मान जसा तुझा महत्वाचा तसा माझा ही... भाग 2

तुला ना माधवी चांगल्या गोष्टी समजतच नाही",.. सतीश उगाच वैतागला होता


मान जसा तुझा महत्वाचा तसा माझा ही... भाग 2

©️®️शिल्पा सुतार
..............

अदिती पण पूर्ण प्रियाच्या बाजूने झाली होती, कुठलीही गोष्ट माधवीने निवडली की त्या दोघीजणी ती गोष्ट ठेवून देत होत्या, स्ट्रेट कटचे दोन-तीन ड्रेस प्रियाने निवडले होते.

" अगं प्रिया मला हे असे ड्रेस आवडत नाही, एक तरी अनारकली घे",.. माधवी

" सदोदित अनारकलीत असतेस तू ताई , जरा एखादा स्ट्रेट कट घे",.. प्रिया

"अग पण त्यातून खूप लेगिंग दिसते, मला नाही आवडत",.. माधवी

"लक्ष द्यायचं मग ड्रेस कडे ताई, कशीही गबाळ्यासारखी बसलेली असते तू खुर्चीवर, त्यापेक्षा पायावर पाय घेऊन छान बस ",.. प्रिया

माझे गुडघे दुखतात आता हल्ली, काय अस? मला अस बसता येत नाही पायावर पाय घेवून , काय सांगणार, जावू दे.

माधवीला आवडत नसून सुद्धा वेगळया पॅटर्नचे एक-दोन ड्रेस घेऊन ते सगळे घरी आले, आल्या आल्या माधवी चहा ठेवायला आत मध्ये गेली, प्रिया अदिती सतीशला आणलेली खरेदी दाखवत होत्या,

"हाच ड्रेस घालत तु माधवी उद्या, छान पसंत केला आहे प्रियाने, काय चॉईस आहे तुझी प्रिया",.. सतीश

हो मावशी मस्त... अदितीचा आवाज आला.

माझ्या साठी नाही असे कौतुकाचे शब्द निघत यांच्या तोंडून, किती ही करा, काही उपयोग नाही.

चहा झाला लगेच प्रियाने माधवीला हाक मारली,.. "चल लवकर ताई आपल्याला बाहेर जायचं आहे",

"आता कुठे?",.. माधवी

"पार्लरला जायचं आहे, छान केस कापून घे",.. प्रिया

"नको ग कशाला, आधीच माझे केस वाढत नाही आणि चांगले आहेत की माझे केस, उद्या छान शॅम्पु लावून धुते",.. माधवी

"नाही म्हणजे नाही, प्रिया म्हणते ते कर ",.. सतीशने सांगितलं.

प्रिया आणि माधवी पार्लरला गेल्या, अतिशय सुंदर दिसत होती माधवी पार्लर मध्ये आल्यानंतर,

" बघितलं आणि नाही म्हणत होती केस कापायला, आता किती छान वाटत आहे तुझ्याकडे बघायला",.. प्रिया

" ते पार्लर मध्ये केस सेट केले आहे म्हणून चांगले दिसत आहेत, रोज मला जमणार आहेत का केस असे ठेवायला, स्टेप कट ने केस अजून बारीक होतात, उगाच केसांची उंची कमी होते",.. माधवी

पण तिचा ऐकत कोण होतं, अदितीचे सुरू होतं आई तू अशीच राहत जा रोज, माझ्या शाळेत मिटींग असेल तेव्हाही पार्लरला जावुन ये,

काही हरकत नाही, मी ऐकेन ही, पण थोड्या प्रेमाने होवु शकल असत हे खरेदी वगैरे, सदोदित मला बोलण गरजेच आहे का? , थोडक्यात काय मी जशी आहे तशी या लोकांना आवडत नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी नटून थटूनच रहायला पाहिजे, इतर वेळी काय वाईट दिसते का मी?

दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या पार्टीत जातांना छान दिसत होती माधवी, सतीश किती सूचना करत होता तिला, अगदी अस बोल तस बोल, घाबरून गेली होती माधवी, न जाणो तिकडे काही चूक झाली तर सोडणार नाही सतीश तिला, पण छान झाली पार्टी, सगळेजण माधवी कडे बघत होते, सतीश खुश होता बरं झालं आपण प्रियाची मदत घेतली, तुझा हा मेक ओवर चांगला आहे, नाही तर आधी सारख्या तयारीत आली असती तू तर नेल नसत मी तुला सोबत, अशीच रहा आता छान, नाहीतर आधी केवढी गबाळी दिसत होती तू,

माधवीचा एकदम मूड गेला, ती चिडली,.. "मी तशीच राहणार आहे आधी सारखी, रोज एवढी तयारी करून कोण बसेल घरात आणि घरातले काम कोण करणार मग",

"तुला ना माधवी चांगल्या गोष्टी समजतच नाही",.. सतीश उगाच वैतागला होता, खूप बोलत होता तो तिला, माधवी अगदी कंटाळली होती, पुरे आता किती बोलणार मला, पण ती गप्प बसली, जावू दे घरी गेल्यावर झोपतील हे, उद्या जातील सकाळी ऑफिसला, बर वाटत तेवढ, सुट्टीच्या दिवशी अगदी कंटाळा येतो, आता हल्ली तिला एकटीला बर वाटत होत,

नेहमी असाच करायचा सतीश, तिला बोलतांना विचार करायचा नाही, माधवी तुला हे समजत नाही ते समजत नाही, नवीन गोष्टींची माहिती करून घे, अशी नको राहू, तशी राहत जा,

मी जी गोष्ट आधी करते ती त्यांना पटतच नाही जेव्हा ते स्वतः त्यांच्या हाताने ती गोष्ट बदलतात तेव्हाच त्यांना बरं वाटतं आणि या सगळ्यात पदोपदी माझा अपमान होतो, वाटेल तसं बोलत राहतात मला, समोर कोण आहे तेही बघत नाही, माझी अक्कल काढत राहतात, पाहुणे आले तरी तस, माझ्या माहेरी तर खूप जोर येतो यांना, मी आता गप्प बसणार नाही या लोकांना जाणीव करून द्यायला हवी अस वागल तर कस वाटत, मला खूप त्रास होतो आहे.

🎭 Series Post

View all