मान जसा तुझा महत्वाचा तसा माझा ही... भाग 3

किती जुना वाटतोय हा टीशर्ट, जा आत मध्ये आणि जरा दुसरा एखादा चांगला नवीन टी-शर्ट घालून या,


मान जसा तुझा महत्वाचा तसा माझा ही... भाग 3

©️®️शिल्पा सुतार
..............

दुसऱ्या दिवशी अदितीची मैत्रिणी आरती आली होती, दोघी क्लासला सोबत जात असत नेहमी, ती बाहेर बसली होती, अदिती तयार होत होती, आरती समोर माधवी अदितीला दोनदा लवकर आवरायला ओरडली, मुद्दाम केल आज माधवी ने अस, कपडे पण जे घातले होते ते बदलायला लावले,

"मावशी आज अदिती माझ्याशी उगीच भांडत होती",.. आरती

का पण?

"छोट्या छोट्या गोष्टी वरून भांडते अदिती",.. आरती

"हो अस करते ती अदिती आता हल्ली , स्वभाव विचित्र झाला आहे तिचा, एकदम हट्टी",... माधवी

"तरी मी तिला बोलवायला आली आज",.. आरती

"हो ना किती छान आहेस तू, अशी का नाही आमची अदिती, तुझ्या सारखी समजूतदार" ,... माधवी

अदिती आतून ऐकत होती, ती बाहेर आली,

"का अस करत होती अदिती तू आरतीला , या अदितीला काही समजत नाही",... माधवीने चांगल सुनावल अदितीला

हो ना मावशी,

अदिती काही बोलली की माधवी तिची बाजू सोडून आरतीच्या बाजूने बोलत होती, दोघी मिळून अदितीला हसत होत्या, अदिती रागाने क्लासला गेली.

क्लास होऊन आल्यावर अदिती चिडली होती,..." आई तू का वागत होती अशी आज? आरती सोबत मला किती बोलत होती, का अस? तू माझी आई आहेस ना, माझी साईड घ्यायची सोडून आरती सोबत अजुन मला बोलत होती, मला तुझ्या सपोर्टची गरज होती",..

माधवी ऐकत होती काय म्हणते ती ते.

" काय अस , आणि मला सारख काय हे घालू नको ते घालू नको अस का करत होती तू? आवरत जा लवकर अस बोलत होती, आणि ती आरती माझ्या पेक्षा चांगली वाटली का तुला? ",.. अदिती ओरडत होती.

" आता का त्रास होतो आहे तुला अदिती , मी पण तुझी आई आहे ना, तू घेते का माझी बाजू? सगळे जमले की सगळे मिळून मला बोलतात, त्या वेळी मी पण आधारा साठी तुझ्याकडे बघत असते, तेव्हा तू मला एकट पाडते, मला गरज असतांना ही अस करतेस ",... माधवी

" अग आई पण तो मेक ओव्हर तुझ्या चांगल्या साठी होता",.. अदिती

" एकाच प्रसंगाबद्दल नाही बोलत मी अदिती, नेहमी अस करते तू मला, हो आणि मेक ओव्हर ही चांगल्या पद्धतीने करता आला असता, सदोदित माझा अपमान करायला हवा का सगळ्यांसमोर, नेहमी माझ चुकलेले असत का? , थोड समजून घेता येत नाही का मला, तू मोठी आहेस आता तुला समजत ना, मी पण वेगळया मनस्थितीत आहे, माझ मोनोपाॅज जवळ आहे, मला खूप मानसिक त्रास होतो अस केल तर ",... माधवी

" सॉरी आई मी या पुढे अस करणार नाही, लक्ष्यात ठेवेन मी",... तिने माधवीला खाली बसवल, तिला पाणी आणल,

" आई पप्पांच माहिती नाही पण मी कायम तुझ्या सोबत असेन या पुढे, मला लक्ष्यात आल नाही, बर झाल तु सांगितल, तू खूप सुंदर आणि छान आहेस, मी भान ठेवेन, या पुढे तुझ्याशी प्रेमाने समजुतीने बोलेन",... अदिती

आई लव यु

" बदल करायला मी तयार आहे अदिती , पण त्यात मी पण कंफर्टेबल हवी ना, तू रोज जीन्स घालते अचानक मी म्हटलं तुला तू आज पासून चुडीदार घाल, का तर मला आवडत तर तू करणार आहे का अस सांग बरं, थोडा माझ्या मनाचा विचार करा ना, सगळे धावून येतात जसे माझ्यावर, मला तुझा आधार हवा असतो ग अदिती, तूच मला सगळ्यात जवळची आहे, माझी आहेस तु",.. माधवी रडत होती.

अदिती गळयात पडली, आई सॉरी ना, आपण फ्रेंड्स ना, मूड बदल, चल आई मला जेवायला दे, खूप अभ्यास आहे मला,

अदिती जेवली, अभ्यास करायला आत गेली, सतीश आले त्या दिवशी माधवी त्यांना काही बोलली नाही, सकाळी लवकर ते ऑफिसला निघून गेले,

संध्याकाळी सतीश ऑफिसमधुन आले, त्याच्यासोबत त्याचा मित्र रमेश होता, त्यांच काहीतरी काम होत म्हणुन आले होते ते,

"रमेश तू बस पाच मिनिटे मी फ्रेश होऊन येतो, अग माधवी थोडा चहा टाक आणि जरा थोडं खायलाही कर",.. सतीश

हो.... माधवी आत गेली

सतीश कपडे बदलून टी-शर्ट घालून आले, ते बाहेर आल्याबरोबर माधवी ओरडली त्यांना,.. "किती जुना वाटतोय हा टीशर्ट, जा आत मध्ये आणि जरा दुसरा एखादा चांगला नवीन टी-शर्ट घालून या, आणि केसही विंचरा जरा, उद्या केस कापून या, केसांनाही कलर करत जा",

" बरोबर बोलता आहात तुम्ही वहिनी, मी तर कधीचा सांगतो आहे सतीशला",...रमेश

" बघा ना भाऊजी किती घाण राहतात हे",.. माधवी

मित्रासमोर असं म्हटल्यानंतर सतीश एकदम गडबडला, तो आत गेला आणि कपडे बदलून आला, जरा वेळ बसल्यानंतर चहापाणी झाल्यानंतर रमेश गेला, सतीशला काम होत बिझी होते ते, काही म्हटले नाही, चांगला अपमान केला होता त्यांचा माधवीने.

🎭 Series Post

View all