मान - अपमान भाग -१
© आरती पाटील- घाडीगावकर
जलद लेखन स्पर्धा
" फक्त चांदीचा दिवा आणि सोन्याचं नाणं ? तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती पप्पा. एवढे श्रीमंत तुम्ही. बंगला, गाडी, पैसा - अडका सर्व आहे तरी फक्त सोन्याचं नाणं दिलंत तुम्ही जावयाला धोंड महिन्याचं वाण म्हणून ? " हेमंत आपल्या सासऱ्याशी जरा चढ्या आवाजात बोलत होता.
हेमंतच्या या प्रतिक्रियेमुळे सासरच्या मंडळींमध्ये शांतता पसरली. त्याच्या सासऱ्यांनी थोड्या संयमित आवाजात उत्तर दिलं, "हेमंत, संपत्तीच्या मोजमापाने प्रेम आणि सन्मान ठरवू नकोस. या सोन्याच्या नाण्यात केवळ मौल्यवान धातू नाही, तर आमची शुभेच्छा आणि संस्कृतीही गुंतलेली आहे."शामराव शांतपणे आपली बाजू सावरत म्हणाले.
सोनल हेमंतची बायको आणि शामरावांची धाकटी मुलगी देखील मध्येच बोलली, " पप्पा, हेमंत बरोबर बोलत आहेत. आम्हांला अपेक्षा होती कि, तू किमान चारचाकी तरी द्याल. तुमच्या जावयाचा आणि माझा पहिलाच अधिक महिना आहे म्हणून. तुम्ही सर्वच आशा फोल ठरवल्यात. "
शामराव, " अगं काय बोलतेयस तू ? तूला तरी कळतंय का ? चारचाकी का देणार ? रीतीला धरून खरंतर चांदीचा दिवा द्यायचा असतो. मी तर सोन्याचं नाणं सुद्धा दिल आहे. "
शामरावांचं बोलणं ऐकून हेमंतला राग आला.
हेमंत, " हो उपकार केलेत सोन्याचं नाणं देऊन. हे ठेवा सोन्याचं नाणं तुमच्या कडेच. चार चौघात उद्या विचारलं कोणी तर काय सांगणार ? त्यापेक्षा ते तुम्हीच ठेवा. सांगेन कोणी विचारलं तर सासरचं दिवळं निघालंय त्यामुळे नाही घेतलं काही. " असं म्हणत हेमंत रागाने सोनल ला न घेताच निघून गेला.
हेमंत, " हो उपकार केलेत सोन्याचं नाणं देऊन. हे ठेवा सोन्याचं नाणं तुमच्या कडेच. चार चौघात उद्या विचारलं कोणी तर काय सांगणार ? त्यापेक्षा ते तुम्हीच ठेवा. सांगेन कोणी विचारलं तर सासरचं दिवळं निघालंय त्यामुळे नाही घेतलं काही. " असं म्हणत हेमंत रागाने सोनल ला न घेताच निघून गेला.
हेमंत ला असं रागाने जाताना पाहून सोनल देखील शामरावां वर चिडली. तुमच्या मुळे हेमंत चिडून गेले पप्पा. काय कमी आहे पप्पा तुम्हांला जो तुम्ही फक्त चांदीचा दिवा आणि सोन्याचं नाणं देऊन जावयांचा अपमान केलात. तुमच्यामुळे मला सासरी ऐकून घ्यावं लागेल. "
सोनलचं बोलणं ऐकून शामरावांना धक्का बसला होता. शामराव, " सोनल बेटा, काय बोलतेयस तू ? तूला तरी कळतंय का ? अगं चांदीचा दिवा आणि सोन्याचं नाणं दिलं. अजून काय करायला हवं होतं ? "
सोनल, " हा प्रश्न मला विचारण्या पेक्षा स्वतःला विचारा ना ? माझा आणि हेमंत चा किती अपमान केलात तुम्ही. " असं बोलून सोनल तिच्या रूम मध्ये तडक निघून गेली.
हॉल मध्ये शामराव, त्यांची पत्नी सुलोचना, मुलगा मिहीर आणि सून मोनिका सर्व प्रकार पाहत होते. झालेल्या प्रकारावर सुलोचना बाई आणि मोनिका काहीही न बोलता स्वयंपाक घरात जातात आणि आपल्या कामाला लागतात.
क्रमश :
( जावई हेमंत आणि सोनलची मागणी शाम राव पूर्ण करतील का ? सुलोचना बाई आणि मोनिका या प्रकारावर काय प्रतिक्रिया देतील? पाहुयात पुढील भागात )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा