी

Read Later
माहेरवाशीण गौराई... गोष्ट छोटी डोंगराऐवढी

माहेरवाशीण गौराई...

गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं महत्व असतं. गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते.

यावेळी…

गौरी आली, सोन्याच्या पावली…
गौरी आली, चांदीच्या पावली…
गौरी आली, गाई वासराच्या पावली…
गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली…

असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते.

मी पहिल्यांदा जेव्हा गौराई बघितल्या ना, मी बघतच राहिले.
इतकं सुंदर रूप. त्या नटलेल्या गौराई बघून मन अगदी प्रफुल्लित झालं होतं. त्यांना नजरेआड करण्याची अजिबात इच्छा होत नव्हती.

ते लोभस रूप बघून माझी मुलगी हरखली.
मला म्हणाली,
"आई मला ही असच नटायचय."

मुलीचा हट्ट नाही कस म्हणणार, छोटे मुलंही देवाचचं रूप असतात.
मग काय लागले तयारीला. नवीन पैठणी आणली आणि घेतली नेसायला.

मोरपंखी रंगाची पैठणी, त्यावर लाल रंगाचा काठ खूप खुलून दिसत होती.

केसांचा जुडा त्यावर माळलेला गजरा, गळ्यात मोत्यांचा हार, नाकात नथ, कानात बाली, हातात बांगड्या, पायात पैंजण.. ते रूप बघून मीच विसरले की ती माझी मुलगी आहे.

तिने निरागसपणे विचारलं,
"आई आपल्याकडे का नसतात ग गौराई?"

 

मला खरं तर तिला  काय उत्तर देऊ समजत नव्हतं.
मी हसून तिच्याकडे पाहिलं आणि  तिला म्हणाली

"अग तूच माझी गौराई." मी तिला बसवलं, तिच्या बाजूला बसले आणि तिला सांगितलं.

"तूच माझी गौराई ,  प्रत्येक मुलीत ती असते.. तिचा वास असतो. जसं गौरीच्या असण्याने वातावरण प्रफुल्लित असतं अगदी तसंच तू माझ आयुष्य सुंदर आणि प्रसन्न करतेस.. मुली असतातच गौरी सारख्या."

ऐकता ऐकता ती मला बिलगली.

"सारं आयुष्य आनंदाने भरून टाकणाऱ्या.. सुख देणाऱ्या.. तूच माझी गौराई नेहमी मला आनंद देतेस."

हे सगळं ऐकून ती मला अजूनच बिलगली..  आणि माझी मुलगी माझी गौरी झाली.

गौराईची आणि माझी ही पहिली भेट माझ्यासाठी अविस्मरणीय असेल.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//