मान - अपमान भाग २
©आरती पाटील- घाडीगावकर
जलद लेखन स्पर्धा
हेमंत आणि सोनलच्या वागण्याने शामराव खूप दुखावले गेले होते. त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती की त्यांचीच मुलगी आणि जावई इतके व्यवहारिक होतील. त्यांनी आयुष्यभर मान मिळवला आज त्यांच्याच घरात त्यांचा अपमान होत होता.
शामराव टेन्शन मध्ये हॉल मध्ये बसून होते. आज जे झालं त्यावर विचार करत होते. संध्याकाळची वेळ झाली तश्या सुलोचना बाई चहा घेऊन आल्या आणि शामरावांना चहा दिला. शामराव चहा पीत सुलोचना बाई कडे पाहून म्हणाले, " वाटलं नव्हतं आपलीच मुलगी आणि जावई एवढे स्वार्थी निघतील. मी योग्य ते सर्व रीतीला धरून केलंच. शिवाय जावई स्वतः श्रीमंत आहे. तरी असा वागला ? त्याच्या अश्या वागण्याने माझ्या मनात जी त्याची जागा होती ती गेली."
शामराव एकटेच बडबडत होते. सुलोचना बाईंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी चहा झाल्यावर कप उचलले आणि स्वयंपाक घराच्या दिशेने निघाल्या. शामराव सुलोचना बाईंची कृति बघतच राहिले. त्यांना वाटलं होतं कि सुलोचना बाई यावर काहीतरी बोलतील.
रात्री जेवणाच्या वेळी सोनल सोडून सर्व जेवणाच्या टेबल वर हजर होते. शामरावांना लक्षात आलं की आपली लाडकी लेक रुसली आहे. ते सोनलच्या रूम जवळ आले आणि दरवाजा वाजवू लागले. आवाज देऊ लागले," सोनल, ये सोनल बेटा. चला जेवायला ये. सर्वजण वाट पाहत आहेत. "
सोनल रागात दरवाजा उघडते आणि शामरावांवर चिडून बोलते, " हेमंत रागाने मला इथेच सोडून गेलेत आणि तुम्ही मला जेवायला सांगताय ? जावयाला दुखवून तुम्हांला जेवण जातच कसं ? मला तिथे नांदायचं आहे. एवढं तरी लक्षात घ्या."
शामराव सोनलच्या एक - एक शब्दाने दुखावले जात होते. तरी देखील धीर गोळा करून तिला समजावू लागले, " सोनल चल, जेवून घे. मी उद्या हेमंत शी बोलतो. "
शामराव सोनलचा हात हातात घेऊन जेवायला घेऊन जातात आणि हाताने जेवण भरवतात. काहीही झालं आणि कितीही वाईट बोलली तरी लेक आहे. बापाला लेक उपाशी राहिलेली कशी चालेल ?
शामराव सोनलचा हात हातात घेऊन जेवायला घेऊन जातात आणि हाताने जेवण भरवतात. काहीही झालं आणि कितीही वाईट बोलली तरी लेक आहे. बापाला लेक उपाशी राहिलेली कशी चालेल ?
जेवण झाल्यावर सोनल तिच्या रूम मध्ये निघून गेली. मागे मिहीर, मोनिका, सुलोचना बाई आणि शामराव हॉल मध्ये बसले होते. मिहीर शामरावांकडे पाहत बोलू लागला, " पप्पा, एक बोलू, मला खरंच वाटलं नव्हतं हेमंत असा असेल. त्याचा खरा चेहरा दिसला आज. त्यावर कहर म्हणजे सोनलचं वागणं. तिने हेमंत ला विरोध करायचा सोडून तुम्हांलाच बोल लावला. "
मिहीरच बोलणं सुरु असताना मोनिका सर्व आवरून भांडी स्वयंपाक घरात ठेवायला जाऊ लागली. तोच मिहीरने मोनिकाला विचारलं.
मिहीर, " मोनिका, तूला काय वाटत ? हेमंतचं आणि सोनलचं ऐकून चारचाकी द्यायला हवी की दोघांना बसून समजवायला हवं ? "
मिहीर, " मोनिका, तूला काय वाटत ? हेमंतचं आणि सोनलचं ऐकून चारचाकी द्यायला हवी की दोघांना बसून समजवायला हवं ? "
सोनलने शांतपणे हातातली भांडी टेबल वर ठेवली आणि म्हणाली, " समजवायचं काय आहे त्यात ? ते जे म्हणाले ते बरोबर आहे. त्यांचा मान तुम्ही नीट द्यायला हवा होता. "
मोनिकाचं बोलणं ऐकून सर्व हैराण झाले.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा