माय मराठी

Maay Marathi

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी......
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.....
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी,......
एवढ्या जगात माय मानतो मराठी.            

  २७ फेब्रुवारीला  मराठी राजभाषा दिन असतो.कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.मराठी आपली मातृभाषा प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. मातृभाषा व्यक्तिवर संस्कार करत संस्कृति जपते. म्हणून मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणाने मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो.
        अनेक थोर साहित्यिक मराठीला लाभले आहेत.आपले संत चोखोबा, तुकोबा,बहिणाबाई, शाहीर,कवि केशवसुत या साहित्यकारांनी मराठी भाषा समृध्द केली आहे.मराठी भाषेचा अभिमान,गाैरव वाटावा अस श्रेष्ठ वैचारीक,आध्यात्मिक वाड:मय मराठी भाषेत आहे.

कोकणी, वारली, खानदेशी,मालवणी वऱ्हाडी,आगरी,नागपुरी,अहिराणी  कोल्हापुरी,कारवारी अशा अनेक बोलीभाषा मराठीच्या बहिणी आहेत.मराठी भाषेइतक्या बोलीभाषा दुसऱ्या कुठल्या दुसऱ्या भाषेला नाहीत.मराठी भाषेची शब्दसंपत्ती,अलंकृत भाषा,गोडी माधुर्य अन्य कुठल्याच भाषेत सापडणार नाही. मातृभाषा मराठीची सर कुठल्याच भाषेला नाही.
      म्हणून सर्वच मराठी भाषकांनी मराठीची ही थोरवी अभिमानाने मिरवायला हवी.
           बोलीन एक भाषा ती भाषा मराठी.........      
           दाखविन उद्याचीआशा ती आशा मराठी.

सौ.सुप्रिया रामचंद्र जाधव