महाराष्ट्राचे शिलेदार

ईरा : शब्दांचे वैभव

  महाराष्ट्राचे शिलेदार 

कोरोना योध्यानो सलाम 
महाराष्ट्राराचा तुम्हाला प्रणाम 

डॉक्टर तुम्ही जीवाची लावली बाजी 
सेवा ही तुमची हजरजबाबी 

परिचारिका तुमची विनम्र सेवा 
रुग्णांना मिळतो प्रेमाचा ठेवा 

पोलीस तुमचा रात्रंदिवस पहारा 
जनतेला मिळतो तुमचा सहारा 

सफाई कामगार तुमची स्वच्छता भारी 
रोगराईचा समूळ नाश करी

महाराष्ट्राची तुम्ही शान 
उंचावते अभिमानाने मान 

तुमच्या सेवेची महान किर्ती 
झुकते तुमच्यापुढे ही धरती 

संसर्गही तुम्हाला भिऊन जातो दूर 
सेवेने तुमच्या भरुन येतो उर

थोर झाले तुमचे उपकार 
तुम्हीच महाराष्ट्राचे शिलेदार 

     ©®नामदेव पाटील