मायाजाल भाग 2

खुनाची मालिका सुरू झाली?कोण असेल पुढचा बळी?
मागील भागात आपण पाहिले की ,मृत तरुणाचे नाव श्रेयस आहे आणि तो एक स्ट्रगलिंग कलाकार होता.त्याला मारण्यात मिसेस कपूर या बड्या आसामीचा हात असू शकतो .एवढे बॉबी दिसुझाकडून कळले.शरद घरी आला तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते.डोक्यात असंख्य विचार घोंगावत होते आणि विचार एकाच नावकडे धावत होते...मिसेस कपूर..कोण आहे मिसेस कपूर?इन्स्पेक्टर शरद आणि मिसेस कपूरचा काय संबंध??जाणून घेऊ या भागात.

शरदला आजही तो पाच वर्षांपूर्वीचा काळ आठवला की डोळक्यात तिडीक जात असे.नव्याने अधिकारी पदावर रुजू झालेल्या,खूप काही करण्याची उमेद असलेल्या शरदला जेव्हा पहिली ड्युटी मिळाली.बॉलिवूडच्या एका बड्या हस्तीला प्रोटेक्शन पुरवायचे.आदेश हाती मिळताच शरद भडकला.त्यावेळी देसाई सरांनी समजावले,"हा सगळा नोकरीचा भाग आहे."अतिशय नाराजीच्या मनस्थितीत शरद कामावर हजर व्हायला निघाला.ऑफिसवर रिपोर्टिंग करायला गेला तेव्हाच सिनियर सौरभ राव हसला,"ऐसें जावोगे?शरद चमकला!!का?ड्युटी आहे,मग वर्दीत जाणार ना?सौरभ हसला,"अभी बहोत सिखना है मेरे दोस्त।"शरद बाहेर पडणार एवढ्यात त्याला कमिशनर देसाईंनी आत बोलावलं,"शरद जेधे पाटील!गोल्ड मेडलिस्ट फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. शरद हसला.देसाई पुढे बोलू लागले,"जेधे काही गोष्टी अनुभवातून सांगतो,ऐकाल?शरदने मान डोलावली.पहिली गोष्ट आपण सरकारी हुकुमाचे ताबेदार. तरीही अनेकदा प्रोटोकॉल बाहेर गोष्टी कराव्या लागतात ,ऐकाव्या लागतात. आता याच ड्युटीचे पहा. काय तर आजूबाजूला खाकीत पोलीस नको.आता याला वरून संमती आहे.सो गेट चेंज अँड गो अहेड ...शरद घरी आला.डार्क ब्लु जीन्स,पांढरा शर्ट,पिळदार शरीर,गोरा रंग,काळेभोर डोळे.एखाद्या अभिनेत्याला लाजवेल असा शरदचा लुक होता.पहिल्या दिवशी ड्युटी जॉईन केली.एक उमदा,तरुण,कर्तव्यदक्ष ऑफिसर शूटिंग सेटवर एका अभिनेत्याची निगराणी करत होता.शरदला हे वातावरण अजिबात आवडले नव्हते.

सकाळपासून रात्रीपर्यंत त्या फिल्मी,भडक,दिखाऊ वातावरणाचा उबग येत होता.एकेक दिवस शरद मोजत असायचा अक्षरशः.असेच काही दिवस गेले आणि एक दिवस..जुहूमधल्या एका प्रशस्त ऑफिसवर मिटिंग होती.शरद बाहेर वेटिंग रूम मध्ये होता.एवढ्यात साधारण पन्नाशीची भडक मेकअप,उंची दागिने घातलेली एक महिला आणि तिच्याबरोबर एक विचित्र तंग कपडे घातलेला तरुण आत आला.बरोबर ड्युटीवर असलेला राणे त्या तरुणांकडे पाहून हसला.तिकडून त्याने शरदला पाहून डोळा मारला.ते आत गेल्यावर राणे म्हणाला,"ह्या मिसेस कपूर आणि त्यांचा मुलगा बंटी.इंडस्ट्रीतील मोठ्या गुंतवणूकदार कुटुंबापैकी एक.शरद फक्त हसला.जवळपास चार तासांनी मिटिंग संपली.सगळे जायला निघाले.तेवढ्यात बंटी राणेंच्या जवळ आला.राणेसाब दोस्तसे पहचान नही करायेगे?राणे हसून म्हणला,"जरूर,ये इन्स्पेक्टर शरद जेधे है।बंटीने शेक हँड करताना शरदच्या हातावर हलकेच दाबले.शरदने हात मागे हिसकवला. त्यानंतर अनेक पार्ट्यांत बंटी आणि राणेची जवळीक शरदच्या लक्षात आली.पण ती वैयक्तिक बाब म्हणून त्याने सरळ दुर्लक्ष केलं.

एक दिवस असेच लेट पार्टी चालू होती.बंदोबस्तावर असताना अचानक राणे गायब झाला.शरद एकटाच बसून असताना बॉबी डिसुझा शरदजवळ येऊन बसला,"ड्रिंक्स?नो थँक्स शरद म्हणाला.नवीन आहेस तर.बॉबी असे म्हणताच शरद हसला.बॉबीने हळूच शरदच्या हातात एक कार्ड दिले आणि सांगितलं या रूम वर साहेबांनी बोलावलं आहे.शरदला काही कळेना.तरीही आपली ड्युटी समजून तो लिफ्टकडे वळला.बॉबी सोबत होताच.त्या सप्त तारांकित हॉटेलमधल्या आलिशान सुटचे दार उघडले आणि.....शरद आ वासून पहातच राहिला.त्याचा साहेब,बंटी,आणि राणे पूर्ण निर्वस्त्र अवस्थेत....आणि राणेंच्या.... शरदला किळस आली.तो मागे वळणार एवढ्यात राणे म्हणाला,"चालत रे सगळं".शरद वळणार एवढ्यात बंटीने त्याला मागून विळखा घातला,त्याच्या साहेबांकडे पहात म्हणाला,"तुम एक रात दो,तभी इसे पिक्चर मिलेगी, और तुमहें भी मालामाल कर दूनगा। दुसऱ्या क्षणी शरदच्या पोलादी हाताने बंटीच्या गालावर कानफटात बसली.शरद सरळ घरी निघून आला.आपल्यासारख्या इन्स्पेक्टर वर सुद्धा हात टाकायची हिंमत करणारे हे लोक.एवढी हिंमत येते कुठून?शरद हे सगळे विचार चालू असतानाच झोपी गेला.
शरदला जाग आली तेव्हा सकाळचे दहा वाजले होते.शरद जागा झाला.बातम्या सुरू केल्या.कालच्या प्रकरणावर मिर्च मसाला लावून बातमीचा रतीब घातला होता.शरदने समीरला फोन लावला,"समीर,ऐक, मला निरंजन राणेला भेटायचं आहे."समीर जोरात ओरडला,"काय?त्या××××ला कशाला भेटायचं?सांगतो तेवढं कर.पुढच्या मिनिटाला समीरने लोकेशन दिले.जवळपास पाच वर्षांनी शरद राणेंच्या भेटीला जात होता.कॅफे मध्ये शरदला पाहून राणे हसला,"ये,तू खरच वेगळा निघालास शरद.हाताने खूण करत शरदने श्रेयसचे फोटो पुढे टाकले,"याला ओळ्खतोस? राणे हसला,"हो!बंटीने शोधलेला नवा माल, पण त्याला सध्या भावेश शहा ने ठेवला...बस। तपशील नको.याला मारलं गेलं आहे.काय???राणे ओरडला.अरे परवाच्या पार्टीत...असो.शरद तुला सरळ सांगतो या बाबत कोणावर जबरदस्ती नसते आणि खून वगैरे तर....एवढ्यात मोबाईलवर शेफालीचे नाव फ्लॅश झाले,"सर आणखी एक खून झालाय."शरद ताडकन उठला.राणे हसत म्हणाला,"शरद मला शक्य ती मदत मी नक्की करेल.शरद वेगाने बाहेर पडला.
लोकेशनवर शेफाली आणि समीर वाट पहात होते.शहराबाहेर एका स्वस्त लॉजमध्ये एक खून झाला होता.मारला गेलेला तरुण मॉडेल होता.शरदने बॉडी पाहीली, तर चेहऱ्यावचे गालाचे मांस खरवडले होते.आणि.....पोटावर एक चिन्ह होते.शरदचे डोळे लकाकले.फोटोग्राफरला त्या चिन्हाचे फोटो काढायला सांगितले.बॉडी पी एम ला द्या.श्रेयसचे रिपोर्ट आले का.शेफाली म्हणाली,"हो! आलेत सर".चला लवकर.जीप वेगाने धावू लागली.!प्रिया रिपोर्ट तयार करून टीमची वाट पहात होती.शरद आत येताच प्रियाने कॉफी सांगितली.कॉफी घेत शरद रिपोर्ट पाहू लागला.प्रिया म्हणाली,"अत्यंत थंड डोक्याने खून केला आहे,अँड....अँड व्हॉट?he have physical inter course before he die. काय?म्हणजे याचा अर्थ ??तिथे कोणीतरी उपस्थित असणार!शेफाली cctv फुटेज चेक कर.श्रेयसचे कॉल डिटेल्स मागवा.एवढ्यात एका खबऱ्याचा फोन आला.समीर आनंदाने ओरडला,"एक क्लू सापडला आहे,बोल लवकर शेफाली म्हणाली.काल ज्या मॉडेलचा खून झाला त्याचे नाव व पत्ता मिळाला.क्षुधांशु रॉय,अंधेरीला रहातो.त्याच्या रूममेटला बोलावतो.शरद उठला आणि बाहेर पडत असताना प्रिया म्हणाली,"थांबा,आणखी एक,श्रेयसच्या अंगावर एक विशिष्ट खूण चाकूने कोरली गेली आहे.काय???ह्याचे फोटो प्रिंट काढा.

क्षुधांशु च्या रूम मेट कडून काही माहिती मिळेल का?काय असेल मारण्याचा हेतू?मृतदेहावर असलेल्या खुणांचा अर्थ काय??

🎭 Series Post

View all