महापूर

महापूर



*विषय- महापूर*

किती कोसळला राजा
केले पाणीच रे पाणी,
पावसाने झाली सारी
वित्त जीवितही हानी.

नद्या भरल्या तुडूंब
आला त्यांना महापूर,
रुद्र रुपच घेऊन
जणू शिरे घरोघर.

किती रडावं ते आता
सांगा धायमोकलूनी,
कुणी कुणाची सांगावी
काय वर्णावी कहाणी.

सान लेकरु कुशित
होतं शेवटच्या क्षणी,
गेली कायम झोपून
माय मिठीत घेवूनी.

गुरं हंबरुनी मेली
पिकं निजली शेतात,
जीव निष्पाप ते खूप
गेले पाण्यात वाहात.

होतं नव्हतं ते सारं
तरंगलं घरभर,
करुनिया अस्ताव्यस्त
किती मोडले संसार.
--------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©

🎭 Series Post

View all